ट्रायच्या सूचनेनंतर, टेलिकॉम कंपन्यांनी पूर्ण महिन्याची वैधता असलेली योजना सादर केली आहे. या क्रमाने, रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाने प्लॅन ऑफर केले आहेत. तसंच एअरटेलने आता आणखी एक नवीन प्लान ऑफर केला आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 200Mbps डाउनलोड स्पीड, Amazon Prime चे एक वर्षाचे सबस्क्रिप्शन तसंच Airtel XSteam अॅपचे सबस्क्रिप्शन दिले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्लॅक ऑल-इन-वन सेवा एअरटेलने गेल्या वर्षी जुलैमध्ये मोबाइल प्लॅनसाठी लॉन्च केली होती, जी पोस्टपॅड युजर्ससाठी आहे. या अंतर्गत, ९९८ रुपये, १३४९ रुपये आणि १५९८ रुपये आणि २,०९९ रुपये किंमतीचे प्लॅन सादर करण्यात आले. आता, एअरटेलने आपल्या पोर्टफोलिओमध्ये एक नवीन फिक्स्ड ब्लॅक प्लॅन जोडला आहे. चला जाणून घेऊया, या १०९९ रुपयांच्या प्लॅनचे इतर फायदे काय आहेत.

Airtel Black १०९९ रूपयांचा प्लान
या प्लॅनमध्ये मासिक वैधता देण्यात आली आहे, ज्या अंतर्गत 200Mbps अनलिमिटेड इंटरनेट स्पीड, अनलिमिटेड कॉलिंग, Amazon Prime चे एक वर्षाचे सबस्क्रिप्शन आणि Airtel Xstream अॅपचे एक वर्षाचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे.

आणखी वाचा : Amazon वर सुरू झाला फॅब फोन फेस्ट, स्वस्त आणि नव्या स्मार्टफोनवर ४० टक्क्यांपर्यंत सूट

याशिवाय या प्लॅनमध्ये तुम्ही एअरटेल फायबर आणि एअरटेल लँडलाइन कनेक्शनसह ३५० रुपयांमध्ये डीटीएच कनेक्शन देखील मिळवू शकता आणि इतर एअरटेल ब्लॅक रिचार्ज प्रमाणे १०९९ रुपयांचा पॅक पोस्टपेड सिम कार्डसह येत नाही.

यासह, Airtel ने अलीकडेच रु २९६ आणि ३१९ रूपयांचे प्रीपेड प्लॅन लॉन्च केले आहेत जे इतर अतिरिक्त फायद्यांसह ३० दिवसांची वैधता देतात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another airtel plan launched will get 200mbps download speed free calling and more with amazon prime prp