Amazon’s Great Freedom Festival Sale: ॲमेझॉनने (Amazon) भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एक आठवडाभर आधीच ‘ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेल’ची (Amazon’s Great Freedom Festival) घोषणा केली आहे. हा ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेल ६ ऑगस्टपासून १५ ऑगस्टपर्यंत ॲमेझॉनवर लाइव्ह असणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना लॅपटॉप, स्मार्टवॉच, हेडफोन्स यांसारख्या इतर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर ७५ टक्क्यांपर्यंत सूट असेल. त्याचप्रमाणे वॉशिंग मशीन व रेफ्रिजरेटर यांसारख्या उत्पादनांवर ६५ टक्क्यांपर्यंत सूट असेल.

पोको (POCO), सॅमसंग (Samsung), वनप्लस (OnePlus), एचपी (HP), बोट (boAt), सोनी (Sony), एलजी (LG), फायर टीव्ही स्टिक (Fire TV Stick) व प्ले स्टेशन (PlayStation) यांसारख्या टॉप कंपन्या या सेलमध्ये सहभागी होणार आहेत. वर नमूद केलेल्या ऑफरवर एसबीआय (SBI) कार्ड ग्राहक ईएमआय (EMI) आणि नॉन-ईएमआय अशा दोन्ही व्यवहारांवर १० टक्के सवलत मिळवू शकतात.

New Honda Dio 2025
New Honda Dio 2025 : ७५ हजारांमध्ये लाँच झाली नवीन होंडा डियो; जाणून घ्या, काय आहेत नवीन फीचर्स
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
How To Use Super Coins For Free OTT Subscription
Flipkart: फ्लिपकार्टवरून मोफत OTT सबस्क्रिप्शन कसे मिळवायचे? ‘ही’ पाहा सोपी प्रोसेस
Samsung Galaxy S25 series arriving on January 22
‘Samsung Galaxy S Series’ साठी प्री-बुकिंग कशी करायची? जाणून घ्या प्रोसेस आणि फायदे
Amazon Flipkart announce Republic Day sale 2025
ॲमेझॉन, फ्लिपकार्टचा ‘Republic Day sale’ कधी होणार सुरू? काय असणार ऑफर्स; जाणून घ्या एका क्लिकवर
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ झाला डिजिटल; AI आणि ड्रोन्सची करडी नजर, शिवाय बरेच काही!
How to Clean Phone Charger
पांढरा चार्जर काळपट दिसू लागलाय? मग ‘या’ सोप्या उपायाने एका झटक्यात चार्जर करा चकाचक

हेही वाचा…Apple: पासवर्ड विसरलात अन् फोन झाला लॉक? चिंता सोडा! आता हृदयाच्या ठोक्यांसह करता येईल फोन अनलॉक?

ॲमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिवल २०२४ मधील टॉप डील्स :

ॲमेझॉनने याआधीच आगामी ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेलमधील काही स्मार्टफोन्सच्या मॉडेल्सच्या नावांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये आयफोन १३ (iPhone 13), वनप्लस १२ आर (OnePlus 12R), गॅलेक्सी एस२४ (Galaxy S24), मोटो राझर ५० अल्ट्रा (Moto Razr 50 Ultra), लावा ब्लेझ एक्स (Lava Blaze X) आदी काही लोकप्रिय स्मार्टफोन्सचा समावेश आहे.

ॲमेझॉनच्या सेलमध्ये आयफोन १३ तुम्हाला १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसह ४७,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध असेल आणि वनप्लस १२ आर हा स्मार्टफोनसुद्धा ४०,९९९ रुपयांसह सर्व ऑफर्सनिशी विक्रीसाठी उपलब्ध असेल. सॅमसंग गॅलेक्सी एस२४ ५जी सारखे फोन ७४,९९९ रुपयांच्या पोस्ट-बँक ऑफरमध्ये विकले जातील आणि नवीन मोटोरोला राझर ५० अल्ट्रादेखील विक्रीसाठी उपलब्ध असेल. स्वस्त, फोल्डेबल स्मार्टफोन शोधणारे ग्राहक राझर ४० (Razr 40) सीरिजसारख्या उपकरणांचा विचार करू शकतात; ज्याची किंमत ३४,९९९ रुपये इतकी आहे.

Story img Loader