Alexa male voice: अॅमेझॉन ही जगभरातील सर्वात मोठ्या आणि प्रगतीशील टेक कंपन्यांपैकी एक आहे. आमच्या वेबसाइटवर ग्राहकांनी हवी असलेली प्रत्येक वस्तू उपलब्ध असल्याचा दावा कंपनी करते. अॅमेझॉन कंपनीद्वारे अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, अॅमेझॉन स्टोर्स, अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस अशा अनेक सेवा पुरवल्या जातात. त्यातील एक महत्त्वपूर्ण सेवा म्हणजे अॅमेझॉनची व्हर्च्युअल असिस्टंट ‘अॅलेक्सा’ होय. भारतामध्ये अॅलेक्साचा मोठा प्रमाणावर वापर केला जातो. ही सेवा आपल्या देशामध्ये फार लोकप्रिय आहे.
अॅमेझॉनच्या व्हर्च्युअल असिस्टंट अॅलेक्सा ही सेवा भारतामध्ये पाच वर्षांपूर्वी लॉन्च करण्यात आली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत अॅलेक्साच्या वापरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भारतीय ग्राहक मोबाइल फोन, स्पीकर्स यांच्यामार्फत अॅलेक्साचा वापर करत असतात. काहीजण मजा म्हणून तर काही व्यावसायिक कामांमध्ये या सेवेचा उपभोग घेत आहेत. भारतामध्ये अॅलेक्साला पाच वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अॅमेझॉन कंपनीने त्यांच्या या व्हर्च्युअल असिस्टंटबाबत मोठी घोषणा केली आहे.
आणखी वाचा – लॉन्च होण्यापूर्वीच लीक झाली Vivo च्या ‘या’ स्मार्टफोनची किंमत, जाणून घ्या फीचर्स
अॅलेक्साचा मूळ आवाज हा स्त्रीलिंग आहे. तिचा आवाज महिलेच्या आवाजाप्रमाणे आहे. अॅमेझॉनद्वारे तिच्या आवाजामध्ये अपडेट करण्यात येणार आहे. लवकरच अॅलेक्सा पुरुषी आवाजामध्ये बोलणार असल्याची माहिती कंपनीने दिली. त्यासह अॅलेक्साची सुविधा हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये असणार आहे. सोप्या शब्दांमध्ये सांगायचे झाल्यास, अॅलेक्सा स्त्री-पुरुष अशा दोन्ही आवाजांमध्ये हिंदी-मराठी या दोन भाषांमध्ये ग्राहकांशी संवाद साधू शकणार आहे. हे नवे फिचर वापरण्यासाठी उपभोगकत्याला ‘अॅलेक्सा, चेंज युवर वॉइस (Alexa, change your voice) असे म्हणावे लागेल.
अॅलेक्सा अॅप स्वीच करण्यासाठी हे करा.
- स्मार्टफोनमध्ये अॅलेक्सा अॅप उघडा.
- डिवाइस टॅपवर क्लिक करा.
- आवडत्या सेक्शनमधील डिवाइसवर क्लिक करा.
- पर्सनल डिवाइसच्या सेटिंगमध्ये येण्यासाठी गिअर ऑप्शनवर क्लिक करा.
- तेथे खाली अॅलेक्सा वॉइस ऑप्सन दिसेल. त्यावरुन आवाज निवडा.