Amazon Plan to Fire 1000 Employees: जगातील ई-काॅमर्स कंपनी Amazon India मध्ये मोठ्या प्रमाणात नोकरकपात सुरु आहे. आता नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, ट्विटर आणि मेटा नंतर जगातील सर्वात मोठी कंपनी Amazon ने कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्याचा निर्णय घेतला आहे.अॅमेझॉन भारतातील तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांना काढणार आहे. तर जगभरातील Amazon India एकूण १८,००० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकणार असल्याची माहिती कंपनीचे सीईओ अँडी जेस्सी यांनी दिली आहे.
अँडी जेस्सीच्या वतीने एक नोटीस जारी करुन सांगण्यात आले आहे की, जागतिक मंदीमुळे जगभरातील कंपन्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवत आहेत. कंपनी १८,००० कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करणार आहे. त्याचवेळी, यापूर्वी कंपनीने १०,००० कर्मचार्यांच्या बाहेर पडण्याबद्दल सांगितले होते.
(हे ही वाचा : Amazon Sale मध्ये बंपर डिस्काउंट! Samsung सह ‘हा’ तगडा स्मार्टफोन मिळताेय ‘इतक्या’ स्वस्तात )
येत्या आठवड्यात कर्मचारी कपात होणार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, Amazon India येत्या आठवड्यात भारतातील १ हजाराहून अधिक कर्मचार्यांना काढून टाकण्याची योजना आखत आहे, जे संपूर्ण कर्मचार्यांच्या १ टक्के आहे. Amazon Global ने एका दिवसापूर्वी जगभरातील सुमारे १८,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केल्यानंतर ही बातमी समोर आली आहे.
रिपोर्टमधून समोर आलेल्या माहितीनुसार, २०२३ च्या सुरुवातीला आणखी कपात होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी, मेटा ने व्यवसाय पुनर्रचना आणि खर्चात कपात करण्याचा भाग म्हणून जागतिक स्तरावर आपल्या १३,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते.