तुमचा गाणं ऐकण्याचा अनुभव शंभरपट चांगला बनवण्यासाठी, Anker ने आपले नवीन स्टायलिश इअरबड्स, Liberty Air2 Pro लाँच केले आहेत. अप्रतिम डिझाइन, तीन नॉईज कॅन्सलेशन मोड, सिरी सपोर्ट आणि अप्रतिम बॅटरी लाइफ,तसेच तुम्हाला या इअरबड्समध्ये आणखी अनेक अप्रतिम वैशिष्ट्ये मिळतील. चला Liberty Air2 Pro ची वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घेऊयात.

Liberty Air2 Pro चे बॅटरी लाइफ

लिबर्टी एअर2 प्रो ची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याची बॅटरी लाइफ आहे. हे इयरबड्स कंपनीच्या विशेष जलद चार्जिंग तंत्रज्ञानासह आले आहेत, जे १० मिनिटांसाठी चार्जिंगवर दोन तास वापरले जाऊ शकतात. हे इअरबड सक्रिय नॉईज कॅन्सलेशन वैशिष्ट्य न वापरता एकाच चार्जवर २६ तास वापरले जाऊ शकतात आणि तुम्ही हे इअरबड्स ANC सह वापरल्यास ते २१ तासांपर्यंत टिकू शकतात.

Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
Demand to remove onion export duty from Piyush Goyal who is coming to Nashik news
नाशिकमध्ये येणाऱ्या पीयूष गोयल यांना कांदा निर्यात शुल्क हटविण्यासाठी साकडे

सर्वोत्तम आवाज अनुभव

लिबर्टी एअर2 प्रो ची रचना आंकरने अशा प्रकारे केली आहे की ते तुम्हाला एक अप्रतिम आवाज अनुभव देईल. हे इअरबड्स प्युअर-नोट ड्रायव्हर तंत्रज्ञान वापरतात जे प्रत्येक इअरबडचा ११ मिमी ड्रायव्हर बनवण्यासाठी १० नॅनो लेयर्स वापरतात, ज्यामुळे बास आणि सर्वोत्तम आवाजाची गुणवत्ता ४५ टक्के पर्यंत वाढते.

Anker च्या Earbuds साठी तीन नॉईज कॅन्सलेशन मोड

Anker चे हे इअरबड तीन नॉईज कॅन्सलेशन मोडसह येतात. पहिला मोड ट्रान्सपोर्ट मोड म्हणून ओळखला जातो, जो तुम्ही बस, ट्रेन किंवा फ्लाइटमधून येणारा कमी आवाज ब्लॉक करू इच्छिता तेव्हा चालू करू शकता. Liberty Air2 Pro चा दुसरा मोड आउटडोअर मोड आहे, जो तुम्ही बाहेर, रस्त्यावर वापरू शकता आणि शेवटचा नॉइज कॅन्सलेशन मोड हा इनडोअर मोड आहे, जो तुम्ही तुमच्या घरी, ऑफिसमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये बसल्यावर वापरू शकता.

Liberty Air2 Pro चा विशेष पारदर्शकता मोड

या नवीनतम इयरबड्समध्ये एक विशेष पारदर्शकता मोड देखील देण्यात आला आहे, जो प्रामुख्याने दोन सेटिंग्जसह येतो. पहिली सेटिंग संपूर्ण पारदर्शकतेसह येते, जी तुम्ही रस्त्यावर चालताना, धावताना किंवा सायकल चालवताना वापरू शकता कारण ते तुम्हाला गाण्यांसह आवाज ऐकण्यास अनुमती देईल जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहू शकाल. जेव्हा तुम्ही बस, ट्रेन किंवा फ्लाइटची वाट पाहत असाल आणि तुम्हाला त्याच्याशी संबंधित घोषणा ऐकायच्या असतील तेव्हा पारदर्शकता मोडची दुसरी सेटिंग उत्तम प्रकारे वापरली जाते.

दरम्यान Anker’s Liberty Air2 Pro हा इयरबड ९,९९९ रुपयांच्या किमतीत लॉंच करण्यात आला आहे. हे लवकरच फ्लिपकार्ट वरून खरेदीसाठी उपलब्ध होतील आणि लवकरच ते भारतातील प्रमुख रीटेल चेन्समध्ये उपलब्ध केले जातील. १८ महिन्यांची वॉरंटी असलेले हे इअरबड्स Onyx Black, Titanium White, Sapphire Blue आणि Crystal Pink या चार रंगांमध्ये खरेदी केले जाऊ शकतात.

Story img Loader