Amazon एक ई-कॉमर्स साईट आहे. जिथून ग्राहक आपल्याला हव्या असलेल्या वस्तू खरेदी करू शकतात. भारतीय बाजारासाठी Amazon प्राइम डे सेलची घोषणा करण्यात आली आहे. हा सेल केवळ ४८ तास म्हणजे दोन दिवसांसाठी असणार आहे. अ‍ॅमेझॉनच्या अधिकृत पेजवर हे दिसते की इलेक्ट्रॉनिक्स आणि लॅपटॉप, इअरफोन्स घड्याळे अशा डिव्हाइसवर ७५ टक्के सूट देणार आहे. अ‍ॅमेझॉनवर मोबाइलवर ४० टक्क्यांपर्यंत सूट देईल. तर स्मार्ट टीव्ही आणि घरगुती डिव्हाइसवर ६० टक्क्यांपर्यंत सूट देईल.

अ‍ॅमेझॉन डे प्राइम सेलच्या पेजवरून अशी माहिती मिळते की, Realme Narzo N53, OnePlus Nord CE 3 Lite 5G, OnePlus 11R 5G, iPhone 14, Redmi 12C, iQOO Z6 Lite आणि अन्य स्मार्टफोन्सवर सूट मिळणार आहे. मात्र अ‍ॅमेझॉनकडून ऑफर आणि किंमती जाहीर करण्यात आलेले नाही. ”स्मार्टफोन इलेक्ट्रॉनिक्स, डिव्हाईस आणि बऱ्याच गोष्टींवर सूट देईल असे आश्वासन अ‍ॅमेझॉन देत आहे. ग्राहकांना इको (अ‍ॅलेक्सासह), फायर टीव्ही आणि किंडल डिव्हाइसवर या प्राइम डे वर सर्वोत्तम डील मिळेल. नवनवीन स्मार्ट स्पीकर, स्मार्ट डिस्प्ले आणि फायर टीव्ही प्रॉडक्ट्सवर ५५ टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Dog Viral Video
श्वानाला झोप अनावर झाल्यानं बसल्या जागी केलं असं काही… VIDEO पाहून पोट धरून हसाल
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच
JEE Advanced 2025 New Eligibility Rules
JEE Advanced 2025 : जेईई ॲडव्हान्स्डच्या विद्यार्थ्यांना आता तीन वेळा देता येणार परीक्षा; आजच करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
check your PF balance instantly without UAN Number
EPF missed call service: UAN नंबरशिवाय तपासू शकता PF बॅलेन्स, जाणून घ्या सोपी पद्धत
Gold Silver Price Today 08 November 2024 in Marathi
Gold Silver Price Today : लग्नसराईपूर्वी सोने -चांदीच्या दरात घसरण! जाणून घ्या आजचा तुमच्या शहरातील दर

हेही वाचा : Twitter वर युजर्सना मनमोकळेपणाने लिहिता येणार; ब्लू सबस्क्रायबर्ससाठी कंपनीने घेतला ‘हा’ निर्णय

सेल इव्हेंटची घोषणा करताना कंपनीने असा दावा केला की, भारतातील ग्राहक सर्वात वेगवान डिलिव्हरीचा आनंद घेतील. भारतातील २५ शहरांमधून ऑर्डर करणारे प्राइम मेंबर्स त्याच दिवशी किंवा ऑर्डर केल्याच्या दुसऱ्या दिवशी डिलिव्हरीचा आनंद घेऊ शकतील.” या २५ शहरांमध्ये हमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, चेन्नई, कोईम्बतूर, दिल्ली, फरिदाबाद, गांधी नगर, गुंटूर, गुडगाव, हैदराबाद, इंदूर, जयपूर, कोची, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नोएडा, पाटणा, पुणे, ठाणे, तिरुअनंतपुरम यांचा समावेश आहे.

तसेच कंपनीने खुलासा केला की आगामी Amazon प्राइम डे सेलमध्ये ICICI बँकचे कार्ड, SBIचे क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहार पेमेंटवर १० टक्के सूट मिळेल. प्राइम डे २०२३ साठी सर्व ग्राहकांना Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास १० टक्क्यांची झटपट सूट मिळेल. या खरेदी फायद्यांव्यतिरिक्त हे कार्ड Amazon वर प्रवास बुकिंग, बिल पेमेंट आणि बरेच काही अमर्यादित लाभांसह येते.

कंपनीने जाहीर केलेल्या तपशीलानुसार प्राइम मेंबर्स Amazon Pay ICICI बँक क्रेडिट कार्डसाठी साइन अप करू शकतात आणि २,५०० रुप, ये ३०० रुपये कॅशबॅक (केवळ प्राइमसाठी) सह २,२०० पर्यंतची बक्षिसे मिळवण्यास पात्र ठरू शकतात. नॉन प्राइम मेंबर्स देखील साइन अप करू शकतात आणि २०० रुपयांचा कॅशबॅक , १,८०० रुपयांची बक्षिसे आणि ३ महिन्यांचे मोफत प्राइम मेंबरशिप मिळवू शकतात.

हेही वाचा : Paytm युजर्ससाठी आनंदाची बातमी! ‘या’ फीचरमुळे पेमेंट करणे होणार जलद, कसे वापरायचे ते पाहा

विशेष बाब म्हणजे , प्राइम मेंबर्सना Amazon Pay पेमेंट करण्यासाठी वापरले असता उबरसह अनलिमिटेड राईड्सवर ५ टक्के कॅशबॅकचाही आनंद घेऊ शकतात. तथापि हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, ५ टक्क्यांपैकी त्यांना ४ टक्के उबर क्रेडिट आणि १ टक्के Amazon pay कॅशबॅक मिळेल. Amazon चा हा सेल इव्हेंट १५ आणि १६ जुलै रोजी होणार आहे.