ॲपल कंपनीचे प्रॉडक्ट्स तरुण मंडळींना नेहमीच आकर्षित करतात. इतर कंपन्यांच्या तुलनेत जरी हे प्रॉडक्ट्स महाग असले तरी त्यामधील फीचर्सही जबरदस्त असतात. तर हे लक्षात घेता, ॲपल कंपनी कॉलेज आणि विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षकांसाठी ‘बॅक टू स्कूल’ ऑफर घेऊन आली आहे. १५ जून २०२४ पासून शाळकरी व विद्यापीठीय विद्यार्थ्यांचे शाळा, कॉलेजेस सुरू झाली आहेत. तर लॉकडाउननंतर गॅझेट्स शिक्षणासाठी आवश्यक साधने बनली आहेत. त्यामुळे कंपनी काही प्रॉडक्ट्सवर सूट देते आहे आणि ही ऑफर ॲपल बीकेसी (Apple BKC), ॲपल स्टोअर्स (Apple Saket stores), ॲपल स्टोअर ऑनलाइन (Apple Store online) २० जून ते ३० सप्टेंबरदरम्यान उपलब्ध असणार आहे.
‘बॅक टू स्कूल’मध्ये ॲपल कंपनी मॅक (Macs) आणि आयपॅड्स (iPads) ग्राहकांना खरेदी करण्यास अनुमती देते आहे. त्याव्यतिरिक्त जे मॅक खरेदी करतात, त्यांना एअरपॉड; तर जे आयपॅड खरेदी करतात, त्यांना ॲपल पेन्सिल मोफत देण्यात येणार आहे. तसेच ग्राहकांना AppleCare Plus वर २० टक्के सूट देण्यात येईल. त्यांची उपकरणे संरक्षित असल्याची खात्री करून, त्याचबरोबर कंपनी ॲपल म्युझिक आणि ॲपल टीव्ही प्लसवर तीन महिने मोफत सबस्क्रिप्शन देते आहे. तसेच तीन महिन्यांनंतर विद्यार्थी दरमहा ५९ रुपयांच्या सवलतीच्या दराने त्यांचे सबस्क्रिप्शन सुरू ठेवू शकतात.
ही ऑफर मॅकबुक एअर (MacBook Air), मॅकबुक प्रो (MacBook Pro), आयमॅक (iMac), मॅक मिनी (Mac Mini), आयपॅड एअर ( iPad Air) व आयपॅड प्रो (iPad Pro) यासह ॲपल उत्पादनांवर लागू होते. ॲपल पेन्सिल प्रो आणि मॅजिक की-बोर्डसारख्या ॲक्सेसरीज शैक्षणिक किमतीतदेखील उपलब्ध आहेत. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी हे UNiDAYS द्वारे या ऑफरसाठी अर्ज करू शकतात. पण, या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला व्हेरिफिकेशनही करावे लागेल.
उपकरणे आणि त्यांच्या किमती खाली तक्त्यात तपासून घ्या…
ॲपल प्रॉडक्ट्स | सेलमधील किंमत |
११ इंच आयपॅड प्रो एम ४ | ८९,९०० रुपये |
१३ इंच आयपॅड प्रो एम ४ | १,१९००० रुपये |
ॲपल पेन्सिल प्रो | १०,९०० रुपये |
ॲपल पेन्सिल यूएसबी सी | ६,९०० रुपये |
११ इंच मॅजिक कीबोर्ड | २७,९०० रुपये |
१३ इंच मॅजिक कीबोर्ड | ३१,९०० रुपये |
११ इंच आयपॅड एअर एम २ | ५४,९०० रुपये |
१३ इंच आयपॅड एअर एम २ | ७४,९०० रुपये |
१३ इंच मॅकबुक एअर एम ३ | १,०४,९०० रुपये |
१५ इंच मॅकबुक एअर एम ३ | १,२४,९०० रुपये |
१३ इंच मॅकबुक एअर एम २ | ८९,९०० रुपये |
१४ इंच मॅकबुक प्रो एम ३ | १,५८,९०० रुपये |
१४ इंच मