एअरटेल ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी टेलिकॉम कंपनी आहे. रिलायन्स जिओनंतर एअरटेल कंपनीने ५ जी नेटवर्क सुरु केले आहे. संपूर्ण देशामध्ये एअरटेलची एक्सट्रीम फायबर सेवा देखील उपलब्ध आहे. अनेक जण घरून काम करताना कंपनीच्या अनेक सेवांचा वापर करतात. तुम्हाला कामासाठी आणि मनोरंजासाठी देखील कोणती सेवा हवी असल्यास एअरटेलकडे तुमच्याकडे एक पर्याय उपलब्ध आहे. सध्या भारतात आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे. १८ नोहेंबर रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. यातच एअरटेलने असे प्लॅन सादर केले आहे ज्याच्या मदतीने तुम्ही वर्ल्ड कप स्पर्धा पाहू शकणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जर का तुम्हाला आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धा लाइव्ह पाहायची असेल तर तुम्ही डिस्नी+ हॉटस्टार प्लॅटफॉर्मवर जाऊन पाहू शकता. याशिवाय तिथे तुम्हाला मोफत देखील सामने बघता येतात. मात्र स्ट्रीमिंग मोफत पाहताना तुम्हाला ते चांगल्या क्वालिटीमध्ये दिसत नाही. एअरटेलने लॉन्च केलेल्या प्लॅनबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.

हेही वाचा : Flipkart Dussehra Sale: केवळ ११,५९९ रूपयांमध्ये खरेदी करता येणार ‘हा’ आयफोन; ऑफर्स एकदा बघाच

डिस्नी + हॉटस्टारसह एअरटेल एक्सट्रीमचे प्लॅन

एअरटेल एक्सट्रीम फायबरचे तीन प्लॅन आहेत ज्यामध्ये डिस्नी+ हॉटस्टारच्या सबस्क्रिप्शनसह येतात. या तीन प्लॅनची किंमत अनुक्रमे ९९९ रुपये, १,४९८ रुपये आणि ३,९९९ रुपये आहे. ९९९ रुपयांचा प्लॅन ३.३ टीबी डेटासह २०० mbps स्पीडसह येतो. या प्लॅनशिवाय अतिरिक्त फायद्यांमध्ये अमेझॉन प्राइम, डिस्नी+ हॉटस्टार, एक्सट्रीम प्ले सबस्क्रिप्शन, व्हीआयपी सेवा, अपोलो 24|7 आणि विंक म्युझिकचा समावेश आहे.

एअरटेलच्या १,४९८ रुपयांच्या प्लॅनमध्ये ३०० mbps इतका स्पीड वापरकर्त्यांना मिळणार आहे. या प्लॅनमध्ये अमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्स बेसिक, डिस्नी+ हॉटस्टार, एक्सट्रीम प्ले सबस्क्रिप्शन, व्हीआयपी सेवा, अपोलो 24|7 सर्कल आणि विंक म्युझिक यांसारखे अतिरिक्त फायदे मिळतात. तसेच एअरटेल एक्सट्रीमच्या ३,९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना १ जीपीएस पर्यंतचा स्पीड आणि महिन्याला ३.३ टीबी इतका डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये अमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्स बेसिक, डिस्नी+ हॉटस्टार, एक्सट्रीम प्ले सबस्क्रिप्शन, व्हीआयपी सेवा, अपोलो 24|7 सर्कल आणि विंक म्युझिक यांसारखे अतिरिक्त फायदे मिळतात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Airtel xstream fiber plan 999 1498 and 3999 rs with disney plus hotstar watch icc cricket world cup 2023 tmb 01
Show comments