सध्या जगभरामध्ये अनेक दिग्गज टेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांची कपात केली जात आहे. यामध्ये Amazon, Google, Meta, Apple, आणि Microsoft या दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे. यामध्ये काही कंपन्यांनी दोन वेळा सुद्धा कपात केले आहे. Amazon India बाबत आणखी एक माहिती समोर येत आहे. कंपनीमध्ये पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. नक्की किती कपात करण्यात आली आहे व कोणत्या विभागामध्ये ते जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Amazon India ने Amazon Web Services (AWS) आणि पीपल एक्सपीरिअन्स अँड टेक्नॉलॉजी सोल्युशन्स (PXT) वर्टिकलमधील कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. याबाबतचे वृत्त बिझनेस टुडेने दिले आहे. आता करण्यात आलेली कर्मचारी कपात याबाबदल मार्च महिन्यातच घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी कंपनीचे सीईओ अँडी जस्सी म्हणाले होते या कपातीमध्ये ९,००० कर्मचारी प्रभावित होतील. यावेळच्या कपातीमध्ये कंपनीने भारतीय टीममधील कर्मचाऱ्यांना पिंक स्लिप्स दिल्या आहेत.

हेही वाचा : Twitter CEO पदी निवड झाल्यानंतर लिंडा याक्करिनो यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “उज्वल भविष्यासाठी मस्क यांच्या…”

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ४००ते ५०० कर्मचाऱ्यांना या कपातीचा फटका बसला आहे. तसेच या कपातीमध्ये PXT विभागातून सुमारे १०० कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. PXT विभाग हा कंपनीच्या HR विभागामधील एक आहे. कंपनीच्या डेटा मॅनेजमेंट विभागातील एका कर्मचाऱ्याने सांगितले, “विभागातून ८० पेक्षा जास्त लोकांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई आणि वैद्यकीय विम्याचे फायदे देण्यात येणार आहेत.

AWS चे सीईओ अ‍ॅडम सेलिपस्की यांनी एप्रिलमध्ये दिलेल्या इंटर्नल मेमोमध्ये ग्घोषणा केली होती की, , AWS मध्ये कर्मचारी कपात ही उत्तर अमेरिकेतील टीम्समधून करण्यात येईल व नंतर जागतिक स्तरावर करण्यात येईल. आर्थिक मंदी आणि कंपनीच्या महसुलामध्ये झालेली घट ही दोन प्रमुख कारणे यामागे असल्याचे त्यांनी सांगितले होते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amazon india layoff pxt hr team and web services ceo andy jassy 9000 layoffs march 2023 tmb 01