भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद संघ म्हणजेच CERT-In ने, जे स्मार्टफोन वापरकर्ते अँड्रॉइड १४ किंवा त्याहून जुन्या व्हर्जनचा वापर करत असतील, त्यांना हॅकिंगचा सर्वाधिक धोका असल्याची सूचना दिली आहे. नुकत्याच जारी केलेल्या व्हल्नेरेबिलिटी नोट (CIVN-2024-0008) नुसार, सरकारी एजन्सीने या जुन्या व्हर्जनमध्ये अनेक त्रुटी दाखवल्या असून, त्याचा वापर करून हॅकर्स तुमची अत्यंत महत्वाची आणि खाजगी माहिती मिळवू शकतात, अशी सूचना प्रसिद्ध केली आहे; असे इंडिया टुडेच्या एका लेखावरून समजते.

CERT-In च्या माहितीनुसार, “फ्रेमवर्क, सिस्टीम, गुगल प्ले सिस्टीम अपडेट्स, विविध उत्पादकांचे वापरलेल्या हार्डवेअरमधील समस्या, आर्म कॉम्पोनंट्स, इमॅजिनेशन टेक्नॉलॉजी, मीडिया टेकचे घटक, युनिस्को घटक, क्वालकम घटक, इत्यादींसारख्या गोष्टींमध्ये त्रुटी असल्याने, अँड्रॉइड १४ आणि त्यापेक्षा जुनी व्हर्जन असुरक्षित असल्याची चेतावणी त्यांनी प्रसिद्ध केलेल्या नोटमध्ये लिहिले आहे.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
maharashtra assembly election 2024 Candidates mobile call whatsapp call
उमेदवार दक्ष ! मोबाईल नाहीच, ओन्ली व्हॉटसअ‍ॅप कॉल
80 lakh cash worth rs 17 lakh mephedrone seized in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ८० लाखांची रोकड, १७ लाखांचे मेफेड्रोन जप्त
Shahrukh Khan death threat
Shahrukh Khan: चोरलेल्या मोबाइलवरून शाहरुख खानला धमकी; मालकाला अटक होताच जुने प्रकरण आले समोर

हेही वाचा : फेक फोनकॉल, AI निर्मित आवाज ओळखण्यासाठी ‘या’ चार टिप्स पाहा; स्कॅम्सपासून कसे सावध राहायचे पाहा…

तुमच्या फोनला कोणता धोका असू शकतो?

CERT-In च्या माहितीनुसार, अशा त्रुटींमुळे हॅक करणाऱ्या व्यक्तीला बऱ्याच चुकीच्या गोष्टी करण्याची संधी मिळू शकते.

१. खाजगी माहिती मिळवणे

तुमचे सर्व खाजगी पासवर्ड, ई-मेल, फोटो, फोन नंबर, आर्थिक गोष्टींबद्दल माहिती हॅकर्स अगदी सहज मिळवू शकतात.

२. फोनवर संपूर्ण ताबा मिळवणे

खाजगी माहिती व्यतिरिक्त एखादा हॅकर तुमच्या उपकरणावर संपूर्ण ताबा मिळवू शकतात. ताबा मिळवल्यानंतर उपकरणांसाठी हानिकारक असणारे ॲप इन्स्टॉल करणे, तुमच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवणे; इतकेच नाही तर इतरांच्या फोनवर तुमचे उपकरण वापरून हल्ला करण्यासाठी हॅकर्सना संधी मिळू शकते.

३. आपले उपकरण खराब करणे

बॅटरी ड्रेन होणे, फोनमध्ये बिघाड होणे किंवा पूर्णतः खराब होणे, ॲप क्रॅश होण्यासारख्या समस्यांनादेखील वापरकर्त्यांना सामोरे जावे लागू शकते.

हेही वाचा : Kitchen gadget : केवळ ‘कागद’ नाही, तर ‘डोसा’सुद्धा एका मिनिटांत Print करता येईल! पाहा ‘या’ भन्नाट उपकरणाचा व्हिडीओ…

याचा परिणाम कोणत्या स्मार्टफोनवर होऊ शकतो?

ज्यांचे फोन ११, १२, १२L, १३ आणि १४ या अँड्रॉइड व्हर्जनवर काम करत आहेत, अशा सर्व स्मार्टफोनला सर्वाधिक धोका असू शकतो. यामध्ये मोठमोठ्या कंपन्यांचे, सॅमसंग, ओप्पो, शाओमी, गुगल पिक्सेल, वन प्लस इत्यादी ब्रॅण्ड्सचा समावेश आहे. अशी माहिती इंडिया टुडेच्या एका लेखावरून समजते.

यावर उपाय काय?

हॅकिंगपासून स्वतःच्या स्मार्टफोनची सुरक्षा करायची असल्यास, सर्वात सोपा उपाय आहे; तो म्हणजे आपले उपकरण अपडेट करून घेणे. असा सल्ला CERT-IN ने दिलेला आहे. तर हा धोका टाळण्यासाठी, उपकरण उत्पादक सिक्युरिटी पॅच रिलीज करणार आहेत असेही समजते.

यांसारख्या धोक्यापासून सावधानता कशी बाळगावी?

१. वेळोवेळी अपडेट तपासणे

आपल्या स्मार्टफोनमध्ये येणाऱ्या सॉफ्टवेअर अपडेटकडे लक्ष ठेवा. जर अपडेट उपलब्ध असले तर ते ताबडतोब डाउनलोड करून घ्या.

२. ऑटोमॅटिक अपडेट चालू करा.

सतत आलेल्या अपडेटवर लक्ष ठेवणे शक्य नसल्यास सेटिंग्समधील ऑटो अपडेट हा पर्याय सुरू करावा, त्यामुळे आपॊप नवीन सॉफ्टवेअर अपडेट होत राहील. त्यासह सिक्युरिटी पॅचदेखील इन्स्टॉल करून घ्या.

हेही वाचा : विमानाचे तिकीट बुक करणे पडले महागात; बसला ४.४ लाखांचा फटका! नेमके प्रकरण जाणून घ्या….

३. अनोळखी ॲप इन्स्टॉल करताना सावध राहावे.

केवळ गुगल प्ले स्टोरवरूनच सुरक्षित ॲप्स डाउनलोड करावे.