Amazon एक ई-कॉमर्स साईट आहे. जिथून ग्राहक आपल्याला हव्या असलेल्या वस्तू खरेदी करू शकतात. भारतीय बाजारासाठी Amazon प्राइम डे सेलची घोषणा करण्यात आली आहे. हा सेल केवळ ४८ तास म्हणजे दोन दिवसांसाठी असणार आहे. Amazon कंपनीने असे काही फोन्सची यादी तयार केली आहे ज्यावर आगामी सेलमध्ये डिस्काउंट मिळणार आहे. विक्रीदरम्यान अनेक किंमतीमधील स्मार्टफोन उपलब्ध असणार आहेत. ज्यांचे बजेट १५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे त्यावर सेलमध्ये डिस्काउंट मिळणार आहे. हा डिस्काउंट केवळ भारतात मिळणार आहे.

Amazon प्राईम डे सेलदरम्यान ज्या बजेट फोन्सवर डिस्काउंट मिळणार आहे ज्यामध्ये सॅमसंग Galaxy M14, iQOO Z6 Lite, रिअलमी Narzo N53, रेडमी 12C आणि Tecno Spark 9 यांचा समावेश आहे. हे सर्व स्मार्टफोन्स अ‍ॅमेझॉनच्या प्राईम डे च्या पेजवर आहेत. ज्यांची किंमत सध्या १५ हजार रुपयांच्या खाली आहे. याबाबतचे वृत्त India Today ने दिले आहे.

iphone instagram account using
आयफोनवर एकापेक्षा अधिक इन्स्टाग्राम अकाउंट अ‍ॅड करून त्याचे व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
How to send photos wirelessly from Android to iPhone, iPhone to Android
ट्रिपवरुन आल्यावर मित्र आयफोनमधल्या फोटोससाठी मागे लागतात? अशा पद्धतीनं झटकन पाठवा फोटो
Amazon Flipkart announce Republic Day sale 2025
ॲमेझॉन, फ्लिपकार्टचा ‘Republic Day sale’ कधी होणार सुरू? काय असणार ऑफर्स; जाणून घ्या एका क्लिकवर
Anand Mahindra takes a swipe at L&T chairman comment
Anand Mahindra: ‘बायकोला पाहत बसणं मला आवडतं’, आनंद महिंद्रा यांचा उपरोधिक टोला; वर्क लाइफ बॅलन्सवर सडेतोड भूमिका
Game Changer vs Fateh Box Office Collection Day 1
‘गेम चेंजर’ व ‘फतेह’पैकी बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजली? दोन्ही सिनेमांच्या कमाईचे आकडे आले समोर
Vaikuntha Ekadashi Vrat
Vaikuntha Ekadashi 2025: गूगलवर ट्रेंड होतेय २०२५ मधील पहिली एकादशी; जाणून घ्या एकादशीचा शुभ मुहूर्त आणि तिथी

हेही वाचा : Reliance Jio च्या देशातल्या सर्वात स्वस्त फोनचे ‘हे’ रीचार्ज प्लॅन्स तुम्हाला माहिती आहेत का? वर्षभर अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार…

रिअलमी N53 सध्या १०,९९९ रुपयांना विकला जात आहे. तर iQOO Z6 Lite ची किंमत १३,९९९ रुपये आहे. सॅमसंग गॅलॅक्सी M14 जो १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचा सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन आहे. त्याची किंमत १४,४९० रुपये आहे. रेडमी १२ सी ची किंमत ८,४९९ रुपये आणि Tecno Spark 9 ७,९९९ रुपयांना Amazon द्वारे खरेदी केले जाऊ शकतात. या फोनवर डिस्काउंट मिळेल असे टिझरमध्ये असे सांगण्यात आल्याने हे फोन्स आणखी कमी किंमतीमध्ये मिळण्याची शक्यता आहे.

Amazon प्राईम डे सेल पेजवरवरून अशी माहिती मिळते की, वनप्लस नॉर्ड सीई ३ लाईट ५जी , वनप्लस ११ आर ५जी, आयफोन १४ आणि आयफोन १४ प्लस आणि अन्य स्मार्टफोन्सवर डिस्काउंट मिळणार आहे. मात्र ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे सर्व मॉडेल्सवरील डिस्काउंट ऑफर्स आणि त्यानंतर त्याच्या किंमती किती होणार हे अद्याप उघड करणे बाकी आहे. मात्र Amazon प्राईम डे सेलमध्ये ICICI बँक कार्ड, SBI क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहाराद्वारे पेमेंट केल्यास १० टक्के डिस्काउंट मिळणार आहे.

मात्र यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे विक्री केवळ प्राईम मेंबर्ससाठीच उपलब्ध असणार आहे. Amazon प्राईम मेंबरशिप ५० टक्के कॅशबॅक ऑफरसह उपलब्ध आहे आणि लोक ते अगदी कमी किंमतीमध्ये मिळवू शकतात. ही ऑफर प्राईम डे सेल इव्हेंटच्या काही दिवस अगोदरपासून उपलब्ध आहे.

Amazon Prime Day Sale: अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलच्या तारखा जाहीर; ‘या’ २५ शहरांमध्ये मिळणार…, जाणून घ्या

Amazon प्राईमचा महिन्याचा प्लॅन २९९ रुपयांचा आहे. या प्लॅनवर १५० रुपयांची कॅशबॅक ऑफर उपलब्ध आहे. तर प्राईमचा १,४९९ रुपयांचा वार्षिक प्लॅन ७५० रुपये कॅशबॅक ऑफरसह उपलब्ध आहे. म्हणजेच प्राईमचा महिन्याचा प्लॅन तुम्हाला केवळ १४९ रुपये होणार आहे. तसेच वार्षिक प्लॅनची किंमत ही ७४९ रुपये होणार आहे.

मात्र या ऑफरमध्ये काही निकष ठेवण्यात आले आहेत. Amazon प्राईम मेंबरशिप ऑफरचा फायदा केवळ १८ ते २४ वर्षे वयोगटातील लोकांना मिळणार आहे. तसेच तुम्ही कॅशबॅक ऑफरसाठी पात्र आहात हे Amazon ला कळवण्यासाठी तुम्हाला पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या व्यतिरिक्त, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की कॅशबॅक तुम्हाला Amazon Pay बॅलेन्स म्हणून परत केला जाईल.

Story img Loader