सध्या जगभरामध्ये आर्थिक मंदीचे कारण देत अनेक दिग्गज टेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. एका बाजूने नोकऱ्यांची संख्या कमी होत असतानाच कर्मचारी कपातीचा वेग दुपटीने वाढला आहे. गेल्या वर्षभरामध्ये अनेक आघाडीच्या कंपन्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामध्ये Twitter, Meta आणि Apple, Amazon अशा आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. Amazon ने आपल्या दुसरी फेरीतील कपात देखील केली आहे. मात्र पुन्हा एकदा कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे.
Amazon ने व्हिडिओ गेमिंग विभागातील सुमारे १०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. सॅन दिएगो स्टुडिओ, प्राइम गेमिंग आणि गेम ग्रोथमध्ये काम करणार्या लोकांना हा निर्णय मोठा धक्का आहे. अमेरिकन कंपनीने याआधीही हजारो लोकांना नोकरीवरून काढून टाकले आहे. आता गेमिंग विभागात काम करणाऱ्या लोकांनाही छाटणीचा त्रास सहन करावा लागणार आहे. कंपनीचा खर्च कमी करण्याचे कारण देत हे पाऊल उचलण्यात आले आहे.
कंपनी अंतर्गत विकास योजनेत गुंतवणूक करत राहील. अहवालानुसार, गेम्सचे उपाध्यक्ष क्रिस्टोफ हार्टमन यांनी मंगळवारी कर्मचार्यांना दिलेल्या मेमोमध्ये लिहिले की आमची संसाधने आमच्या कंटेंटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वापरली जातील. त्यांनी लिहिले की आमचे प्रोजेक्ट्स जसजसे प्रगती करत आहेत तसतसे आमची टीम वाढतच जाईल.
Amazon ने गेमिंग विभागात केलेल्या गुंतवणुकीसाठी खूप संघर्ष केला आहे. यामध्ये क्राउन चॅनल, ट्विच स्ट्रीमिंग सेवेवर चालणारा एक मनोरंजन कार्यक्रम समाविष्ट आहे. ट्विचने अलीकडेच सुमारे ४०० जणांची कपात केली आहे. २०१२ मध्ये विभाग सुरू झाल्यापासून कंपनीने टायटलची विक्री रद्द केली असून, अनेक टायटल्स विक्रीमधून हटवली आहेत.
हेही वाचा : भारतात लॉन्च झाले OnePlus Nord Buds 2 इअरबड्स, २७ तासांचा बॅटरी बॅकअप आणि किंमत फक्त…
Amazon कंपनीने या आधीही कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. दुसऱ्या फेरीमध्ये विविध विभागांमधील तब्बल ९,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. ही कर्मचारी कपात Amazon Web Services, People, Experience, Advertising आणि Tswitch या विभागांमध्ये करण्यात आली आहे.