Amazon Great Republic Day Sale 2023: अ‍ॅमेझॉनचा या वर्षातील सर्वात मोठा सेल १५ जानेवारीपासून सुरु झाला आहे. या सेलचे नाव अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन रिपब्लिक सेल असे आहे. अ‍ॅमेझॉन प्राईम असलेलं मेंबर हे एकदा दिवस आधीपासून हा से पाहू शकतात. यामध्ये खरेदीदारांना अनेक प्रॉडक्ट्सवर भरघोस सूट मिळत आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्सचे आकर्षण वाढत असून अनेक स्मार्टफोन्सवर ४० टक्क्यांची सूट मिळत आहे. त्यावर ईएमआय , एक्सचेंज आणि कॅशबॅक अशा ऑफर सुरु आहेत. एसबीआय कार्डावरून व्यवहार केल्यास १० टक्क्यांची सूट मिळत आहे. सॅमसंग(Samsung), वनप्लस(OnePlus), रिअलमी(Realme), आयक्यूओओ(iQoo) आणि शाओमी(Xiaomi) ब्रँडच्या स्मार्टफोन्सवर या सेलमध्ये भरघोस सूट मिळत आहे. जे तुम्हाला ३०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळू शकतात.

OnePlus Nord 2T 5G

वन प्लस नॉर्ड २टी ५ जी हा स्मार्टफोन्सवर अ‍ॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे या सेलमध्ये हा फोन २७,७४९ रुपयांना मिळत आहे. याची मूळ किंमत २८,९९९ आहे. या फोनचा एमओएलईडी डिस्प्ले आहे. या फोनच्या बॅटरीची क्षमता ४,५०० mAh इतकी आहे. तसेच याला ८० वॅट चे फास्ट चार्जिंग सपोर्ट येतो.

Sai Paranjpye Speech
Sai Paranjpye “अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने मराठवाड्यातील तरुणाईला सिनेसाक्षर केलं”, पद्मभूषण सई परांजपेंचे उद्गार
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
Gold Silver News
Gold Silver Price Today : मकर संक्रांतीच्या दिवशी सोने खरेदी करताय? जाणून घ्या, तुमच्या शहरातील आजचा सोने चांदीचा भाव
Madhuri Dixit Gauri Khan buy OYO shares
माधुरी दीक्षित व गौरी खानने शेअर मार्केटमध्ये केली गुंतवणूक, कोणत्या कंपनीचे शेअर्स घेतले? वाचा
Marketing idea smart vegetable seller shows funny poster for ladies goes viral on social Media
PHOTO: “महिलांना फेसबूक, व्हॉट्सअॅपसाठी…” भाजी विक्रेत्यानं खास महिलांसाठी लावली अशी पाटी की वाचून पोट धरुन हसाल
Amazon Flipkart announce Republic Day sale 2025
ॲमेझॉन, फ्लिपकार्टचा ‘Republic Day sale’ कधी होणार सुरू? काय असणार ऑफर्स; जाणून घ्या एका क्लिकवर
Game Changer vs Fateh Box Office Collection Day 1
‘गेम चेंजर’ व ‘फतेह’पैकी बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजली? दोन्ही सिनेमांच्या कमाईचे आकडे आले समोर

हेही वाचा : Amazon Republic Day Sale: Alexa स्पीकरपासून किंडलपर्यंत मिळत आहे मोठी सूट; जाणून घ्या

iQoo Neo 6 5G

iQoo निओ ६ ५ जी हा स्मार्टफोनमध्ये अनेक फीचर्स आहेत. यामध्ये ६४ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा आहे. ८० वॅटचे फास्ट चार्जिंग यामध्ये येते. 120Hz E4 एमओएलईडी डिस्प्ले आणि १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज क्षमता येते. या फोनची बॅटरी क्षमता ४७००mAh इतकी आहे. हा स्मार्टफोन या सेलमध्ये २७,९९९ रुपयांना मिळत असून याची मूळ किंमत २९,९९९ रुपये इतकी आहे.

हेही वाचा : काय सांगता? तुमच्या मोबाईलच्या सिमकार्डमध्ये दडलंय सोनं, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण

Redmi Note 11 Pro+ 5G

या फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज इंटर्नल स्टोरेज येते. यामध्ये ६.६७ इंचाचा एमओएलईडी डिस्प्ले आहे. या फोनची मूळ किंमत ही २०,९९९ रुपये इतकी आहे. पण हा स्मार्टफोन या सेलमध्ये तुम्हाला १९,७४९ रुपयांना मिळणार आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन १९,३०० रुपयांना मिळत आहे.

हेही वाचा : Amazon Republic Day Sale: Samsung पासून Redmi पर्यंत ‘हे’ स्मार्टफोन्स मिळतायत १५ हजारांपेक्षा कमी किंमतीत; जाणून घ्या फीचर्स

Oppo A74 5G

ओप्पो ए ७४ ५ जी हा स्मार्टफोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज आहे. याचा डिस्प्ले हा ६.६ इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी स्क्रीनचा आहे. या फोनची मूळ किंमत १७,९९० रुपये इतकी आहे पण अ‍ॅमेझॉन सेलमध्ये हा स्मार्टफोन तुम्हाला १७,९९० रुपयांना खरेदी करता येणार आहे. तसेच एसबीओआय कार्डवरून व्यवहार केल्यास अतिरिक्त १२५० रुपयांची सूट मिळणार आहे.

हेही वाचा : परदेशात जाताय? जाणून घ्या Airtel, Jio आणि Vi चे ‘हे’ रोमिंग पोस्टपेड प्लॅन्स

Samsung Galaxy M13 5G

सॅमसंग गॅलॅक्सी या स्मार्टफोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज आहे. या फोनची मूळ किंमत १६,९९९ रुपये इतकी आहे पण ऑफरमध्ये हा फोन तुम्ही ११,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. एसबीआय क्रेडिट कार्डवरून व्यवहार केल्यास १२५० रुपयांची सूट मिळणार आहे.

Story img Loader