Whatsapp Down in India alternative App list: जगभरात कोट्यवधी युजर्स असणारं व्हॉट्सअ‍ॅप भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी दुपारी १२ वाजून सात मिनिटांपासून टप्प्याटप्प्यात बंद झालं. दुपारी एकच्या सुमारास देशातील कानाकोपऱ्यामध्ये सर्वाधिक वापरलं जाणारं हे मेसेजिंग अ‍ॅप डाऊन असल्यावर शिक्कामोर्तब झालं. काही तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र कंपनीने यासंदर्भात पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली असून लवकरच सेवा सुरळीत होईल असं सांगितलं असलं तरी आता युझर्स दुसरे पर्याय शोधू लागले आहेत. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मेसेजेस पाठवता येत नव्हते. मात्र, काही वेळानंतर पर्सनल चॅटदेखील बंद झाले आहेत. आत्तापर्यंत लाखो युजर्सनी ही समस्या येत असल्याचं ट्विटरवर सांगितलं आहे.

‘डाऊन डिटेक्टर’ या वेबसाईट आणि अ‍ॅपच्या कामगिरीवर लक्ष ठेवणाऱ्या साईटनुसार दुपारी १२ वाजून ७ मिनिटांनी व्हॉट्सअ‍ॅपसंदर्भातील तक्रारी येऊ लगाल्या. दुपारी एक वाजता लाखोंच्या संख्येने युझर्सने हे अ‍ॅप बंद असल्याचं सांगितलं. “अनेक युझर्सला मेसेज पाठवण्यात अडचणी येत असल्याचं समजतंय. आम्ही व्हॉट्सअ‍ॅप लवकरात लवकर सुरु करण्याचा प्रयत्न करत आहोत,” असं व्हॉट्सअ‍ॅपची पालक कंपनी असणाऱ्या ‘मेटा’ने म्हटलं आहे. ६९ युझर्सने हे अ‍ॅप बंद असल्याची किंवा ते डिसकनेक्ट होत असल्याची किंवा क्रॅश होत असल्याची तक्रार नोंदवल्याचं या वेबसाईटचं म्हणणं आहे.

एकीकडे हे अ‍ॅप बंद झालेलं असतानाच दुसऱ्या कोणत्या अ‍ॅपवर आपण व्हॉट्सअ‍ॅप प्रमाणे बोलू शकतो याबद्दलचे सर्चही केले जात आहेत. व्हॉट्सअ‍ॅपला पर्याय ठरु शकतील असे त्याच पद्धीने काम करणाऱ्या सात अ‍ॅप्सबद्दल जाणून घेऊयात…

१) सिग्नल (Signal) – व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणे हे अ‍ॅप पण एण्ड टू एण्ड इनस्क्रीप्टेड आहे. हे अ‍ॅप मोफत उपलब्ध आहे.

२) टेलिग्राम (Telegram) – भारतातील सर्वात लोकप्रिय अ‍ॅपपैकी हे एक अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्यानंतर भारतीयांची पहिली पसंती याच अ‍ॅपला असल्याचं सध्या तरी दिसत आहे. हे अ‍ॅप क्लायंट टू सर्व्हर आणि एण्ड टू एण्ड (सिक्रेट चॅटमध्ये) अशा तत्वावर काम करतं.

४) थ्रीमा (Threema) – व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणे हे अ‍ॅप पण एण्ड टू एण्ड इनस्क्रीप्टेड आहे. मात्र हे पेड म्हणजेच पैसे देऊन वापरता येणारं अ‍ॅप आहे.

५) व्हीबर (Viber) – हे सुद्धा एण्ड टू एण्ड इनस्क्रीप्टेड अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप मोफत उपलब्ध आहे.

६) स्पाइक (Spike) – हे अ‍ॅप एईसी-२५६ या इनस्क्रीप्शननुसार काम करतं. यावर एक लाखांहून अधिक ग्रुप आहेत. हे अ‍ॅप मोफत उपलब्ध आहे.

७) जीनलो (Ginlo) – हे एण्ड टू एण्ड इनस्क्रीप्टेड अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप खासगी युझर्ससाठी मोफत उपलब्ध आहे.

८) वायर (Wire) – मोफत उलब्ध असणारं हे हे एण्ड टू एण्ड इनस्क्रीप्टेड अ‍ॅप आहे.