Apple Watch For Kids : सध्या स्मार्टफोन काळाची गरज ठरला आहे. स्मार्टफोन अगदी बारीकसारीक गोष्टींसाठी उपयोगी ठरतो आहे. पण, याचे दुष्परिणामही तितकेच आहेत. त्यामुळे लहान मुलांना त्यापासून कसं दूर ठेवावं याचे अनेक पर्याय त्यांचे आई-बाबा शोधत असतात. लहान मुलं शाळा, क्लासमध्ये गेल्यावर ते कधी घरी येतील? पावसापाण्यात कुठे अडकले तर नाहीत ना? खेळताना कुठे पडले, तर त्याबद्दल माहिती कोण देईल, असे अनेक प्रश्न पालकांच्या मनात असतात. तर आता ॲपल कंपनी या चिंताग्रस्त पालकांसाठी काहीतरी खास घेऊन आली आहे.

ॲपलनं भारतात ‘ॲपल वॉच फॉर युअर किड्स’ हे फीचर जाहीर केलं आहे. हे फीचर त्या प्रत्येक पालकासाठी उपयोगी ठरेल; ज्यांना असं वाटतं की, आपल्या मुलांनी कमी वयात स्मार्टफोन वापरू नये. पण, तरीही त्या मुलांकडे असं काही डिव्हाइस असावं; जेणेकरून ते नेहमी मुलांच्या संपर्कात राहू शकतील. तसेच ते कुठे आहेत, ते काय करत आहेत याचा वेळोवेळी आढावा घेऊ शकतील. म्हणजेच लांब असूनसुद्धा पालक त्यांच्या मुलांशी संवाद साधू शकतील. यादरम्यान ते मुलांना मेसेज, कॉल, त्यांच्या आरोग्य, फिटनेसबद्दलही जाणून घेऊ शकतील; जे तुम्हाला सहसा Apple Watch वर मिळतात.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Anganewadi Bharadi Devi Jatra celebrations with traditional rituals and vibrant festivities.
Anganewadi Jatra : देवीने कौल दिला अन् ठरली आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख, ‘या’ दिवशी सुरू होणार उत्सव
How will state boards mobile app be useful for students parents and teachers
राज्य मंडळाचे मोबाइल अॅप विद्यार्थी, पालक, शिक्षकांना कसे ठरणार उपयुक्त?
building unauthorized Check Dombivli, Kalyan Dombivli Municipal corporation,
पालिकेच्या संकेतस्थळावर इमारत अधिकृत की अनधिकृत याची खात्री करा, कल्याण डोंबिवली पालिकेचे आवाहन
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”
Do you let children drink tea
तुम्ही लहान मुलांना चहा प्यायला देता का? मग हा VIDEO एकदा पाहाच
cyber criminals come with scam idea which is Wedding Invitation Scam
‘वेडिंग इन्व्हिटेशन स्कॅम’ सायबर भामट्यांचा नवा फंडा; सावध राहा, अन्यथा…

तुमच्या मुलांसाठी ॲपल वॉच कसे सेट करावे ?

‘ॲपल वॉच फॉर युअर किड्स’ हे फीचर आता भारतात लाँच करण्यात आलं आहे. पण, हे फीचर अशा युजर्ससाठी उपलब्ध असेल ; ज्यांच्याकडे ॲपल वॉच सिरीज ४ किंवा त्यानंतरचे व्हर्जन आहे किंवा ॲपल वॉच एसई आहे ; जे आयफोन ८ किंवा नंतरचे नवीन वॉचओएस आणि आयओएस सह कनेक्ट आहे.ॲपल वॉचला सेल्युलर सर्व्हिस ॲक्टिव्ह करण्यासाठी वायरलेस सर्व्हिस प्लॅन आवश्यक आहे. सध्या ॲपलनं या फीचरसाठी केवळ जिओबरोबर भागीदारी केली आहे. म्हणजेच जर तुम्हाला हे फीचर वापरून पाहायचं असेल, तर ॲपल वॉचसाठी नवीन जिओ कनेक्शन घेणं आवश्यक आहे. तुमच्या मुलांसाठी ॲपल वॉच सेट करण्याकरिता तुम्हाला पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील…
१. पालकांपैकी किमान एकाकडे तरी आयफोन असला पाहिजे.
२. आयफोनबरोबर जोडल्यानंतर मुलाच्या ॲपल वॉचवर हे फीचर सक्रिय केले जाईल.
३. घड्याळात eSIM सेट करणे.

हेही वाचा…AI Robot: चार पाय, पाठीवर बंदूक! ‘या’ एआय रोबोची झलक तुम्ही पाहिलीत का? काय असेल खास, कसं करेल काम; जाणून घ्या

मुलांवर कसे नियंत्रण ठेवता येईल?

ॲपल वॉच मुलांना त्यांचं स्वातंत्र्य आणि पालकांना त्यांची काळजी घेण्याची परवानगी देईल. ॲपल वॉचवरून मुलं कोणाशी संपर्क साधू शकतात हे पालक ठरवतील. मुलांचं लोकेशन ट्रॅक करतील. ॲपल वॉचवर DND प्रोफाइल असेल; जे मुलाच्या शाळेचं वेळापत्रक, एक्स्ट्रा क्लासबद्दल माहितीही देईल. केव्हा कोणतं नोटिफिकेशन, कॉल ब्लॉक करायचा या गोष्टींवरसुद्धा आई-बाबा नियंत्रण ठेवू शकतील. आई-बाबा सेटिंग्जमधून डाउनटाइम शेड्युल करू शकतील. तुम्ही डाउनटाइम सेट केल्यावर, फक्त निवडलेले फोन कॉल आणि निवडक ॲप्समध्येच मुलं प्रवेश करू शकतील.

मुलांना ॲपल वॉचद्वारे ॲप स्टोअरमध्ये प्रवेश करता येईल; पण आईबाबांना त्यांच्या आयफोनवरून प्रत्येक गोष्ट डाउनलोड करण्यास परवानगी द्यावी लागेल. लहान मुलं वॉचद्वारे आपत्कालीन सेवांमध्ये प्रवेश करू शकतात. आई-बाबा मुलांना होणारी ॲलर्जी, रक्तगट, वय, उंची आदी माहितींसह त्यांचं एक प्रोफाइल तयार करू शकतात; जे आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त ठरू शकतं.

Story img Loader