सध्या तंत्रज्ञानाचं युग असून अनेक नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. त्यात कंपन्यांमध्ये स्पर्धा असल्याने टोकाचे निर्णय घेतले जात आहे. आपलं प्रोडक्ट इतर कंपन्यांच्या तुलनेत कसं चांगलं असेल? यासाठी चढाओढ सुरु आहे. एकीकडे स्पर्धा असताना अमेरिकन टेक कंपन्या अ‍ॅमेझॉन आणि अ‍ॅप्पल इंकवर मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. या दोन्ही कंपन्यांना २०० दशलक्ष युरो (सुमारे १७ अब्ज रुपये) पेक्षा जास्त दंड ठोठावण्यात आला आहे. अ‍ॅप्पल आणि बीट्सच्या उत्पादनांच्या विक्रीतील अँटी कॉम्पेटेटिव्ह कॉपरेशनमुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे. बीट्स ऑडिओ उत्पादने तयार करते. कंपन्यांमधील करारानुसार, केवळ निवडक पुनर्विक्रेते अ‍ॅप्पल आणि बीट्सची उत्पादने अ‍ॅमेझॉनच्या इटालियन साइट Amazon.it वर विकू शकत होते. हे युरोपियन युनियनच्या नियमांचे उल्लंघन असल्याचे वॉचडॉगने म्हटले आहे.

प्राधिकरणाने अ‍ॅमेझॉनवर ६८.७ दशलक्ष युरो आणि अ‍ॅप्पलवर १३४.५ दशलक्ष युरोचा दंड ठोठावला आहे. याशिवाय अ‍ॅप्पल आणि बीट्सच्या उत्पादनांवरील Amazon.it वरील निर्बंध हटवण्यास सांगितले आहे.

दुसरीकडे अ‍ॅप्पल काहीही चुकीचं केलं नसल्याचं सांगत न्यायालयाकडे दाद मागणार असल्याचं सांगितलं आहे. तर ग्राहकांना खरेदी केल्यावर खरं प्रोडेक्ट मिळावं यासाठी आटापीटा आहे, असं अ‍ॅप्पलनं रायटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं.

Story img Loader