कर्जाच्या ओझ्याखाली असलेली दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियासाठी एक दिलासादायक बातमी आहे. भारती एअरटेलने शुक्रवारी एक्सचेंजला दिलेल्या निवेदनात सांगितले की, इंडस टॉवर्समधील व्होडाफोनचा ४.७ टक्के हिस्सा विकत घेण्याचा करार केला आहे. व्होडाफोन आयडियामध्ये पैसे गुंतवले जातील आणि मोबाइल टॉवर कंपनीची थकबाकी भरली जाईल, या अटीवर हा करार करण्यात आला आहे. एअरटेलने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, इंडस टॉवरमधील व्होडाफोनच्या ४.७ टक्के स्टेकसाठी आम्ही आकर्षक किंमत देणार आहोत. हा करार सुमारे ३ हजार कोटींचा असू शकतो, असे उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र या डीलच्या किंमतीबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. एअरटेलने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या डीलद्वारे एअरटेल इंडस टॉवरद्वारे आपल्या सेवांचा विस्तार करू शकेल आणि एअरटेलच्या हिताचे रक्षण करू शकेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा