नेटफ्लिक्स या ओटीटी माध्यमानंतर आता ॲमेझॉन प्राइमदेखील आपल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर जाहिराती आणणार असल्याचे समजते. काही काळापूर्वी टेक जायंटने सीरिज आणि सिनेमांदरम्यान ‘काही जाहिराती’ डिजिटल कॉन्टेनमध्ये दिसणार असल्याचे म्हटले आहे. याबाबतची माहिती इंडिया टुडेच्या एका लेखावरून मिळाली आहे. या जाहिराती सध्या उपलब्ध असणाऱ्या प्लॅन्समध्ये समोर येणार असल्या तरीही वापरकर्त्यांना त्या नको असल्यास, त्यासाठी अतिरिक्त रक्कम भरावी लागेल.

सध्या युनायटेड स्टेट्स [US], युनायटेड किंग्डम [UK], जर्मनी, कॅनडा आणि इतर भागांमधील ‘ॲमेझॉन’च्या वापरकर्त्यांना ई-मेलच्या माध्यमातून या जाहिरातींबद्दल आणि त्या नको असल्यास भराव्या लागणाऱ्या अतिरिक्त रकमेबद्दलची माहिती दिली जात आहे. या ई-मेलनुसार २९ जानेवारीपासून वापरकर्त्यांना ते पाहत असलेल्या कॉन्टेन्टमध्ये जाहिराती दिसण्यास सुरुवात होऊ शकते. ‘मर्यादित जाहिरातींमुळे उत्तम कॉन्टेन्टमध्ये आम्हाला अधिक गुंतवणूक करता येऊ शकते आणि ती वाढवता येऊ शकते,’ असा मजकूर वापरकर्त्यांना आलेल्या ई-मेलमध्ये असल्याचे ‘द वर्ज’च्या [The Verge] माहितीवरून समजते.

Flipkart Cancellation Fee Rule Charges
Flipkart Cancellation Fee : ऑनलाइन ऑर्डर रद्द करताच पैसे द्यावे लागणार? फ्लिपकार्टचा ‘हा’ नियम जुना, वाचा कंपनी काय म्हणते
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
amazon 15 minutes delivery
ॲमेझॉन आता ब्लिंकइट, झेप्टोला टक्कर देणार, १५ मिनिटांत वस्तू घरपोच मिळणार; कंपन्या क्विक कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करण्यास उत्सुक का?
What is LIC Bima Sakhi Yojana ?
LIC ची विमा सखी योजना काय आहे? महिन्याला ७ हजार रुपये देणाऱ्या खास स्कीमच्या अटी आणि नियम काय आहेत?
ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?
Saket Bridge, Mumbai Nashik Traffic, Road Widening,
मुंबई-नाशिक मार्गावर पुढील तीन महिने कोंडीचे, साकेत पुलाजवळील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणास सुरूवात
Supreme Court building
Narcos And Breaking Bad : “देशाच्या तरुणांना मारणाऱ्या लोकांशी…” नार्कोस, ब्रेकिंग बॅड टीव्ही शो चा सर्वोच्च न्यायालयात उल्लेख; न्यायमूर्ती नेमकं काय म्हणाले?
bitcoin price review bitcoin prices got a boost reaches 100000 usd
विश्लेषण : ‘बिटकॉइन’ पोहोचले १ लाख डॉलरवर… का आणि कसे? भारतात मान्यता मिळेल?

हेह वाचा : युजर्सची मजा! ‘या’ प्लॅन्समध्ये मोफत मिळतंय Netflix सबस्क्रिप्शन, लगेच पाहा जिओ एअरटेलचे ‘हे’ भन्नाट आॅफर

“आम्ही टीव्हीवर येणाऱ्या किंवा इतर टीव्ही प्रोव्हायडर्सप्रमाणे भरमसाट जाहिराती न दाखवता, थोड्याच/मर्यादित प्रमाणात जाहिराती ठेवणार आहोत. त्यासाठी वापरकर्त्यांना काहीही करावे लागणार नसून, सध्याच्या ॲमेझॉन मेंबरशिप प्लॅनमध्ये कोणताही बदल नसेल. परंतु, ज्यांना जाहिराती नको असतील, ते वापरकर्ते महिन्याला २.९९ डॉलर्स [जवळपास २४८.८ रुपये] भरून या जाहिराती थांबवू शकतात,” असेदेखील वापरकर्त्यांना आलेल्या ई-मेलमध्ये लिहिले असल्याची माहिती इंडिया टुडेच्या लेखावरून मिळते. जर वापरकर्त्यांना जाहिराती नको असतील, तर त्यांच्यासाठी खाली एक लिंक दिलेली आहे; ज्याचा वापर करून ते ॲड-फ्री मेंबरशिप पर्यायाची निवड करू शकतात. “मात्र कोणत्याही लाइव्ह खेळाच्या कॉन्टेन्टदरम्यान, आणि फ्रीवीवर दिसणाऱ्या अमेझॉन कॉन्टेन्टमध्ये जाहिराती या दिसतीलच.” असेही सांगण्यात आले आहे.

ॲमेझॉन प्राइमने सध्या तरी, ‘ओटीटी प्लॅटफॉर्मवर मर्यादित जाहिराती दाखवल्या जातील आणि सध्या प्राईम मेंबरशिपच्या प्लॅनमध्ये कोणतेही बदल नसल्याचे सांगितले आहे. जाहिराती दाखवण्याचा हा नवीन प्रकार युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंग्डम, जर्मनी व कॅनडा येथील प्रदेशांमध्ये सुरू गेला केला असून, लवकरच हे बदल भारतासह जगभरात होणार असल्याचे समजते. ॲमेझॉन प्राइमचा सध्याचा प्लॅन हा २९९ रुपये महिना किंवा वार्षिक १४९९ रुपये इतका आहे. त्यासोबतच ॲमेझॉन प्राइम लाइटचा [lite] ७९९ रुपयांचा वार्षिक प्लॅनही उपलब्ध आहे.

हेही वाचा : वन प्लस १२ व वन प्लस १२ R नवीन स्मार्टफोन लॉंच होण्याआधीच फोनची किंमत जाहीर? जाणून घ्या….

आपल्या बेसिक ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ प्लॅनव्यतिरिक्त ॲड स्पॉन्सर्ड, मोफत, फ्रीवी [Freevee] हे स्ट्रीमिंग सर्व्हिसदेखील उपलब्ध आहे. खरे तर इतर ओटीटी माध्यमे आपल्या प्लॅटफॉर्मवर जाहिराती दाखवणार असल्याच्या ट्रेंडमध्ये ॲमेझॉननेदेखील उडी मारल्याचे या सगळ्यावरून समजते. इतर ओटीटी स्पर्धकही आपापली सब्स्क्रिप्शन फी वाढवीत आहेत, दर महिन्याच्या प्लॅन्समध्ये बदल करीत आहेत. नुकतेच, डिज्नी प्लस आणि नेटफ्लिक्सने त्यांच्या सर्वांत कमी किमतीच्या प्लॅन्समध्ये जाहिराती दाखवणार असल्याचे सांगितले आहे. परंतु, ॲमेझॉन प्राइमने त्यांच्या सध्याच्या प्लॅनमध्ये कोणताही बदल न करता, ज्या वापरकर्त्यांना जाहिराती नको असतील, ते अतिरिक्त किंमत भरून जानेवारी २९ पासून जाहिराती थांबवू शकतात, असे सांगितले आहे.

Story img Loader