इतरांप्रमाणे आपल्याकडेदेखील सर्वात भारीतला स्मार्टफोन असावा असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र, उत्तम कॅमेरा क्वाॅलिटी, बॅटरी, फिचर्स असे सर्व काही एका फोनमध्ये मिळवण्यासाठी अनेक जण त्यांची बँकेची सर्व खाती रिकामी करतात. मात्र, उत्तमोत्तम वैशिष्ट्य असणारे ५G फोन तुम्हाला केवळ ३५ हजार रुपयांच्या आत मिळू शकतात.

जानेवारी २०२४ मध्ये अनेक नवनवीन स्मार्टफोन लॉंच होणार आहेत, तर काही झालेही आहेत. अशात तुम्हाला आकर्षक, खिश्याला परवडणारा आणि भन्नाट फिचर्स-स्पेसिफिकेशन असणारा फोन घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या चार फोन्सची यादी एकदा नक्की बघा. त्यामधून तुमच्यासाठी जो योग्य असेल त्याची निवड करा. पाहा.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
How will state boards mobile app be useful for students parents and teachers
राज्य मंडळाचे मोबाइल अॅप विद्यार्थी, पालक, शिक्षकांना कसे ठरणार उपयुक्त?
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
Yamaha NMax 125 Tech Max scooter Details
NMax 125 Scooter :Yamaha ने सादर केली नवीन टेक मॅक्स स्कूटर, बाईकला टक्कर देणारे जबरदस्त फीचर्स; पण भारतात लाँच होणार का?
Best Web Series of 2024
२०२४ मधील गाजलेल्या वेब सीरिजची यादी, तुम्ही पाहिल्यात का ‘या’ कलाकृती?
10 December Mesh To Meen Horoscope in Marathi
१० डिसेंबर पंचांग: आज वृषभसह ‘या’ राशींच्या कुंडलीत धनलाभाचा योग; आज काय घडल्याने १२ राशींचे मन होईल प्रसन्न? वाचा मंगळवारचे राशिभविष्य

जानेवारी २०२४ मधील किफायतशीर स्मार्टफोन्सची यादी

१. रेडमी नोट १३ प्रो+ ५G [Redmi Note 13 Pro+ 5G]

भारतामध्ये नुकतीच रेडमी नोट १३ सीरिज लॉंच झाली आहे. हा रेडमी नोट १३ प्रो+ ५G अतिशय सुंदर आणि भन्नाट अशा फोनचे वाढीव फिचर्स पाहा.
या स्मार्टफोनमध्ये १२० Hz कर्व्ह असलेला AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. अंधारातही याच्या २००MP कॅमेऱ्यामधून तुम्हाला अतिशय सुंदर असे फोटो काढता येऊ शकतात. यामध्ये असणारी ५०००mAh इतकी शक्तिशाली बॅटरी तुमचा फोन बराचवेळा टिकून राहू शकते. मात्र, दिवसभर तुमचे फोन वापरण्याचे प्रमाण अधिक असले तरीही त्याची काळजी १२०W फास्ट चार्जिंग घेईल. हा स्मार्टफोन जरी HyperOS वर काम करणार असला तरीही अँड्रॉइड १४ ची कमतरता जाणवते आहे. एकंदरीत सर्व गोष्टी लक्षात घेता रेडमी नोट १३ प्रो+ ५G या स्मार्टफोनची निवड करायला हरकत नाही.

रेडमी नोट १३ सीरिज स्मार्टफोनची किंमत १६,९९९ रुपयांना सुरू होऊन, रेडमी नोट १३ प्रो+ मॉडेल्सची सुरवात २९,९९९ रुपयांनी होणार आहे.

हेही वाचा : Redmi Note 13 सीरिज भारतात लॉन्च; पाहा खिशाला परवडणाऱ्या स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्स….

