Apple iPhone 14 Pro and Pro Max launched: ॲप्पलने अखेरीस नवीनतम iPhone 14 मालिका लाँच केली आहे. कंपनीने iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max हे चार नवीन मॉडेल लाँच केले आहेत. ही सर्व मॉडेल्स मागील वर्षी लाँच झालेल्या iPhone 13 लाइनअपचे उत्तराधिकारी आहेत. तसंच, या वर्षी कंपनीने अखेरीस आगामी लाइनअपमध्ये बदल करून आयफोन मिनी बंद केला आहे. त्याऐवजी , कंपनीने नवीन iPhone 14 Plus मॉडेल लाँच केला आहे जो ६.७ इंच सोबत सादर केला आहे. ज्यांना मोठ्या डिस्प्लेसह आयफोन खरेदी करायचा आहे परंतु प्रो मॅक्स मॉडेल खरेदी करायचे नाही त्यांच्यासाठी हे मॉडेल सर्वोत्तम पर्याय आहे .
आज आम्ही तुम्हाला iPhone 14 Pro , आणि iPhone 14 Pro Max बद्दल तपशीलवार माहिती देत आहोत. कंपनीने उत्तम कॅमेरा सुधारणा आणि अनेक बदलांसह प्रो मॉडेल्स सादर केले आहेत. iPhone 14 Pro , आणि iPhone 14 Pro Max Apple च्या नवीनतम A16 SoC सह लाँच केले गेले केले आहे. येथे आम्ही तुम्हाला या दोन्ही मॉडेल्सबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.
( हे ही वाचा: Apple Event 2022 : iPhone 14 आणि iPhone 14 Pro बरोबरच Apple Watch, AirPod ची घोषणा; जाणून घ्या भन्नाट फिचर्स आणि किंमत)
Apple iPhone 14 Pro आणि iPhone Pro Max: फीचर्स
डिस्प्ले
सर्व प्रथम, जर आपण ॲप्पलच्या बहुतेक प्रीमियम मॉडेल्सच्या डिस्प्लेबद्दल बोललो तर Apple iPhone 14 Pro मध्ये ६.१ इंचाचा डिस्प्ले आहे आणि iPhone Pro Max मध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले आहे. हे डिस्प्ले १६०० nits पासून २००० nits पर्यंत ब्राइटनेस देतात. अॅपलचा दावा आहे की इतर कोणताही स्मार्टफोन एवढा ब्राइटनेस देत नाही. यासह, कंपनीने प्रो मॉडेलमध्ये नॉच सोडला आहे आणि एक विस्तृत पिल शेप पंच होल कटआउट दिला आहे, जो अनेक यूजर इंटरफेस वैशिष्ट्यांसह मनोरंजक ग्राफिक्ससह येतो. यासोबतच कंपनीने आपल्या प्रो मॉडेल्समध्ये प्रथमच ऑलवेज ऑन डिस्प्ले दिला आहे.
नवीन प्रोसेसर
iPhones 14 Pro आणि iPhones 14 Pro Max या दोन्हींमध्ये कंपनीने नवीनतम A16 Bionic प्रोसेसर दिलेला आहे. या प्रोसेसरबद्दल कंपनीचा दावा आहे की ते iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max चे परफॉर्मन्स, कॅमेरा आणि बॅटरी लाइफ सुधारते. अॅपलचा हा प्रोसेसर ४-नॅनोमीटर आर्किटेक्चरवर तयार करण्यात आला आहे. ऍपलचा दावा आहे की नवीनतम A16 बायोनिक प्रोसेसर Android स्मार्टफोनच्या सर्वात वेगवान प्रोसेसरपेक्षा कितीतरी पटीने पुढे आहे.
( हे ही वाचा: Apple : Iphone 14 आणि 14 Plus मधील ‘हे’ फरक जाणून घ्या, निवड करणे सोपे जाईल)
आश्चर्यकारक कॅमेरा
Apple iPhone 14 Pro आणि iPhone Pro Max मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्राथमिक कॅमेरा ४८एमपी आहे. अॅपलने प्रो मॉडेलमध्ये क्वाड पिक्सेल सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. हे अँड्रॉइड स्मार्टफोन्समध्ये पिक्सेल बिनिंग टेक्नॉलॉजीचे नाव वैशिष्ट्य आहे. तसंच, ProRAW वापरून, वापरकर्ते पिक्सेल बिनिंगशिवाय प्रतिमा कॅप्चर करू शकतात.
प्राथमिक कॅमेरा सोबत, प्रो मॉडेल्समध्ये १२एमपी टेलिफोटो सेन्सर आणि १२एमपी अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. अल्ट्रा वाइड सेन्सरच्या सहाय्याने मॅक्रो फोटोग्राफी देखील करता येते. यासोबतच, दोन्ही फोनमध्ये नवीन फोटोनिक इंजिन देखील देण्यात आले आहे, जे कमी प्रकाशात चांगले फोटो क्लिक करते. यासोबतच या दोन्ही फोनमध्ये अॅक्शन आणि सिनेमॅटिक ट्विस्ट देखील देण्यात आले आहेत जे ४K रेझोल्युशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगला परवानगी देतात. फ्रंट कॅमेर्याबद्दल बोलायचे झाले तर येथे एक नवीन १२एमपी कॅमेरा देखील देण्यात आला आहे.
( हे ही वाचा: Apple iphone : ‘या’ देशात आयफोन विक्रीवर बंदी; कारण जाणून तुम्ही व्हाल हैराण)
किंमत
किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, १२८जीबी स्टोरेजसह iPhone 14 Pro चे बेस मॉडेल भारतात १,२९,९०० रुपयांच्या किंमतीला सादर करण्यात आले आहे. यासोबतच २५६जीबी स्टोरेज १,३९,९०० रुपयांमध्ये, ५१२जीबी स्टोरेज मॉडेल १,५९,९०० रुपयांमध्ये आणि १टीबी स्टोरेज मॉडेल १,७९,९०० रुपयांना सादर करण्यात आले आहे. यासोबतच iPhone 14 Pro Max चे १२८जीबी स्टोरेज मॉडेल १,३९,९०० रुपयांना, २५६जीबी स्टोरेज मॉडेल १,४९,९०० रुपयांना, ५१२जीबी स्टोरेजचे मॉडेल १,६९,९०० रुपयांमध्ये आणि १टीबी वेरिएंट १,८९,९०० रुपयांना सादर करण्यात आले आहे.
ॲप्पलच्या नवीनतम मॉडेलची प्री-बुकिंग ९ सप्टेंबरपासून सुरू होईल. प्रो मॉडेलची विक्री १६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. दुसरीकडे, रेग्युलर आणि प्लस मॉडेल्सच्या प्री-ऑर्डर १६ सप्टेंबरपासून सुरू होतील आणि ७ ऑक्टोबरपासून विक्री सुरू होईल. आयफोन १४ प्रो आणि आयफोन १४ प्रो मॅक्स मॉडेल डीप पर्पल, गोल्ड, सिल्व्हर आणि ब्लॅक या चार रंगांच्या पर्यायांमध्ये ऑफर केले आहेत.