एखादा सण असो किंवा कंपनीचा एखादा खास दिवस या निमित्त निवडक कंपन्या त्यांच्या सेलची घोषणा करतात. तसेच या सेलची ग्राहकसुद्धा आतुरतेने वाट पाहत असतात. कारण या सेलमध्ये नागरिकांना अनेक उपकरणे स्वस्तात मस्त खरेदी करण्याची संधी मिळते; तर आता ॲमेझॉन (Amazon) त्याचा वर्षातील सर्वात मोठा सेल इव्हेंट (Amazon Prime Day 2024) घेऊन आला आहे, जो जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होईल. हा दोन दिवसीय ऑनलाइन विक्री सेल फक्त Amazon प्राइम सदस्यांसाठीच असेल. gadgets360 यांच्या वृत्तानुसार या सेलमध्ये तंत्रज्ञानापासून ते घरगुती वस्तूंपर्यंत, कपडे आदी बऱ्याच गोष्टींवर ग्राहकांना सूट दिली जाईल. मागील वर्षांप्रमाणेच, Amazon निवडक बँकेच्या कार्ड आणि EMI व्यवहारांद्वारे पेमेंटवर डिस्काउंट देईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तारीख :

ॲमेझॉन प्राइम डे सेल शनिवार, २० जुलै रोजी सकाळी १२:०० वाजता सुरू होईल आणि २१ जुलै रोजी रविवारी रात्री ११:५९ वाजता समाप्त होईल. इंटेल, सॅमसंग, वनप्लस, iQoo, Honor, सोनी, असूस आदी ४५० हून अधिक भारतीय व जागतिक ब्रँड्सकडून नवीन उत्पादन लाँच करण्यासाठी ४८ तासांचा सेल इव्हेंट जाहीर करण्यात आला आहे. घर, स्वयंपाकघर, फॅशन, दागिने, हस्तनिर्मित उत्पादने आदी बरंच काही या सेलमध्ये असेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा…Meta AI होणार आणखी हुशार; व्हॉट्सॲपवरच करून देणार तुम्हाला फोटो एडिट; पाहा कसं काम करणार हे नवीन फीचर

बँक ऑफर्स :

ॲमेझॉन प्राइम डे दरम्यान, खरेदीदार आयसीआयसीआय (ICICI) बँक कार्ड, क्रेडिट कार्ड EMI व्यवहार, SBI क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड EMI व्यवहार वापरून पेमेंटवर १० टक्के बचतीचा लाभ घेऊ शकतात. तसेच Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्ड वापरकर्ते २,५०० पर्यंतच्या वेलकम रिवॉर्ड्सचा लाभ घेऊ शकतात. ३०० रुपयांपर्यंत कॅशबॅक (फक्त प्राईम मेंबर्ससाठी) आणि सेलदरम्यान २,२०० रुपयांपर्यंतचे रिवॉर्ड मिळू शकतात.

तसेच इको स्मार्ट स्पीकर, फायर टीव्ही स्टिकवर ५५ टक्के सूट तर वनप्लस १२ आणि वन प्लस ओपन, आयफोन १५, शाओमी १४ अँड शाओमी अल्ट्रा, iQOO Z9, सॅमसंग गॅलेक्सी एस २४, रिअलमी नारझो सीरिज स्मार्टफोन्सवर सूट देण्यात येणार आहे. ॲमेझॉन प्राइम डे सेल २०२४ हा केवळ प्राइम मेंबर्ससाठी खास कार्यक्रम आहे. खरेदीदार डिस्काउंट सेलमध्ये सहभागी होण्यासाठी प्राइम मेंबरशिप घेऊ शकतात. तुम्ही आधीपासून प्राइम सदस्य नसल्यास, तुम्ही सेलदरम्यान खरेदी करण्यासाठी ३० दिवसांच्या विनामूल्य चाचणीद्वारे प्रवेश करू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amazon announced its prime day sale from july 20 to july 21 amazon pay icici bank credit card and get welcome rewards asp
Show comments