Amazon एक ई-कॉमर्स साईट आहे. जिथून ग्राहक आपल्याला हव्या असलेल्या वस्तू खरेदी करू शकतात. भारतीय बाजारासाठी Amazon प्राइम डे सेलची घोषणा करण्यात आली आहे. हा सेल केवळ ४८ तास म्हणजे दोन दिवसांसाठी असणार आहे. या सेलमध्ये असणाऱ्या ऑफर्स या केवळ प्राईम मेंबर्ससाठीच उपलब्ध असणार आहेत. विक्रीदरम्यान अनेक किंमतीमधील स्मार्टफोन उपलब्ध असणार असून त्यावर डिस्काउंट मिळणार असल्याचे जाहीर केले आहे. हा डिस्काउंट केवळ भारतात मिळणार आहे.
Amazon प्राईम डे सेल २०२३ हा १५ आणि १६ जुलै रोजी होणार आहे. सेलच्या आधी कंपनीने उघड केले की, स्मार्टफोन सेगमेंटमध्ये बँक ऑफर सोडून ४० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. सेल दरम्यान, OnePlus Nord 3, iQOO Neo 7 Pro, Realme Narzo 60, आणि Motorola Razr 40 Ultra यासह निवडक स्मार्टफोन्स सवलतीसह (बँक ऑफरसह) उपलब्ध असतील. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.
Amazon ने प्राइम डे विक्री सुरू होण्यापूर्वी ग्राहकांना चांगली निवड करण्यास मदत करण्यासाठी स्मार्टफोनच्या कमी केलेल्या किंमती देखील उघड केल्या आहेत. तुम्ही तुमचे जुने डिव्हाइस अपग्रेड करण्याचा प्लॅन करत असल्यास येथे काही पर्याय आहेत जे तुम्ही तपासू शकता.
OnePlus Nord 3
नवीन OnePlus Nord 3 ची सुरुवातीची किंमत ३३,९९९ रुपये इतकी आहे. ICICI बँक किंवा SBI बँकेचे कार्ड असलेले वापरकर्ते या फोनच्या खरेदीवर १० टक्के डिस्काऊंटचा आनंद घेऊ शकतात. हा फोनमध्ये ८० W चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये Dimenstiy 9000 SoC आणि ५० मेगापिक्सलचा सोनी IMX 890 OIS कॅमेरा देण्यात आला आहे.
iQOO Neo 7 Pro
नवीन Snapdragon 8+ Gen 1 SoC-संचालित iQOO Neo 7 Pro Rs 33,999 च्या MRP वरून 31,999 रुपयांना उपलब्ध होईल. फोनमध्ये 50-मेगापिक्सेल OIS कॅमेरा देखील आहे आणि 120W फ्लॅशचार्जला सपोर्ट करतो. iQOO चा दावा आहे की 5,000mAh बॅटरी असलेला फोन बंडल केलेल्या चार्जरसह 30 मिनिटांत पूर्ण चार्ज होईल.
Motorola Razr 40 Ultra
मोटोरोला Razr 40 Ultra हा फोन देखील प्राईम सेल दरम्यान विक्रीसाठी असणार आहे. ग्राहक हा फोन ८९,९९९ रुपयांऐवजी ८२,९९९ रुपयांना खरेदी करू शकता.
मोटो Razr 40 Ultra या फोनच्या डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये समोरील आणि मागील बाजूस गोरिला ग्लास व्हिक्टसचे संरक्षण आणि स्क्वेरिश क्लॅमशेल डिझाइन देण्यात आले आहे. तसेच यात ७००० ऍल्युमिनिअम फ्रेम देखील मिळते. वापरकर्त्यांना यामध्ये ६.९ इंचाचा फोल्डेबल फुल एचडी प्लस pOLED १० बीट डिस्प्ले मिळणार आहे. या डिस्प्लेमध्ये १४०० नीट्सचा ब्राईटनेस आणि १६५ Hz इतका रिफ्रेश रेट मिळणार आहे. तसेच या फोनमध्ये वापरकर्त्यांना ३.६ इंचाचा फ्लेक्सिबल AMOLED आऊटर डिस्प्ले मिळणार आहे. यामध्ये ११०० नीट्सचा ब्राईटनेस, १४४ Hz इतका रिफ्रेश रेट आणि ३६० Hz इतका टच सॅम्पलिंग रेट, App सपोर्ट ,Moo लाईव्ह एडेप्टिव वॉलपेपर असे काही फीचर्स मिळणार आहेत.
Realme Nazro 60
तुम्हाला जास्त स्टोरेज असलेला स्मार्टफोन हवा असेल तर तुम्ही नाझरो ६० हा फोन खरेदी करू शकता. ज्यात १ टीबी स्टोरेज आणि १२१ जीबी रॅम मिळते. प्राईम डे सेलमध्ये २३,९९९ रुपयांऐवजी २२,४९९ रुपयांना खरेदी करू शकता. यात OIS सह १०० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो.
१० हजारांच्या आतमधील स्मार्टफोन्स
रिअलमी- Narzo N53:८,९९९ रुपये
सॅमसंग -Galaxy M13 : ९,६९९ रुपये
नोकिया- C12: ५,१२९ रुपये