Amazon Back to School Sale Offer : सध्या काही शाळा आणि कॉलेजमध्ये परीक्षा संपून विद्यार्थ्यांची सुट्टी सुरू झाली आहे. यादरम्यान अनेक जण वेगवेगळ्या विषयांचे कोर्स करतात, काही जण गेम्स खेळतात तर काही अगदी आवडत्या विषयांचा अभ्यास, तर काही अगदी हेल्थकडे लक्ष देण्यासाठी व्यायामसुद्धा करतात; तर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्टवॉच घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठीच आहे.

ॲमेझॉनने उन्हाळा स्पेशल ‘बॅक टू स्कूल सेल’ सुरू केला आहे, ज्यामध्ये विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांनी लॅपटॉप, टॅब्लेट, प्रिंटर, हेडफोन, स्मार्टवॉच खरेदी केल्यास ८० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार आहे. उन्हाळ्यात तुम्ही घरी अभ्यासाची तयारी करत असाल किंवा एखाद्या वर्गाला शिकवणार असाल तर ॲमेझॉनवरील हे डील तुमच्या सर्व शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या आवश्यक स्वस्तात विकत घेण्यास मदत करू शकते.

४० टक्क्यांपर्यंत सूट (Laptops At Up To 40% Off )

बजेट फ्रेंडली लॅपटॉपपासून ते शालेय प्रकल्प आणि ऑनलाइन क्लासेससाठी उपयुक्त असणाऱ्या हायपर्फोमन्स असलेल्या मशीनपर्यंत, ॲमेझॉन टॉप लॅपटॉप ब्रँडवर ४० टक्क्यांपर्यंत सूट देत आहे.

टॅब्लेटवर ४० टक्क्यांपर्यंत सूट (Tablets At Up To 40% Off)

प्रवासात अभ्यास करायला आवडते? तर ॲमेझॉनच्या सेलमध्ये सॅमसंग आणि लेनोवोसारख्या लोकप्रिय ब्रँडच्या टॅब्लेटवर ४० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे. दीर्घकाळ बॅटरी टिकणारे डिव्हाइस नोट्स लिहिण्यासाठी, वाचण्यासाठी आणि ऑनलाइन क्लासेसमध्ये सहभागी होण्यासाठी बेस्ट ठरेल.

प्रिंटरवर ३५ टक्क्यांपर्यंत सूट (Printers At Up To 35% Off)

सेलदरम्यान प्रिंटरवर ३५ टक्क्यांपर्यंत सूट मिळवा आणि वेळ, पैसा दोन्ही वाचवा. कॉम्पॅक्ट इंकजेटपासून ते ऑल इन वन मल्टीफंक्शन प्रिंटरपर्यंत, ॲमेझॉनच्या डीलमुळे प्रिंटिंग असाइनमेंट आणि प्रोजेक्ट्स पूर्वीपेक्षा जास्त सोप्या पद्धतीने पूर्ण करता येईल .

हेडफोन्सवर ६० टक्क्यांपर्यंत सूट (Headphones At Up To 60% Off)

ॲमेझॉनला हेडफोन्सवर ६० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे. ऑनलाइन क्लासेस अटेंड करण्यासाठी तुम्हाला नॉइज कॅन्सलिंग, वायरलेस किंवा वायर्ड मॉडेल्स आवडत असले तरीही ॲमेझॉनवर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे हेडफोन्स खरेदी करू शकता.