देशातील मोबाईल नेटवर्क ऑपरेटर्स कंपन्यांनी आपल्या प्रीपेड प्लानच्या किमतीत वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहक योग्य आणि परवडेल असा प्लान घेत आहेत. तसेच ऑपरेटर कंपनी योग्य सुविधा देत नसेल तर नंबर पोर्ट करत आहेत. ग्राहकांचं हित लक्षात घेऊन नेटवर्क ऑपरेटर कंपन्यांनी आकर्षक प्लान ग्राहकांसाठी आणले आहेत. गेल्या आठवड्यात व्होडाफोन आयडियाने ७०० रुपयांच्या आतील प्रीपेड प्लान ग्राहकांसाठी आणले आहेत. यात १५५ रुपये, २३९ रुपये, ६६६ रुपये आणि ६९९ रुपयांच्या प्लानचा समावेश आहे.
आता एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन आयडियाने ६६६ रुपयांचा मिड रेंज प्रीपेड प्लान ग्राहकांसाठी आणला आहे. एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया ७७ दिवसांचा अवधी देते. तर जिओकडून ग्राहकांना या प्लानमध्ये ८४ दिवसांचा अवधी मिळतो. दोन महिन्यापेक्षा जास्त रिफिल करायचं असल्यास हे प्लान ग्राहकांना उपयुक्त ठरू शकतात. जाणून घेऊयात काय काय आहे या प्लानमध्ये
प्लान | व्होडाफोन आयडिया | एअरटेल | जिओ |
६६६ रुपयांचा प्रीपेड प्लान | अनलिमिडेट व्हॉइस कॉल, दररोज १.५ जीबी डेटा, दररोज १०० एसएमएस, Vi मुव्हीज आणि टीव्ही सुविधा मिळते. याचा अवधी ७७ दिवसांसाठी आहे. योजनेच्या अतिरिक्त फायद्यांमध्ये Binge All Night Benefits, Weekend Data Rollover Benefits आणि Data Delights ऑफर यांचा समावेश आहे. | अनलिमिडेट व्हॉइस कॉल, दररोज १.५ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. याचा अवधी ७७ दिवसांचा आहे. या योजनेच्या अतिरिक्त फायद्यांमध्ये प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन, विनामूल्य ऑनलाइन कोर्स, फास्टॅगवर १०० रुपये कॅशबॅक, विनामूल्य हॅलो ट्यून्स आणि विंक म्युझिकचा समावेश आहे. | अनलिमिटेड कॉल, दररोज १०० एसएमएस, दररोज १.५ जीबी डेटा सुविधा मिळते. प्लान जिओ अॅप्सचा अॅक्सेस देतो. प्लानची वैधता ८४ दिवस आहे. |
७०० रुपयांखाली आकर्षक प्रीपेड प्लान | ६९९ रुपयांचा प्रीपेड प्लानआहे. यात दररोज ३ जीबी डेटासह त्याची वैधता ५६ दिवस आहे. अमर्यादित कॉल्स आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा आहे. | ५४९ रुपयांचा प्रीपेड प्लान असून ५६ दिवसांसाठी आहे. अनलिमिटेड कॉल आणि दररोज १०० एसएमएस, २ जीबी डेटा देते. या योजनेत प्राइम व्हिडिओ, अपोलो २४/७ सर्कल सुविधा मिळते. | ५३३ रुपयांचा प्लान असून ५६ दिवसांचा अवधी मिळतो. दररोज २ जीबी डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉल, दररोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्स वापरता येतात. |