काही दिवसांपूर्वीच Amazon चा प्राइम डे सेल संपला. या सेलमध्ये अनेक प्रॉडक्ट्सवर भरघोस डिस्काउंट खरेदीदारांना मिळाला. प्राइम डे सेल संपताच काही दिवसांतच ई-कॉमर्स दिग्गज आणखी एका सेलसह पुन्हा आला आहे. अ‍ॅमेझॉनचा ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल 2023 सेल हा ४ ते ८ ऑगस्ट दरम्यान होत आहे. या सेलचे आज आणि उद्या असे दोनच दिवस शिल्लक आहेत. या सेलमध्ये प्राइम मेंबर्सना अर्ली बर्ड प्रवेश मिळाला. हा Amazon गेट फ्रिडम फेस्टिवल सेल हा देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या आधी साजरा केला जात आहे. या ग्रेट फ्रिडम फेस्टिव्हल सेलमध्ये स्मार्टफोनवर देखील डिस्काउंट मिळत आहे. काही स्मार्टफोन सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. आज आपण या सेलमध्ये असे स्मार्टफोन पाहणार आहोत ज्यांची किंमत १० हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

Realme Narzo N53

रिअलमी नाझरो N53 नुकताच भारतात १०,९९९ रुपयांच्या किंमतीमध्ये लॉन्च करण्यात आले होते. आता हा फोन या सेलमधून ८,९९९९ रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. Realme Narzo N53 मध्ये तुम्हाला ६.७४ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा ९० Hz इतका आहे. ब्राईटनेस ४५० नीट्स इतका आहे. हा स्मार्टफोन Octa Core Unisoc T612 SoC वर काम करतो. या फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळते. या फोनला ६ जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट मिळतो.

poco x7 pro and poco x7 launched in india
Poco X7 Series: बजेट फ्रेंडली आणि पॉवर परफॉर्मन्स असलेले पोकोचे दोन फोन लाँच; किंमता आणि फिचर्स जाणून घ्या
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
iphone instagram account using
आयफोनवर एकापेक्षा अधिक इन्स्टाग्राम अकाउंट अ‍ॅड करून त्याचे व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
How To Use Super Coins For Free OTT Subscription
Flipkart: फ्लिपकार्टवरून मोफत OTT सबस्क्रिप्शन कसे मिळवायचे? ‘ही’ पाहा सोपी प्रोसेस
How to send photos wirelessly from Android to iPhone, iPhone to Android
ट्रिपवरुन आल्यावर मित्र आयफोनमधल्या फोटोससाठी मागे लागतात? अशा पद्धतीनं झटकन पाठवा फोटो
Samsung Galaxy S25 series arriving on January 22
‘Samsung Galaxy S Series’ साठी प्री-बुकिंग कशी करायची? जाणून घ्या प्रोसेस आणि फायदे
Amazon Flipkart announce Republic Day sale 2025
ॲमेझॉन, फ्लिपकार्टचा ‘Republic Day sale’ कधी होणार सुरू? काय असणार ऑफर्स; जाणून घ्या एका क्लिकवर

हेही वाचा : Amazon Great Freedom Festival sale 2023: ‘या’ आयफोनसह वनप्लस,रेडमीच्या स्मार्टफोन्सवर किती डिस्काउंट मिळणार? ऑफर्स एकदा पाहाच

Redmi 12C

या फोनमध्ये वापरकर्त्यांना ६.७१ इंचाचा HD+ डिस्प्ले मिळणार आहे. ज्यामध्ये ६० Hz चा रिफ्रेश रेट मिळणार आहे. तसेच वॉटरड्रॉप नॉच देण्यात आला आहे. याचे पिक्सल रिझोल्युशन हे १६००×७२० इतके आहे. तसेच तुम्हाला यामध्ये ५००० mAh ची बॅटरी आणि त्याला १०W चा चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G LTE, Wi-Fi, Bluetooth, GPS आणि मायक्रोयूएसबी पोर्टसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. रेडमीने लॉन्च केलेल्या या स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा FFHD + AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. Redmi 12C अ‍ॅमेझॉन सेलमध्ये मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. याची मूळ किंमत १३,९९९ रुपये आहे. मात्र या सेलमध्ये तुम्ही हा फोन ८,४९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Redmi A2

Redmi A2 हा स्मार्टफोन Amazon वर ३,३३० रुपयांना उपलब्ध असेल. या फोनला ८,९९९ रुपयांना लॉन्च करण्यात आले होते. ग्रेट फ्रिडम फेस्टिव्हल सेलमध्ये Amazon त्याची किंमत ५,६९९ रुपयांपर्यंत कमी करणार आहे.

Samsung Galaxy M04

सॅमसंग गॅलॅक्सी M04 हा स्मार्टफोन खरेदीदार ग्रेट फ्रिडम फेस्टिव्हल सेलमधून फक्त ६,९९९ रुपयांना खरेदी करू शकतात. यावर Amazon ४,५०० रुपयांचा डिस्काउंट देत आहे. हा स्मार्टफोन भारतात ११,४९९ रुपयांना लॉन्च करण्यात आला होता.

हेही वाचा : Amazon Great Freedom Festival sale 2023: ‘या’ आयफोनवर मिळणार भरघोस डिस्काउंट; इतर प्रॉडक्ट्सवरील ऑफर्स पहाच

Samsung Galaxy M13

Samsung Galaxy M13 स्मार्टफोन २४०८×१०८० पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.६ इंचाचा फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले दाखवतो. संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये octa-core Exynos 850 चिपसेट आणि ग्राफिक्ससाठी Mali G52 GPU आहे. फोनमध्ये ४ GB आणि ६ GB रॅमसह ६४ GB आणि १२८ GB स्टोरेज ऑप्शन आहेत. सॅमसंग गॅलेक्सी M13 सेल दरम्यान ९,६९९ रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. तर स्मार्टफोनची मूळ किंमत ही १४,४९९ रुपये आहे.

Story img Loader