Amazon Great Republic Day Sale 2023 : Amazon ने २६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त खास सेलची घोषणा केली आहे. ‘Amazon ग्रेट रिपब्लिक डे’ असे या सेलचे नाव आहे. हा सेल १५ जानेवारी ते २० जानेवारी २०२३ असा असणार आहे. यातील विशेष गोष्ट म्हणजे अॅमेझॉन प्राईमचे मेंबर असणाऱ्यांना १८ जानेवारी पासून या सेलमधील ऑफर्सचा फायदा घेता येणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, अॅक्सेसरीज, गॅझेट्स, कपडे यासह इतर अनेक गोष्टींवर डिस्काउंट आणि कॅशबॅक ऑफर्स असणार आहेत. काही कंपन्यांचा स्मार्टफोन्सवर तब्बल ४० टक्क्यांची भरघोस सूट मिळणार आहे. कोणत्या स्मार्टफोन्सवर ही सूट मिळते आहे ते आपण पाहुयात.
Redmi Note 10S
Redmi Note 10S या स्मार्टफोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज उपलब्ध असणार आहे. हा फोन तुम्हाला या सेलमध्ये १४,९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. एसबीआय कार्ड्सने पेमेंट केल्यास १० टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. यात ग्राहकांना एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. याची बॅटरी ५०००mAh क्षमतेची आहे.
Xiaomi 11 Lite 5G NE
या स्मार्टफोन या सेलमध्ये २५,९९९ रुपयांना मिळणार आहे. एसबीआय क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यास १००० रुपयांची अतिरिक्त सूट मिळणार आहे. या फोनला गोरिला ग्लासचे प्रोटेक्शन आहे. यामध्ये १२८ जीबी इन्टर्वल स्टोरेज आणि ८ जीबी रॅम येते. यात ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा , अल्ट्रा वाईड सेन्सर आणि सेल्फीसाठी २० मेगापिक्सलचा सेन्सर कॅमेरा येतो. याची बॅटरी ४२५० क्षमतेची येते.
हेही वाचा : Amazon Republic Day Sale: Alexa स्पीकरपासून किंडलपर्यंत मिळत आहे मोठी सूट; जाणून घ्या
Samsung Galaxy M32
तुम्ही जर सॅमसंगचे स्मार्टफोन्स खरेदी करण्यासाठी इच्छुक असाल तर, हा स्मार्टफोन तुमच्यासाठी एकदम मस्त आहे. Samsung Galaxy M32 या फोनमध्ये २१ टक्के सूट दिल्यावर हा फोन तुम्हाला १३,४९९ मिळणार आहे. एसबीआय क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यास सूट देखील मिळणार आहे. या फोनची बॅटरी ६००० mAh क्षमतेची आहे. ६४ मेगापिक्सल कवाड कॅमेरा आणि फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे.
Tecno Pova 2
या स्मार्टफोनची बॅटरी ७०००mAh क्षमतेची येते. २१ टक्के डिस्काउंट दिल्यानंतर हा फोन तुम्हाला १०,५९९ रुपयांना मिळणार आहे. याचा डिस्प्ले ६.९५ इंचाचा येतो. ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा येतो.