नवीन वर्षाच्या सुरुवातीला ॲमेझॉनने आपल्या नवीन सेलची घोषणा केली आहे. ॲमेझॉनच्या नवीन सेलचे नाव ‘ॲमेझॉन ग्रेट इंडियन रिपब्लिक डे सेल’ (Amazon Great India Republic Days Sale) असे आहे. या सेलदरम्यान ॲमेझॉनकडून अनेक वस्तूंवर ऑफर देण्यात आल्या आहे. हा सेल १३ जानेवारीपासून सुरू झाला आहे. कंपनी ग्राहकांना लहान उपकरणांवरदेखील ५९ टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. बजेटमध्ये तडजोड न करता, स्वयंपाकघरातील काही खास गोष्टी तुम्ही या सेलमध्ये खरेदी करू शकणार आहात. किटलीपासून ते इलेक्ट्रिक कूकरपर्यंत काही खास गोष्टी तुम्हाला या सेलमध्ये कमी किमतीत मिळणार आहेत.

स्वयंपाकघरात लागणाऱ्या कोणत्या वस्तू सेलमध्ये कमी किमतीत मिळत आहेत ते पाहू…

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
iPhone News
iPhone : अँड्रॉईडऐवजी आयफोन असल्यास टॅक्सी APP बुकिंगचे दर वाढतात का? सोशल मीडियावर काय चर्चा?
50 percent vacancies in FDA, FDA, drug licensing,
‘एफडीए’मध्ये ५० टक्के पदे रिक्त, औषध परवाना व औषध तपासणीवर परिणाम
Demand to remove onion export duty from Piyush Goyal who is coming to Nashik news
नाशिकमध्ये येणाऱ्या पीयूष गोयल यांना कांदा निर्यात शुल्क हटविण्यासाठी साकडे
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच

१. एस्टीम मल्टी किटली (AGARO Esteem Multi Kettle) :

सेलमध्ये तुम्हाला ही मल्टी टास्किंग किटली १३०४ रुपयांना मिळेल. ही किटली १.२ लिटरची असून, त्यात तीन हीटिंग मोड आणि ६०० वॉट्स आहेत. त्यामध्ये तुम्ही दूध, चहा, पाणी आदी तीन हीटिंग मोडच्या साह्याने सोईनुसार उकळवू शकता.

२. इलेक्ट्रिक चॉपर (AGARO Electric Chopper) :

अनेकदा कांदा किंवा भाजी चिरून घ्यायची असेल, तर विळी किंवा सुरीचा वापर करण्यात येतो आणि हे काम अनेकांना कंटाळवाणे वाटते. ही बाब लक्षात घेता, AGARO कंपनीने या सेलमध्ये त्यांचे इलेक्ट्रिक चॉपर सादर केले आहे ; ज्यात ४०० वॉट्सचे पॉवरहाऊस आहे. हे उपकरण स्वयंपाकघरात भाजी, कांदा चिरून देण्यास किंवा फळे कापण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडेल. सेलमध्ये याची किंमत १४९९ रुपये इतकी आहे.

३. इम्पेरियल इलेक्ट्रिक कूकर (AGARO Imperial Electric Pressure Cooker) :

इम्पीरियल इलेक्ट्रिक प्रेशर कूकर कमी वेळेत झटपट जेवण बनवण्यास मदत करील; जो तुम्हाला या सेलमध्ये ७,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. तसेच याची डिझाइन आणि फीचर्सदेखील जबरदस्त आहेत. हा कूकर सहा लिटरचा आहे. तसेच तुम्ही यात जेवणाचे अनेक पदार्थ सहज बनवू शकता.

हेही वाचा…WhatsApp लवकरच नवीन सात आकर्षक पर्याय करणार लॉंच; काय असणार खास?

४. बोरोसिलिकेट एलईडी ग्लास मिक्सिंग बाउल (AGARO Borosilicate Glass Mixing Bowl with Lid)
सेलमध्ये याची किंमत फक्त ९७५ रुपये इतकी आहे. हे बाउल तुम्हाला लहान, मध्यम व मोठा अशा तीन आकारांत मिळतील. त्यात तुम्ही तयार केलेले अनेक पदार्थ ठेवू शकता.

५. ॲग्रो क्रेस्ट पोर्टेबल स्पॉट क्लीनर (AGARO Crest Portable Spot Cleaner) :

क्रेस्ट पोर्टेबल स्पॉट क्लीनर खास स्वच्छतेसाठी डिझाइन करण्यात आले आहे. फरशी अस्वच्छ असेल किंवा कार्पेटवर एखादा डाग असेल, तर तुम्ही तो पोर्टेबल स्पॉट क्लीनरच्या मदतीने काही मिनिटांत साफ करू शकता. हे क्लीनर हलके असून, घर स्वच्छ करण्यासाठी अगदीच उपयोगी आहे; जे तुम्हाला या सेलमध्ये ६,९९९ रुपयांना मिळेल. या स्वयंपाकघरात लागणाऱ्या वस्तू तुम्ही ॲमेझॉन सेलमध्ये कमी किमतीत खरेदी करू शकणार आहात.

Story img Loader