२. पोकॉ एफ५ ५G [Poco F5 5G]

पोकॉ स्मार्टफोनने या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. रेडमी नोट १३ प्रो+ प्रमाणेच यामध्येही १२-बीट १२०Hz AMOLED डिस्प्ले बसवण्यात आला आहे, जो तुम्हाला अगदी सुरळीत काम करण्यास मदत करतो. यामध्ये, स्नॅपड्रॅगन ७+ जेन २ [Snapdragon 7+ Gen 2] असा शक्तिशाली प्रोसेसर देण्यात आला आहे, जो तुम्हाला विविध कामं एकाचवेळी करत असताना, गेम खेळत असताना अतिशय सुरळीतपणे काम करण्यास मदत करतो. यामध्ये ५०००mAh पॉवरची बॅटरी दिलेली आहे; जी ६७W चार्जिंगला सपोर्ट करते. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले, तर यामध्ये ओआयएस [OIS] असल्याने तुम्हाला अतिशय सुंदर आणि स्थिर फोटो काढण्यास मदत होते. एकंदरीत पोकॉ एफ५ ५G या फोनकडे तुम्हाला गेमिंग आणि इतर वापरासाठी आणि ३५ हजारांच्या आतील स्मार्टफोनसाठी एक उत्तम पर्याय म्हणून पाहता येईल.

३. iQOO Neo ७ प्रो ५G [iQOO Neo 7 Pro 5G]

पॉवर्डबाय स्नॅपड्रॅगन ८+ जेन १ चिप [Snapdragon 8+ Gen 1 chip] इतका शक्तिशाली प्रोसेसर असूनही स्वस्तात मिळणारा असा हा स्मार्टफोन आहे. यामध्ये फ्लॅट AMOLED डिस्प्ले आणि त्याचा १२०Hz रिफ्रेश रेट असणार आहे, ज्यामुळे तुम्हाला सिनेमा किंवा गेम खेळताना अतिशय सुंदर असा अनुभव मिळू शकतो. हा स्मार्टफोन दिवसभर चालण्यासाठी यामध्ये ५०००mAh इतक्या शक्तीची बॅटरी बसवण्यात आलेली आहे. समोर दिसणाऱ्या गोष्टी जशाच्यातशा तुमच्या फोनमध्ये येण्यासाठी यात उत्तम प्रतीचा कॅमेरा देण्यात आलेला आहे. उत्तमोत्तम फिचर्ससह मिळणारा हा iQOO Neo 7 Pro 5G स्मार्टफोन खिशालाही परवडण्यासारखा आहे.

हेही वाचा : ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर वनप्लसचा ‘हा’ फोन झाला चक्क ४००० रुपयांनी स्वस्त; काय आहेत नव्या किमती जाणून घ्या

४. वन प्लस नॉर्ड ३ ५G [OnePlus Nord 3 5G]

यादीतील सर्वात शेवटचा, परंतु तितकाच भन्नाट असा वन प्लस नॉर्ड ३ ५G स्मार्टफोन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करू शकतो. यामध्ये असणाऱ्या फ्लॅट १२०Hz AMOLED डिस्प्लेमुळे तुम्हाला कोणताही सिनेमा पाहताना किंवा गेम खेळताना अतिशय सुंदर अनुभव मिळतो. या फोनच्या बाजूला असणारा अलर्ट स्लाईडर हे या फोनच्या सर्व वैशिष्ट्यांपैकी एक आहे. हे तुम्हाला सायलेंट ते रिंगिंग मोडमध्ये अतिशय स्मूथली जाण्यास मदत करते. हा फोन पॉवर्डबाय OxygenOS सॉफ्टवेअर आहे, ज्यामुळे तो अतिशज सुरळीत आणि जलद गतीने काम करतो. याची बॅटरीदेखील अतिशय शक्तिशाली आणि बराचकाळ टिकणारी आहे. त्यासाठी यामध्ये, ५०००mAh बॅटरी बसवण्यात आली असून ती झटपट चार्ज होण्यासाठी, ८०W चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये असणाऱ्या १६ जीबी रॅममुळे न अडखळत तुम्ही हवे ते ॲप, गेम्स हवे तसे वापरू शकता, खेळू शकता. त्यामुळे तुम्हाला जर कमी किमतीमध्ये सर्वोत्तम फिचर्स आणि स्पेसिफिकेशन असणारा स्मार्टफोन घ्यायचा असेल तर वन प्लस नॉर्ड ३ ५G चा विचार करायला अजिबात हरकत नाही, अशी माहिती इंडिया टुडेच्या एका लेखावरून समजते.

Story img Loader