भारती एअरटेल लिमिटेह ही भारतासह जगभरातल्या अनेक देशांमध्ये टेलिकॉम सेवा पुरविणारी एक मल्टिनॅशनल कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नेहमी नवनवीन रिचार्ज प्लॅन लाँच करत असते. पण, आता एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. एअरटेलच्या दोन स्वस्त प्रीपेड प्लॅनच्या शुल्कात गुपचूप वाढ करण्यात आली आहे. चला तर या स्वस्त रिचार्ज प्लॅन्सचे नवीन शुल्क पाहू.

११८ रुपयांचा रिचार्ज प्लॅन –

majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
drones paragliding banned in pune on occasion of pm narendra modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ड्रोन, पॅराग्लायडर उड्डाणास बंदी; आदेशाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा

भारती एअरटेलच्या ११८ रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत आता १२९ रुपये करण्यात आली आहे. हा प्लॅन वापरकर्त्यांना १२जीबी डेटा ऑफर करतो. हा एक डेटा पॅक आहे; ज्यामुळे युजर्स कोणत्याची सक्रिय प्लॅनसह हा रिचार्ज वापरू शकतात. पण, या प्लॅनबरोबर वापरकर्त्यांना कोणतीही अतिरिक्त ऑफर देण्यात आलेली नाही.

२८९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन –

भारती एअरटेलच्या २८९ रुपयांच्या प्लॅनची ​​किंमत आता ३२९ रुपये करण्यात आली आहे. हा प्लॅन आता वापरकर्त्यांना ४ जीबी डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग व ३०० एसएमएससह २५ दिवसांचा वैधता कालावधी प्रदान करणार आहे. त्याव्यतिरिक्त ग्राहकांना या रिचार्ज प्लॅनबरोबर अपोलो २४|७ सर्कलचे सदस्यत्व, विनामूल्य हॅलो ट्युन्स आणि विंक म्युझिकमध्ये विनामूल्य प्रवेश मिळणार आहे.

हेही वाचा…युट्यूब, नेटफ्लिक्स अन् ओटीटीची उडाली झोप! एलॉन मस्क लवकरच लाँच करणार नवीन व्हिडीओ अ‍ॅप; पाहा काय असेल खास

कंपनीने काही दिवसांपूर्वी टेलिकॉम सेवेचे दर वाढविण्याचे संकेत दिले होते. कंपनीचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी ARPU चे दर २०० रुपयांवरून ३०० रुपयांपर्यंत वाढविण्यासंबंधी सांगितले होते. त्यामुळे TelecomTalk च्या रिपोर्टनुसार एअरटेलने दोन्ही स्वस्त प्लॅनची किंमत वाढवली आहे आणि कंपनीने हे दोन्ही प्रीपेड प्लॅन्स एअरटेलच्या वेबसाइटवर, तसेच एअरटेल थँक्स ॲपवर सूचीबद्ध केले आहेत.

एअरटेलने रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढविण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी या कंपनीने अनेक राज्यांमध्ये ९९ रुपये किमतीची बेस प्लॅन योजना बंद केली. त्यानंतर याचे दर ५७ टक्क्यांनी वाढविले. त्यामुळे भारतीय राज्यांमधील वापरकर्त्यांना त्यांचे सिम कार्ड सक्रिय ठेवण्यासाठी किमान १५५ रुपयांच्या प्लॅनसह रिचार्ज करणे आवश्यक आहे. एअरटेलने नोव्हेंबर २०२२ पासून सुरू होणारी ९९ रुपयांची योजना सुरुवातीला ओडिशा आणि हरियाणामध्ये बंद केली आणि नंतर आंध्र प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, राजस्थान, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश (पश्चिम) या राज्यांतही जानेवारी २०२३ पर्यंत या निर्णयाची व्याप्ती विस्तारित करण्यात आली.तेव्हा आता लक्षात घ्यावे की, एअरटेलच्या दोन स्वस्त प्रीपेड प्लॅन्सच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे.