कतारमध्ये FIFA World Cup 2022 सुरू असून भारतात जिओ सिनेमाकडून या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येत आहे. मात्र, पहिल्या दिवशी थेट प्रक्षेपणादरम्यान व्यत्यय आल्याच्या तक्रारी सोशल मीडियावर झळकू लागल्या. युजर्सना लाइव्ह स्ट्रिमिंगचा दर्जा घसरल्याचा आणि अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. या नंतर चाहत्यांनी सोशल मीडियावरून जिओकडे आपली नाराजी व्यक्त केली. या प्रकारानंतर ट्विटरवर जिओ सिनेमा ट्रेंड करत होते. जिओ सिनेमामुळे झालेल्या गैरसोयीने नाराज झालेल्या चाहत्यांनी जिओची मिम्सच्या माध्यमातून खिल्लीही उडवली. याबाबत जिओने माफी मागितली असून अ‍ॅप अपडेट करण्याचा सल्ला दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही जिओ अ‍ॅप अपडेट करून फिफाचे सामने पाहू शकता. जिओ सिनेमा अ‍ॅप किंवा ब्राउजरच्या माध्यमातून तुम्ही स्मार्टफोन किंवा संगणकावर फिफा स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. जिओ सिनेमा अ‍ॅप टायझेन ओएस २.४ आणि त्यापेक्षा वरचे ओएस, तसेच व्हर्जन ७ आणि त्यावरील अपडेट असलेल्या अँड्रोइड टीव्हीला सपोर्ट करते. ओएस १० आणि त्यावरील ओएस असलेल्या अ‍ॅपल टीव्हीमध्येही जिओ सिनेमा अ‍ॅप चालते. तरीही तुम्ही फिफा विश्वचषक स्पर्धेचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी पर्याय शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही अ‍ॅप्सबाबत माहिती देत आहोत ज्यावर तुम्ही फिफाचे सामने पाहू शकता.

(५७ हजारांत घरी आणा नवीन IPHONE 14, जाणून घ्या ही जबरदस्त ऑफर)

१) जिओ टीव्ही

जिओ सिनेमा अ‍ॅपवर फिफाचे सामने पाहताना व्यत्यत येत असल्यास तुम्ही जिओ टीव्हीवर अ‍ॅपवर सामने पाहू शकता. यासाठी तुम्हाला फोनमध्ये जिओ टीव्ही अ‍ॅप इन्स्टॉल करावे लागेल आणि नोंदणीकृत फोन नंबरच्या सहायाने लाँग इन करावे लागेल. लॉग इन झाल्यानंतर जिओ टीव्ही लाइव्ह चॅनल्स सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही स्पोर्ट्स १८ आणि स्पोर्ट्स १८ एचडी चॅनेलवर सामने बघू शकता.

२) माय व्हीआय अ‍ॅप, व्हीआय मुव्हीज आणि टीव्ही

व्होडाफोन आयडिया युजर माय व्हीआय अ‍ॅपमध्ये फिफा स्पर्धेचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात. युजर व्हीआय मुव्हीज आणि टीव्ही अ‍ॅपवर देखील मोफत सामने पाहू शकतात. यासाठी तुम्हाला नोंदणीकृत नंबरद्वारे या अ‍ॅप्समध्ये लॉग इन करावे लागेल.

३) टाटा प्ले

टाटा प्ले युजर टीव्ही आणि टाटा प्ले अ‍ॅपवर फिफाचे थेट प्रक्षेपित होणारे सामने बघू शकतात. यासाठी युजरला स्पोर्ट्स १८ आणि स्पोर्ट १८ एचडी या चॅनेलचे सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल. थेट प्रक्षेपित होणारे सामने पाहण्यासाठी युजरला टाटा प्ले अ‍ॅप फोनमध्ये डाऊनलोड करावे लागले. संगणकावर पाहण्यासाठी तुम्हाला टाटा प्लेचे संकेतस्थळ उघडावे लागेल.

(ब्ल्यू टीकसाठी करावी लागणार आणखी प्रतीक्षा, ‘या’ करणामुळे मस्क यांनी थांबवले लाँच, म्हणाले जो पर्यंत…)

4) टीव्ही चॅनल

स्पोर्ट्स १८ आणि स्पोर्ट्स १८ एचडी कतारमधील फिफा विश्वचषकाचे सामने भारतात प्रसारित करत आहेत. या चॅनल्सचे सब्सक्रिप्शन खरेदी करून तुम्ही फिफा सामने पाहू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apart from jio cinema you can watch fifa world cup 2022 matches on this platforms ssb