Amazon ने आपल्या वेबसाईटवर Great Republic Day Sale ची घोषणा केली आहे. हा चार दिवसांचा सेल सोमवार १७ जानेवारीपासून सुरू होईल आणि २० जानेवारीपर्यंत चालेल. अॅमेझॉनचा दावा आहे की या सेल अंतर्गत स्मार्टफोन, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक्स आणि मोठ्या उपकरणांवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोनवर ४० टक्के सूट, कॅमेरा आणि लॅपटॉपवर ७० टक्के सूट, Amazon Alexa, Fire TV आणि Kindle उपकरणांवर ५० टक्के सूट मिळू शकते. चला जाणून घेऊया सर्व ऑफर्स आणि सवलतींबद्दल…
Amazon च्या बंपर सेलमध्ये झटपट बँक सवलत आणि नो-कॉस्ट EMI पर्यायांचाही समावेश असणार आहे. नेहमीप्रमाणे, यावेळीही प्राइम ग्राहकांना Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये २४ तास अगोदर प्रवेश मिळेल. प्राइम मेंबर्स १६ जानेवारीपासून मध्यरात्री १२ वाजता या सेलचा लाभ घेऊ शकतात.
आणखी वाचा : धुमाकूळ घालायला आलाय OPPO चा सर्वात स्लीम स्मार्टफोन, १० हजार रुपयांमध्ये मिळणार हे फीचर्स
Amazon सेलमध्ये Apple, iQoo, OnePlus, Samsung, Tecno आणि Xiaomi सारख्या स्मार्टफोन ब्रँडच्या स्मार्टफोनवर ४० टक्के सूट मिळेल. याशिवाय, Redmi, OnePlus, Sony, Samsung आणि Xiaomi ब्रँड्सच्या टेलिव्हिजनवर ६० टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. तसेच, Intel, HP, Boat, Lenovo, Asus, Dell, Samsung, LG आणि Sony यांसारख्या कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीजवर ७० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येतेय.
Amazon ने ग्रेट रिपब्लिक डे सेल दरम्यान ऑफर केलेल्या डील, सवलती आणि ऑफरसाठी त्यांच्या वेबसाइटवर लाइव्ह केलं आहे. या वेबपेजवर पाहिल्याप्रमाणे, सेलमध्ये लॅपटॉपवर ४० हजार रुपयांपर्यंत सूट असेल, तर २९९ रुपयांपासून हेडफोन्सवर २५० हून अधिक डील उपलब्ध असतील. सोबतच कॅमेरावर ५० टक्के आणि स्मार्टवॉचवर ६० टक्क्यांपर्यंत सूट असेल.
आणखी वाचा : EPFO Update: जर तुम्ही ईपीएफ खात्याशी संबंधित हे काम केलं नाही, तर तुम्ही पासबुकचे डिटेल्स पाहू शकणार नाहीत
या सेलमध्ये व्हिडीओ गेम्सवर ५५ टक्के सूट देखील देण्यात आली आहे. तर फायर टीव्ही उपकरणांवर ४८ टक्के सूट मिळेल. इको स्मार्ट स्पीकरबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला त्यावर ५० टक्के सूट मिळेल. किंडल वाचकांना ३,४०० रुपयांपर्यंत सूट मिळेल. इको स्मार्ट डिस्प्लेवर ४५ टक्के सूट सेलमध्ये उपलब्ध असेल.