ChatGpt अणि Bard ला टक्कर देण्यासाठी चिनमधील कंपनी असलेल्या Alibaba Group Holding Limited ने Tongyi Qianwen या आर्टिफिशियल इंटेलिजेंस आधारित चॅटबॉटचे लॉन्चिंग केले आहे. नवीन AI मॉडेल ChatGPT सारखेच आहे आणि कंपनीच्या अनेक सेवांमध्ये वापरले जाणार आहे. Tongyi Qianwen ला सर्वात पहिल्यांदा DingTalk सह जोडले जाणार आहे. हे अलिबाबाचे वर्कप्लेस मेसेजिंग app आहे . ज्याचा वापर मीटिंग नोट्स व्यवस्थापित करण्यासाठी वापरले जाते. याशिवाय DingTalk चा वापर ईमेल किंवा बिझनेस प्रपोजल तयार करण्यासाठी देखील केला जाणार आहे.

यासह अलीबाबा कंपनीच्या व्हॉइस असिस्टंट Tmall Genie मध्ये देखील AI आधारित नवीन चॅटबॉट वापरण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार कंपनीचे सीईओ डॅनियल झांग म्हणाले, आम्ही सध्या जनरेटिव्ह एआय आणि क्लाउड कॉम्प्युटिंगद्वारे चालविलेल्या तंत्रज्ञानाच्या युगात आहोत. या स्पर्धेत पुढे राहण्यासाठी सर्व क्षेत्रातील व्यवसायांनी इंटेलिजन्स ट्रान्सफॉर्मेशनवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे.

Augmont Forum for buying and selling lab grown diamonds print eco news
प्रयोगशाळेत तयार केलेले हिरे खरेदी-विक्रीचा ‘ऑगमाँट मंच’
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
How To Access DeepSeek On Web
ChatGPT आणि Gemini ला देणार टक्कर! DeepSeek चा नक्की कसा करायचा वापर?
Without internet recharge plans Airtel Jio Vi launches voice and sms only recharge plans cheapest prepaid recharge plans
घरात वायफाय असणाऱ्यांसाठी Airtel-Jio-Vi चा जबरदस्त प्लॅन! दिवसाला फक्त ५ रुपये खर्च, जाणून घ्या किंमत किती
Jio, Airtel and Vi Voice and SMS Plan
Voice and SMS Plan : जिओ, एअरटेल की व्हीआय? कोणता रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी ठरेल बेस्ट; वाचा यादी
Waqf board parliamentary panel loksatta
वक्फ संसदीय समितीत गोंधळ
ChatGPT Down
ChatGPT Down : ChatGPT ची सेवा ठप्प! भारतासह जगभरातील युजर्सची कामे खोळंबली
sanchar saathi app
Sanchar Saathi : घरबसल्या करता येणार सायबर फसवणुकीची तक्रार; काय आहे सरकारचे नवीन संचार साथी ॲप?

हेही वाचा : Bard Google: ChatGpt चं टेन्शन वाढलं, गुगल लवकरच लॉन्च करणार ‘बार्ड’

ChatGPT Google आणि Microsoft शी करणार स्पर्धा

अलीबाबा कंपनीने नवीन AI चॅटबॉट लॉन्च केल्यानंतर साहजिकच Google आणि मायक्रोसॉफ्टसारख्या दिग्गज कंपन्यांची आहे. जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या ChatGPT ने जगभरात लोकप्रियता मिळवली आहे. Tongyi Qianwen हा AI चॅटबॉट Google Bard आणि Microsoft Bing शी देखील स्पर्धा करणार आहे.

Tongyi Qianwen लॉन्च करणे हे अलीबाबा कंपनीसाठी फायदेशीर ठरले आहे. जनरेटिव्ह AI चे लॉन्चिंग झाल्यानंतर कंपनीच्या स्टॉकमध्ये ३ टक्क्यांची वाढ झाली आहे. अलीबाबा क्लाउडने Tongyi Qianwen ग्राहकांसाठी सुरु करण्याची योजना आखली आहे. असे झाल्यास ग्राहक लार्ज लँग्वेज मॉडेलला आपल्या इच्छेनुसार कस्टमाइज करू शकणार आहेत.

हेही वाचा : AI Apps: कमी वेळेत कामे पूर्ण करायची आहेत? वापरुन बघू शकता ‘ही’ ५ अ‍ॅप्लिकेशन्स

सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देईल. सध्या ते इंग्रजी भाषेवर काम करते. हे भविष्यात इतर भाषांमध्ये जोडले जाऊ शकते. चॅटजीपीटी हे गुगलशी स्पर्धा करत आहे. मात्र याच्याशी स्पर्धा करण्यासाठी गुगलने आपला चॅटबॉट लॉन्च केला आहे. ChatGPT ला टक्कर देण्यासाठी गूगलने bard AI लॉन्च केला आहे.

Story img Loader