प्रत्येकजण सध्या मोठ्या प्रमाणामध्ये OTT प्लॅटफॉर्मकडे वळला आहे. शॉर्ट फिल्म, वेबसिरीज किंवा चित्रपट पाहण्यासाठी Amazon Prime , Netflix , Hotstar आणि अन्य ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर करतो. ई-कॉमर्स दिग्गज अॅमेझॉन आपल्या प्राइम मेंबरशिपच्या किंमती सतत बदलत असते. काही महिन्यांपूर्वी, अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने प्राइम मेंबरशिपसाठी स्वस्त दर जाहीर केले होते. मात्र यामध्ये आता Amazon प्राईमचे मेंबर असणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे.
आता Amazon या कंपनीने पुन्हा एकदा प्राईमच्या किंमतीमध्ये बदल केले आहेत. कंपनीने या प्लॅन्सच्या किंमतीमध्ये पहिल्यापेक्षा वाढ केली आहे. ते थोडे जास्त वाढवण्यात आले आहेत. जर का तुम्ही Amazon Prime मेंबरशिप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता तुम्हाला अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. आधीचे प्लॅनच्या किंमती आणि आता वाढ झाल्यावर या प्लॅनच्या काय किंमती झाल्या आहेत ते जाणून घेऊयात.
हेही वाचा: एकाचवेळी WhatsApp Account चार डिव्हाइसवर कसे लिंक करायचे? जाणून घ्या ‘या’ सोप्या स्टेप्स
अॅमेझॉन प्राइम मेंबरशिपचे फायदे?
ज्या लोकांजवळ Amazon prime ची मेंबरशिप आहे. त्यांना प्राईम शिपिंगसाठी सपोर्ट मिळतो. जे इतर वापरकर्त्यांपेक्षा प्राइम असणाऱ्या वापरकर्त्यांना फास्ट डिलिव्हरी मिळते. लोकांना प्राइम व्हिडिओ, प्राइम म्युझिक, प्राइम डील्स, प्राइम रीडिंग, प्राइम गेमिंग आणि Amazon फॅमिलीमध्येही अॅक्सेस मिळतो.
Amazon प्राइम सबस्क्रिप्शनची किंमत किती वाढली?
Amazon प्राईमच्या काही प्लॅन्समध्ये कंपनीने वाढ केली आहे. भारतातील कंपनीचा एका महिन्याचा प्लॅन हा २९९ रुपयांपासून सुरु होतो. तर २०२१ मध्ये लॉन्च झालेल्या या प्लॅनची किंमत १७९ रुपये इतकी होती. यामुळे हे कळून येते की कंपनीने आपल्या प्लॅनमध्ये १२० रुपयांची वाढ केली आहे. तीन महिन्याचा जो प्राईम ४५९ रुपयांचा प्लॅन होता तो आता ५९९ रुपये झाले आहे. म्हणजे कंपनीने या प्लॅनमध्ये १४० रुपयांची वाढ केली आहे.
परंतु, जे वापरकर्ते मोठा प्लॅन खरेदी करतात त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जास्त वैधता असणाऱ्या प्लॅनच्या किंमतीमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. amazon prime च्या वार्षिक प्लॅनची किंमत १,४९९ रुपये आहे.