अॅपलच्या एअर टॅगने एका महिलेला तिचे हरपलेले श्वान मिळवून दिले आहे. महिलेने श्वानाच्या कॉलरला एअर टॅग लावले होते. हा श्वान हरवल्यानंतर एअरटॅगच्या मदतीने तो परत मिळाला आहे. रॉकी असे श्वानाचे नाव आहे.
अॅपल इन्साइडरनुसार, फ्लोरीडा येथील रहिवाशी डेनिस यांचा श्वान घरातून पळून गेला होता. काही मिनिटांनी रॉकी हा हरवल्याचे डेनिस यांच्या लक्षात आले. दरम्यान श्वानाला एअर टॅग लावल्याचे डेनिस यांना लक्षात आले. त्यांनी लगेच आपला फोन घेतला आणि लोकेशन तपासली, लोकेशन २० मिनिटांच्या अंतरावर होते. कोणीतरी रॉकीला शोधून काढले आणि त्याला ऑरेंज काउंटी अॅनिमल सर्व्हिसेसमध्ये आणल्याचे त्यांना कळाले.
(मेटाने ११ हजार कर्मचाऱ्यांना का काढले? ‘ही’ आहेत ८ मुख्य कारणे)
अॅपलने वापरण्यासाठी केली मनाई
एअर टॅग हे श्वानासाठीच्या जीपीएस किटपेक्षाही स्वस्त आहे, मात्र अॅपलने लोकांना किवा पाळीव प्राण्यांना ट्रॅक करण्यासाठी एअरटॅगच्या वापरास मनाई केली आहे. कारण, वस्तूंचे शोध लावण्यासाठी हे टॅग बनवण्यात आल्याचा दावा अॅपल करतो.