Amazfit या स्मार्टवॉच ब्रँडने भारतामध्ये Amazfit Active या स्मार्टवॉचचे अनावरण केले आहे. या नव्याकोऱ्या स्मार्टवॉचमध्ये फिटनेस ट्रॅकिंग आणि १२० प्रकारच्या ॲक्टिव्हिटी ट्रॅकिंगचे पर्याय उपलब्ध आहेत. तसेच यामध्ये ॲलेक्साचादेखील वापर करण्यात आला आहे. या स्मार्टवॉच The १.७५” HD AMOLED मध्ये स्टेनलेस स्टील फ्रेम असलेला डिस्प्ले आहे. तसेच फिटनेस ट्रॅकर, नेव्हिगेशन, ब्लूटूथ असे अजून कितीतरी फीचर्स यामध्ये दिलेले आहेत ते जाणून घेऊ.

Amazfit Active: फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

१. स्क्रीन

ऑनलाइन वीजबिल भरा; स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच जिंका!
ऑनलाइन वीजबिल भरा; स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच जिंका!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
do you have sinus and breathing problems
Video : तुम्हाला सायनस किंवा श्वसनाशी संबंधित त्रास होतो? भस्त्रिका प्राणायाम करा, जाणून घ्या कसे करावे?
News About Honda
Honda : होंडा भारतात सुरु करणार इलेक्ट्रिक बाइकची फॅक्टरी, काय असणार खासियत?
Reliance Jio Rs 458, Rs 1,958 voice and SMS-only plans launched to abide by TRAI’s guidelines
जिओ यूजर्ससाठी आनंदाची बातमी! ३६५ दिवसांच्या वॅलिडीटीचे ‘हे’ २ सर्वात स्वस्त प्लॅन एकदा पाहाच
Alphonso Mangoes arrived in APMC market Navi Mumbai
एपीएमसीत हापूस दाखल
Cancer causing chemicals on smart watches and bands
स्मार्टवॉच का ठरतंय जीवघेणं? नव्या अहवालातून धक्कादायक गोष्टी उघड
Airtel 90-Day Recharge Plan
Airtel चा स्वस्तात-मस्त प्लॅन! डेटा-कॉलिंगसह मिळणार भरपूर फायदे; केवळ इतक्या किंमतीत मिळेल ९० दिवसांची व्हॅलिडिटी

या घड्याळामध्ये १.७५ HD AMOLED स्क्रीन बसवली आहे. घड्याळाची फ्रेम ही स्टेनलेस स्टीलची असून याचे डिझाइन अत्यंत हलक्या वजनाचे आहे. या सर्वांमुळे घड्याळ हातावर अतिशय आकर्षक दिसण्यास मदत होते.

हेही वाचा : अरेच्चा, Smartwatch आहे का स्मार्टफोन? ‘या’ डिव्हाईसमध्ये सोशल मीडिया ते गेमिंग सर्वांचा वापर करता येईल, पाहा…

२. डिझाइन

Amazfit Active हे घड्याळ केवळ २४ ग्रॅमचे असल्याने तुमच्या मनगटावर त्याचा भार जाणवत नाही. हे घड्याळ ॲल्युमिनियम, मिश्र धातू आणि सॉफ्ट सिलिकॉन यांसारख्या चांगल्या प्रतीच्या घटकांचा वापर करून बनवले आहे. परिणामी, हे घड्याळ टिकाऊ असून आरामदायी आहे.

३. हेल्थ मॉनिटरिंग

हे स्मार्टवॉच दिवसभर तुमच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्याचे काम करते. तुमच्या हृदयाची गती आणि त्याचे ठोके, रक्तातील ऑक्सिजनची पातळी, तणाव पातळी या गोष्टींची नोंद करते आणि तुम्ही रात्री किती चांगले झोपता यावरदेखील लक्ष ठेवते.

४. व्यायामाचे ट्रॅकिंग

हे स्मार्टवॉच चालणे, धावणे यांपासून ते योगा किंवा कोणत्याही प्रकारच्या व्यायामांवर लक्ष ठेवण्याचे काम करते. हे घड्याळ एकूण १२० व्यायामाच्या पद्धतींवर लक्ष ठेवण्याचे काम करू शकते. तसेच तुम्ही कोणत्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी, हालचाल करत असल्यास ते ओळखण्याचे कामही हे घड्याळ करू शकते. त्यामुळे तुम्हाला स्वतःहून त्यावर लक्ष ठेवण्याची गरज नाही.

हेही वाचा : Realme 12 Pro : ग्राहकांना तीस हजार रुपयांपेक्षा स्वस्तात मिळणार ‘एवढे’ फीचर्स! लाँच झालेल्या या स्मार्टफोनची खासियत पाहा

५. नेव्हिगेशन

तुम्ही जर सायकलिंग, ट्रेकिंग किंवा हायकिंग यांसारख्या गोष्टी करणार असल्यास रस्ता पाहण्यासाठी मॅपची गरज भासू शकते. मात्र, तेदेखील या घड्याळामध्ये समाविष्ट केलेलं आहे. तुम्हाला तुमचा रस्ता अचूकपणे सांगण्याचे काम म्हणजे रस्ता नॅव्हिगेट करण्याचे काम या घड्याळात बसवलेल्या सॅटेलाईटच्या मदतीने होऊ शकते.

६. झेप कोच [Zepp Coach]

घड्याळामधील हे फीचर तुमच्या एखाद्या पर्सनल फिटनेस ट्रेनरसारखे काम करते. तुम्ही किती थकलेला आहात आणि तुम्ही किती व्यायाम करू शकता, त्यानुसार आर्टिफिशल इंटेलिजन्स [AI] वापरून तुम्हाला व्यायाम सुचविण्याचे काम करते.

७. कनेक्टिव्हिटी आणि ॲलेक्सा

गाणी ऐकणे, फोन करणे आणि फोन घेणे यांसारखी कामे तुम्ही या घड्याळात दिलेल्या ब्लूटूथच्या मदतीने करू शकता. इतकेच नाही तर, ॲमेझॉनचे ॲलेक्सा फीचरदेखील या स्मार्टवॉचमध्ये इनबिल्ट आहे. त्यामुळे या फीचरचा वापर करून हवामान पाहणे, रिमाइंडर लावणे यांसारखी कामे अगदी क्षणात करता येऊ शकतात.

मात्र, एवढ्या सुविधा देणाऱ्या Amazfit Active स्मार्टवॉचची किंमत नेमकी किती आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर या घड्याळाची किंमत ही १२ हजार ९९९ रुपये इतकी आहे. हे स्मार्टवॉच तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर तसेच इतर अधिकृत ऑनलाइन शॉपिंग साईट आणि दुकानांमध्ये विकत घेऊ शकता, अशी माहिती इंडिया टुडेच्या एका वृत्तावरून समजते.

Story img Loader