WhatsApp Channels: व्हॉट्सअॅपने आता भारतासह १५० देशांमध्ये व्हॉट्सअॅप चॅनल्स लॉन्च केलं आहे. WhatsApp ने या नवीन अपडेटमध्ये एक भन्नाट फिचर दिले आहे. जे तुम्हाला अॅपमध्येच तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या, तुमच्या आवडीच्या लोकांना आणि संस्थांना फॉलो करण्याची सुविधा उपलब्ध करुन देत आहे. शिवाय तुम्हाला या लोकांशी आणि संस्थांशी संबंधित अपडेट मिळू शकणार आहेत. व्हॉट्सअॅप चॅनल्स नावाचे हे एकतर्फी प्रसारण साधन असणार आहे, जे तुमचे कुटुंबीय, मित्र किंवा समुदाय यांच्यासह तुमच्या चॅट्सपासून वेगळे असेल.
या नवीन फिचरमुळे तुम्ही कोणत्याही सेलिब्रिटी, संस्था किंवा कंपन्यांना फॉलो करु शकता. तसेच या चॅनेलमुळे कंपन्यादेखील आपल्या ग्राहकांशी कनेक्ट होणार आहेत. व्हॉट्सअॅपने सांगितले की या चॅनेलचा वापर ब्रॉडकास्टिंग टूल्स म्हणून केला जाऊ शकतो, ज्यामध्ये केवळ अॅडमिन मेसेज, फोटो, व्हिडिओ किंवा पोल पाठवू शकतील. तसेच पुढील काही आठवड्यात आणि फीडबॅकच्या आधारे, कंपनी आणखी फिचर्स अपडेट करत चॅनेलचा विस्तार करणार आहे.
हेही वाचा- वर्षभराचा रिचार्ज प्लॅन करायचा आहे? मग Reliance Jio ‘हे’ दोन प्लॅन्स वापरूनच पाहा, मिळतात ‘हे’ फायदे
कोणीही चॅनेल तयार करु शकणार –
कंपनीने सांगितले की, येत्या काही महिन्यांत आम्ही कोणालाही चॅनेल तयार करणे शक्य होणार आहे. तर Meta ने यापूर्वी सिंगापूर आणि कोलंबियामध्ये पहिल्यांदा WhatsApp चॅनेल लॉन्च केले होते. यानंतर ते इजिप्त, चिली, मलेशिया, मोरोक्को, युक्रेन, केनिया आणि पेरूमध्येही लॉन्च करण्यात आले आहे. तसेच ते आता भारतासह १५० देशांमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील काही आठवड्यांत चॅनेल जागतिक स्तरावर सुरू होणार आहे. या नव्या फिचरमुळे तुम्ही फॉलो करण्यासाठी वेगवेगळे चॅनेल शोधू शकता जे देशाच्या आधारावर आपोआप फिल्टर केले जातील तसेच नाव किंवा श्रेणीनुसार तुम्ही चॅनेल शोधू शकता. शिवाय फॉलोवर्सच्या संख्येवर आधारित लोकप्रिय चॅनेल देखील पाहू शकता.
भारतासह आणि जगभरातील काही सेलिब्रिटी, क्रिकेटपटू आणि कलाकार WhatsApp वर आधीपासूनच उपस्थित असतील. ज्यांना तुम्ही फॉलो करु शकणार आहात. WhatsApp चॅनेल उपलब्ध सर्वात खाजगी प्रसारण सेवा म्हणून डिझाइन केले आहेत. चॅनल्स फॉलोअर म्हणून, तुमचा फोन नंबर आणि प्रोफाइल फोटो किंवा इतर फॉलोवर्सच्या दाखवला जाणार नाही. तसेच तुम्ही कोणाला फॉलो करायचे हे तुमच्या निवडीवर अवलंबून असणार आहे. तर चॅनलचा इतिहास फक्त ३० दिवसांसाठी सेव्ह केला जाईल.
हेही वाचा- काय सांगता! आता इंटरनेटशिवाय देखील करता येणार ऑनलाइन पेमेंट; RBI कडून ‘हे’ फिचर लॉन्च
असे वापरा WhatsApp चॅनेल –
- Google Play Store किंवा App Store वरून तुमचे WhatsApp अॅप अपडेट करा.
- WhatsApp उघडा आणि स्क्रीनच्या खाली असलेल्या अपडेट्स टॅबवर क्लिक करा. तुम्ही फॉलो करू शकता अशा चॅनल्सची लिस्ट तुम्हाला दिसेल.
- चॅनल्स फॉलो करण्यासाठी, त्याच्या नावापुढील ‘+’ बटणावर क्लिक करा. तुम्ही चॅनलचे प्रोफाइल आणि तपशील पाहण्यासाठी त्याच्या नावावर देखील क्लिक करू शकता.