How to Save & transfer data from Android to iPhone : आज व्हॉट्सअॅप हे सगळ्याच युजर्सचे सर्वात आवडते मेसेजिंग प्लॅटफॉर्म ठरले आहे. अगदी मेसेज करण्यापासून ते फोटो, व्हिडीओ आदी बऱ्याच गोष्टींची तुम्ही अगदी चुटकीसरशी देवाणघेवाण करू शकता. पण, जेव्हा आपण नवीन फोन घेतो किंवा फोन एक्स्चेंज करतो, तेव्हा मात्र फोटो, व्हिडीओ, चॅट सगळ्याच गोष्टी आपण गमावून बसतो. तर डिव्हाइसेस स्विच करताना, म्हणजेच अँड्रॉइडवरून आयफोनवर चॅट्स आणि फोटो जशाच्या तसा मिळवण्यासाठी तुम्ही पुढील स्टेप्स फॉलो करू शकता…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अँड्रॉइडवरून iPhone वर स्विच करताना डेटा सेव्ह कसा करायचा ?
अँड्रॉइडवरून iPhone वर स्विच करताना WhatsApp चॅट गमावणे खूप सामान्य असते. चॅट गमावल्याने शेवटी डेटा (फोटो, व्हिडीओ) गमावला जाऊ शकतो, जो प्रत्येकासाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुमचा डेटा पुन्हा रिस्टोर करण्यासाठी तुम्हाला आधी तुमचे चॅट ट्रान्सफर करावे लागतील. तर तुम्ही तुमच्या चॅट्स अँड्रॉइडवरून iPhone वर कसे ट्रान्सफर करू शकता? तुमचा डेटा ट्रान्सफर करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा…
- प्रथम तुम्हाला तुमच्या डिव्हाइसवर Android OS 5 किंवा अपग्रेड केलेलं व्हर्जन इन्स्टाॅल करावे लागेल.
- त्याचप्रमाणे तुम्हाला iPhone मध्ये iOS 15.5 किंवा अपग्रेड केलेलं व्हर्जन डाउनलोड करावे लागेल.
- आता तुम्हाला गूगल प्ले स्टोअरवरून तुमच्या अँड्रॉइड डिव्हाइसवर ‘मूव्ह टू iOS’ ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल.
- नंतर तुम्हाला आयफोन आणि अँड्रॉइड दोन्ही कनेक्ट करावे लागतील.
- लक्षात घ्या की, चॅट्स ट्रान्सफर होण्यास बराच वेळ लागू शकतो. त्यामुळे तुम्ही तुमचे डिव्हाइस चार्ज केलेले किंवा प्लग इन केलेलं असणे आवश्यक आहे. यादरम्यान iPhone किमान ६० टक्के चार्ज झाला आहे ना याची खात्री करून घ्या.
हेही वाचा…क्रिएटिव्ह फोटो काढायचे आहेत? मग तुमच्या iPhone मधील आजच बदला ‘या’ पाच सेटिंग्स…
तुमच्या Android वरून iPhone वर चॅट्स कसे ट्रान्सफर करायचे?
- तुमच्या Android फोनवर ‘Move to iOS’ ॲपवर क्लिक करून सुरुवात करा.
- आता तुम्हाला ऑन-स्क्रीन प्रॉम्प्ट मिळेल, त्याला फॉलो करा.
- पुढे तुम्हाला तुमच्या iPhone वर एक कोड दिसेल. हा कोड अँड्रॉइड फोनवर डायरेक्ट एंटर केला जाईल.
- कोड एंटर झाला की, ‘सुरू ठेवा’ वर क्लिक करा आणि तुमच्या स्क्रीनवर दिलेल्या सूचना फॉलो करा.
- त्यानंतर ट्रान्सफर डेटा करण्यासाठी स्क्रीनवर दिसणारा व्हॉट्सअॅप हा पर्याय निवडा.
- तुमच्या अँड्रॉइड फोनवर स्टार्टवर क्लिक करा आणि तुमचा डेटा एक्सपोर्ट होणे सुरू होईल. तेव्हा तुम्हाला तुमच्या डिव्हाइसवरून लॉग आउट केले जाईल.
- त्यानंतर Move to iOS ॲपवर परत या. त्यानंतर डेटा ट्रान्सफर करण्यासाठी Continue वर क्लिक करा.
- सर्व चॅट्स ट्रान्सफर झाल्यानंतर, ॲप स्टोअरवरून व्हॉट्सअॅपचे लेटेस्ट व्हर्जन पुन्हा इन्स्टॉल करा.
- आता तुमच्या जुन्या डिव्हाइसवर वापरलेला फोन नंबर वापरून व्हॉट्सअॅप लॉग इन करा.
- पुढे ट्रान्सफर पूर्ण करण्यासाठी स्टार्टवर क्लिक करा (आपल्याला एक सूचना मिळेल).
- आता तुमचे नवीन डिव्हाइस ॲक्टिव्हेट करा आणि डेटा ट्रान्सफर करण्यासाठी एक्सेस मिळवा.
अशाप्रकारे तुम्ही अँड्रॉइडवरून आयफोनवर फोटो आणि व्हिडीओ ट्रान्सफर करून घेऊ शकता…