तुम्ही जर रिलायन्स जीओ यूजर असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. दिवाळी पूर्वीच जीओने ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर जाहीर केल आहे. रिलायन्स जीओने त्यांच्या JioFiber ग्राहकांसाठी ही ऑफर जाहीर केली असून १८ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर दरम्यान JioFiber कनेक्शन असणाऱ्या ग्राहकांना ६,५०० रुपयांपर्यंतचा फायदा होणार आहे. ही ऑफर सहा महिन्यांच्या रिचार्ज आणि तीन महिन्यांच्या ५९९ आणि ८९९ रुपयांच्या प्लॅनवरही उपलब्ध आहे. जाणून घेऊया प्लॅनचे फायदे

५९९ रुपयांचा प्लॅन
नवीन जीओ फायबर कनेक्शनसह, ग्राहकांनी ५९९ रुपयांचा प्लॅन घेतल्यास त्यांना सहा महिन्यांसाठी रिचार्ज करावे लागेल. त्यानंतर वापरकर्त्यांना ३०Mbps स्पीडने इंटरनेट, १४ पेक्षा जास्त ओटीटी अॅप्स आणि ५५० पेक्षा जास्त ऑन-डिमांड चॅनेल मिळतात. याशिवाय, ग्राहकांना १,००० रुपयांचे AJIO, १,००० रुपयांचे रिलायन्स डिजिटल, १,००० रुपयांचे NetMeds आणि १,५०० रुपयांचे IXIGO व्हाउचर देखील मिळतील. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये १५ दिवसांची अतिरिक्त वैधता देखील उपलब्ध असेल.

आणखी वाचा : Jio ग्राहकांसाठी खुशखबर! फक्त ५ रुपयांमध्ये मिळवा ‘इतक्या’ दिवसांची कॉलिंग सुविधा; लगेच जाणून घ्या ऑफर

८९९ रुपयांचा प्लॅन
जीओ फायबरचा ८९९ रुपयांचा प्लॅन घेतल्यानंतरही ग्राहकांना सहा महिन्यांसाठी रिचार्ज करावे लागेल. त्यानंतर वापरकर्त्यांना १००Mbps स्पीड इंटरनेट, १४ पेक्षा जास्त ओटीटी अॅप्स आणि ५५० पेक्षा जास्त ऑन-डिमांड चॅनेल मिळतील. ग्राहकांना २,००० रुपयांचे AJIO, १,००० Reliance Digital, ५०० NetMeds आणि ३,००० रुपयांचे IXIGO व्हाउचर मिळतील. या प्लॅनमध्ये १५ दिवसांची अतिरिक्त वैधता देखील उपलब्ध असेल.

तीन महिन्यांचे प्लॅन
या प्लॅनमुळे ग्राहकांना सहा महिन्यांच्या प्लॅनमध्ये इंटरनेट स्पीड आणि अॅपची सुविधा मिळेल, फक्त १५ दिवसांची अतिरिक्त वैधता मिळणार नाही. या प्लॅनमध्ये ग्राहकांना १,००० रुपयांचे AJIO, ५०० रुपयांचे रिलायन्स डिजिटल, ५०० रुपयांचे नेटमेड्स आणि १,५०० रुपयांचे IXIGO व्हाउचर मिळतील.

Story img Loader