Alphabet CEO Salary: २०२३ सुरू झाल्यापासून, बऱ्याच मोठ्या कंपन्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्याची घोषणा करत आहेत. जागतिक स्तरावर सुरु असलेल्या मंदीचा फटका गूगलसारख्या बड्या कंपनीलाही बसला आहे. फेसबुक, ट्विटर, मायक्रोसॉफ्ट नंतर गूगलनेही आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. दरम्यान, २०२२ मध्ये सीईओ सुंदर पिचाई यांना मिळालेल्या एकूण पेमेंटचा तपशील समोर आला आहे. कंपनीने याबाबतची माहिती अमेरिकन शेअर बाजाराला दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुगलमध्ये कर्मचारी कपात

Google ची मूळ कंपनी Alphabet जागतिक स्तरावर नोकऱ्यांमध्ये कपात करत आहे. माउंटन व्ह्यू, कॅलिफोर्निया-आधारित कंपनीने जानेवारीमध्ये घोषणा केली की ती जगभरातील १२ हजार नोकर्‍या कमी करेल, जे तिच्या जागतिक कर्मचार्‍यांच्या ६ टक्के इतके आहे.

सुंदर पिचाईंना मिळाले ‘इतक्या’ कोटी रुपयांचे पेमेंट

जिथे गुगल आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करत आहे. त्याचवेळी, Google चे CEO सुंदर पिचाई यांना २०२२ मध्ये गुगलकडून सुमारे $ २२६ दशलक्ष म्हणजेच १८.५४ अब्ज रुपये (१८५४ कोटी रूपये) पगार मिळाला आहे. ही रक्कम सामान्य कर्मचाऱ्याच्या पगारापेक्षा ८०० पट जास्त आहे.

(हे ही वाचा : ट्विटवरील टिवटिवाट आणखी वाढला, आता १० हजार शब्दांमध्ये करू शकाल पोस्ट! फक्त ‘या’ युजर्सना लाभ घेता येणार )

नफ्याचा फायदा

गुगलच्या कॉम्पनसेशन कमिटीने सीईओ पदावर बढती आणि अनेक प्रोडक्ट्सच्या यशस्वी लॉन्चिंगसाठी एवढा मोठा पगार दिल्याचे बोलले जात आहे. पिचाई यांच्या नेतृत्वाखाली, Google ने त्यांच्या प्रमुख जाहिराती आणि YouTube व्यवसायातून नफा मिळवला. यावेळी कंपनीने मशीन लर्निंग, हार्डवेअर आणि क्लाउड कॉम्प्युटिंगमध्येही गुंतवणूक केली आहे. त्याचबरोबर कंपनीने सांगितले आहे की, पिचाई यांना स्टॉक अवॉर्डमुळे इतका पगार मिळाला आहे. त्याच्या पगारात अंदाजे $२१८ दशलक्ष म्हणजेच १७.८८ अब्ज स्टॉक पुरस्कारांचा समावेश आहे.