Amazon एक ई-कॉमर्स साईट आहे, जिथून ग्राहक आपल्याला हव्या असलेल्या वस्तू खरेदी करू शकतात. ॲमेझॉन ‘ग्रेट रिपब्लिक डे’ २०२४ चा सेल अगदी जवळ आला आहे आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने त्याच्या वेबसाइटवर सेल इव्हेंटची माहिती शेअर करण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी, ॲमेझॉन प्रजासत्ताक दिनाच्या काही दिवस आधी विक्रीचा भाग म्हणून स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब्लेट, ऑडिओ आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर सवलत देत असते; तर ॲमेझॉन सेलमध्ये ग्राहकांना कोणत्या वस्तूंवर किती सूट मिळेल हे आपण पाहू…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ई-कॉमर्स दिग्गज कंपनीने त्यांच्या वेबसाइटवर आगामी ॲमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे कधी सुरू होणार याची तारीख जाहीर केली नाही. पण, गेल्या वर्षी १५ जानेवारी रोजी हा सेल सुरू झाला होता. ग्राहकांना या वर्षीदेखील अशाच टाइमलाइनची अपेक्षा आहे. वेबसाइटने हेदेखील घोषित केले आहे की, ॲमेझॉन प्राइम सदस्य आगामी सेलमध्ये बाकी ग्राहकांच्या आधी वस्तू खरेदी करू शकतील.

हेही वाचा…तब्बल ३० वर्षांनंतर Microsoft ने केला आपल्या Keybord मध्ये बदल! नेमकं प्रकरण काय?

आगामी सेलदरम्यान ॲमेझॉन स्मार्टफोन आणि ॲक्सेसरीजवर ४० टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. तसेच सेलमध्ये ५जी ( 5G) स्मार्टफोन्सची सुरुवात ९,९९९ रुपयांपासून सुरू होईल. त्याचप्रमाणे, लॅपटॉप आणि स्मार्टवॉचवर ७५ टक्के सवलतीसह उपलब्ध असतील, तर स्मार्ट टीव्ही आणि इतर उपकरणे ६५ टक्के सवलतीने ग्राहकांना खरेदी करता येतील.

ॲमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेलदरम्यान अनेक उत्पादनांवरील सवलतींव्यतिरिक्त, एसबीआय बँकेचे ग्राहक क्रेडिट कार्ड आणि इएमआय व्यवहारांवर १० टक्के सवलतींचा लाभ ग्राहक घेऊ शकतात. तसेच जुने डिव्हाइस एक्स्चेंज केल्याने विक्रीदरम्यान ई-कॉमर्स वेबसाइटद्वारे खरेदी केलेल्या उत्पादनाची किंमत आणखी कमी करण्यात मदत होईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amazon great republic day sale 2024 with discounts on mobiles laptops announced for customers asp
Show comments