कर्जाच्या ओझ्याखाली असलेली दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियासाठी एक दिलासादायक बातमी आहे. भारती एअरटेलने शुक्रवारी एक्सचेंजला दिलेल्या निवेदनात सांगितले की, इंडस टॉवर्समधील व्होडाफोनचा ४.७ टक्के हिस्सा विकत घेण्याचा करार केला आहे. व्होडाफोन आयडियामध्ये पैसे गुंतवले जातील आणि मोबाइल टॉवर कंपनीची थकबाकी भरली जाईल, या अटीवर हा करार करण्यात आला आहे. एअरटेलने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, इंडस टॉवरमधील व्होडाफोनच्या ४.७ टक्के स्टेकसाठी आम्ही आकर्षक किंमत देणार आहोत. हा करार सुमारे ३ हजार कोटींचा असू शकतो, असे उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र या डीलच्या किंमतीबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. एअरटेलने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या डीलद्वारे एअरटेल इंडस टॉवरद्वारे आपल्या सेवांचा विस्तार करू शकेल आणि एअरटेलच्या हिताचे रक्षण करू शकेल.

व्होडाफोन आयडियाने १५ जुलैपर्यंत इंडस टॉवरची थकबाकी भरण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी व्होडाफोन आयडिया दर महिन्याला इंडस टॉवरला ठराविक रक्कम देईल. गेल्या गुरुवारी, व्होडाफोनने युरो पॅसिफिक सिक्युरिटी या समूहाद्वारे २.४ टक्के हिस्सा विकला. हा स्टेक स्टॉक एक्स्चेंजवर मोठ्या प्रमाणात डीलद्वारे २२७ प्रति शेअर या दराने विकला गेला. हा करार एकूण १,४४२ कोटी रुपयांचा होता. मात्र, या डीलमध्ये २.४ शेअर्स कोणी विकत घेतले याची माहिती समोर आलेली नाही.

drones paragliding banned in pune on occasion of pm narendra modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ड्रोन, पॅराग्लायडर उड्डाणास बंदी; आदेशाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
kharghar to turbhe link road work will start after maharashtra assembly election 2024
खारघर तूर्भे लिंकरोडचे काम निवडणूकीनंतर सूरु होणार
pune municipal corporation create email address for complaints regarding water issues
समाविष्ट गावातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसाठी पालिकेने घेतला हा निर्णय !
Dnyanradha Multi State Co Operative Credit Society, fraud case, ED
ईडीकडून ३३३ कोटींच्या मालमत्तेवर टाच
maharashtra assembly election 2024 Candidates mobile call whatsapp call
उमेदवार दक्ष ! मोबाईल नाहीच, ओन्ली व्हॉटसअ‍ॅप कॉल
person in jail to contest polls candidates win polls from prison prison contest polls
एक काळ असा होता…
western railway recovers 80 crore fine from ticketless passengers
विनातिकीट प्रवाशांकडून ८० कोटींची दंडवसुली; सात महिन्यांतील पश्चिम रेल्वेची कारवाई

iPhone 13 शी स्पर्धा करणारी Oppo Find X5 सीरिज लाँच, फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

डिसेंबर तिमाही निकालांनुसार व्होडाफोन आयडियाचे १,९८,९८० कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. यादरम्यान कंपनीला ७२३० कोटी रुपयांचा तोटा झाला. जे गेल्या वर्षी ४५३२ कोटी रुपये होते. त्याच वेळी, कंपनीच्या ग्राहकांची संख्या गेल्या वर्षीच्या डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत २६.९८ कोटींवरून २४.७२ कोटींवर आली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर दिलेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत इंडस टॉवरमध्ये व्होडाफोनची २८ टक्के आणि भारती एअरटेलकडे ४२ टक्के हिस्सेदारी आहे.