सुंदर गुलाबी केस, नितळ त्वचा असणारी अतिशय सुंदर अश्या मॉडेलने आपल्या एका नजरेत कितीतरी नेटकऱ्यांना भुरळ पाडली आहे. ही मॉडेल कुणी अभिनेत्री नाही किंवा प्रसिद्ध व्यक्ती नाही; तर आपल्या एका नजरेवर, एका हास्यावर सगळ्यांना वेड लावणाऱ्या मॉडेलचे नाव एटियाना लोपेझ [Aitana Lopez] असून ही खरी व्यक्ती नसून चक्क AI निर्मित मॉडेल आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

होय, काही काळापूर्वी बातमी देण्यासाठी प्रसिद्ध कंपन्यांमध्ये AI निर्मित न्यूज रीडर्स तैनात केले जाणार असल्याची बातमी आपल्याला ऐकायला मिळाली होती. त्याचप्रमाणे आता लवकरच रनवे मॉडेल्स आणि इन्फ्ल्यूएंसर्सची जागादेखील असे तंत्रज्ञान घेण्याची शक्यता वाटते आहे. एका स्पॅनिश मॉडेलिंग एजन्सीने लोपेझ या मॉडेलची निर्मिती केली असून, स्पेनमधील ही अशी एकमेव इन्फ्ल्यूएंसार मॉडेल आहे. याहून पुढे म्हणजे, हे AI मॉडेल महिन्याला जवळपास नऊ लाख कमवत असल्याची माहिती इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखातून आपल्याला समजते. हे मॉडेल एका जाहिरातीसाठी तब्बल ९० हजारांहून अधिक फी आकारते.

हेही वाचा : AI तंत्रज्ञान, चॅट जीपीटी नव्हे, तर ॲपल आणि गुगलनुसार ‘हे’ ठरलेत २०२३ चे सर्वोत्कृष्ट गेम्स आणि ॲप्स!

हे मॉडेल आपल्या सोशल मीडियावरून सतत एखाद्या कार्यक्रमाला गेल्याचे फोटो किंवा एखाद्या उत्पादनांसोबतचे फोटो शेअर करत असते.

स्पेनमधील बार्सिलोना या शहरात, रूबेन क्रूझ याने स्थापन केलेल्या ‘द क्ल्युलेस’ या एका मॉडेलिंग कंपनीने हे AI निर्मित इन्फ्ल्यूएंसर मॉडेल तयार केले आहे. मानवी मॉडेल्सच्या अहंकाराला वैतागून त्यांनी असे काही करण्याचा निर्णय घेतला. गुलाबी रंगाचे केस आणि नितळ त्वचा असणाऱ्या या AI निर्मित मॉडेलला इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर एक लाख ८८ हजार इतके फॉलोवर्स आहेत.

युरोपियन न्यूज डॉट कॉम [euronews.com] यांच्या एका अहवालानुसार, द क्ल्युलेस एजन्सीकडे २०२२ दरम्यान फारसे क्लायंट्स नव्हते. काम करत असताना क्रूजने एकंदरीत सर्व आकडेवारी पहिली आणि त्याच्या लक्षात आलं की, त्यांच्याकडची बरीचशी कामं काही कारणास्तव रद्द होत आहेत किंवा अडकून राहिलेली आहेत. “बऱ्याचदा यामध्ये चूक डिझाईनची नसून एखाद्या मॉडेलची किंवा इन्फ्ल्यूएंसरची असल्याचे लक्षात आले”, असे क्रूज यांनी युरोपियन न्यूज डॉट कॉम यांना माहिती देताना सांगितले.

म्हणूनच त्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या कंपन्यांसाठी काम करणारे हे AI मॉडेल बनवले. “काम चांगले व्हावे यासाठी आम्ही हा निर्णय घेऊन AI तंत्रज्ञान वापरून लोपेझ या मॉडेलचे निर्माण केले. ज्या मॉडेल्सकडे विनाकारण अहंकार आहे, मीपणा आहे, त्यांच्यासोबत काम करण्यापेक्षा हा पर्याय चांगला”, असेदेखील क्रूज म्हणतात.

लोपेझ हे मॉडेल केवळ इंस्टाग्रामवर सक्रिय नसून, फॅनव्यू [Fanvue] या माध्यमावरदेखील आपले फोटो शेअर करते. कंपनीच्या माहितीनुसार, या मॉडेलला नेटकरी प्रायव्हेट मेसेज पाठवतात. ज्यांना लोपेझ ही AI मॉडेल आहे हे माहीत नाहीये असे काही सेलिब्रेटीदेखील तिला संदेश पाठवत असतात. या मॉडेलला बनवण्यामागे रूबेन क्रूज आणि डायना न्युनेझ यांचा हात असून, सोफिया नॉव्हेल्स ही तिचे सोशल मीडिया अकाउंट सांभाळते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aitana lopez spains first ever ai model and influencer earn 9 lakhs per month dha