Amazon इंडिया ही एक लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाईट आहे. यावरून खरेदीदार त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी करू शकतात. या वस्तू खरेदी करत असताना त्यांना अनेक प्रकारचे डिस्काउंट आणि आकर्षक ऑफर्स मिळत असतात. तसेच कंपनी ग्राहकांसाठी अनेक प्रकारचे सेल घेऊन येत असते. अॅमेझॉन इंडियाने आपल्या आगामी फेस्टिव्हल सेल म्हणजेच ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२३ ८ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या सेलमधील काही डिल्सबाबत कंपनीने खुलासा केला आहे. आयफोन १३ च्या बेस व्हेरिएंट ४० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध असणार आहे. याप्रमाणेच मॅकबुक एअरच्या किंमतीत मोठी कपात झाली आहे. सध्या मॅकबुक एअर सध्या ६९,९९० रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
आयफोन १३ ला २०२१ मध्ये भारतात ७९,९०० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आले होते. मागील काही महिन्यांमध्ये स्मार्टफोन्सवर मोठी सूट मिळत आहे. तसेच ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल दरम्यान हे डिव्हाइस ४० हजारांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध असेल. आयफोन १५ लॉन्च झाल्यानंतर Apple ने आयफोन १३ ची किंमत कमी करून ५९,९०० रुपये इतकी केली आहे. याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.
आयफोन १३ ज्यांना ४० हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करायचा आहे त्यांना SBI बॅंकचे कार्ड वापरण्याची आवश्यकता आहे. तसेच ३९,९९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी तुम्हाला तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करावा लागणार आहे. याप्रमाणेच MacBook Air M1(review) सध्या Amazon वर केवळ ६९,९९० रुप्यांकमध्ये उपलब्ध आहे. हा सर्वात परवडणारा Apple मॅकबुक समजला जातो. जो कोणीही भारतात खरेदी करू शकतो. यामध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मिळते. हे प्रॉडक्ट ९२,९०० रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आले होते.