Airtel tariff hike 2025: काही दिवसांपूर्वी TRAI ने सर्व टेलिकॉम कंपन्यांना कॉलिंग + SMS फक्त टॅरिफ प्लॅन लाँच करण्याचे आदेश दिले होते. जेणेकरून ज्या लोकांना डेटाची गरज नाही त्यांना जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत.अलीकडेच, TRAI ने भारतातील सर्व प्रमुख दूरसंचार ऑपरेटर्सना, जिओ, एअरटेल आणि विआयला आवाहन केले की, व्हॉईस आणि एसएमएस-फक्त रिचार्ज योजना आणा. ज्या वापरकर्त्यांना फक्त व्हॉइस आणि एसएमएस सेवांची गरज आहे परंतु स्वतंत्र ऑफरच्या कमतरतेमुळे त्यांन गरज नसताना इतर प्लॅन खरेदी करण्यास भाग पडते. या पार्श्वभूमीवर एअरटेल यूजर्ससाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. भारती एअरटेलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गोपाल विट्टल यांनी एअरटेल यूजर्सना महत्वाचे संकेत दिले आहेत.
काय दिले संकेत?
एअरटेलने मोबाईल सेवा शुल्क वाढवून आणि प्रति वापरकर्ता सरासरी महसूल (ARPU) रेकॉर्ड केला. याच्या काही महिने होत नाहीत तोवर आर्थिक शाश्वततेसाठी सेवा शुल्कात आणखी वाढ करणे आवश्यक असल्याचं कंपनीनं म्हंटलय. त्यामुळे एअरटेल नजीकच्या भविष्यात दर वाढवेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. दूरसंचार सेवा प्रदात्या भारती एअरटेलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गोपाल विट्टल यांनी यासंदर्भात संकेत दिले आहेत. कंपनीच्या तिमाही निकालांनंतर ते तज्ञांशी संवाद साधत होते. एअरटेल कंपनी नेटवर्कमधील गुंतवणूक कमी करत आहे. असे असले तरी आमचे लक्ष ट्रान्समिशन क्षमता निर्माण करणे, ग्राहकांचा अनुभव सुधारणे आणि देशांतर्गत ब्रॉडबँड सेवांचा विस्तार करण्यावर राहील, असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणतात, “आमचा विश्वास आहे की चालू वर्षासाठी आमचा भांडवली खर्च २०२४ पेक्षा कमी असेल आणि हे २०२६ मध्येही कमी राहील. डिजिटल क्षमता निर्माण करण्यासाठी केलेल्या गुंतवणुकीचे आता चांगले परिणाम दिसून येत आहेत. शेवटी मी हे अधोरेखित करू इच्छितो की भारताचा ARPU जागतिक स्तरावर सर्वात कमी असल्याचे गोपाल विट्टल म्हणाले. उद्योग आर्थिकदृष्ट्या स्थिर राहण्यासाठी आणि शाश्वत आधारावर परतावा देण्यासाठी दर दुरुस्तीची आणखी गरज आहे,” विट्टल म्हणाले.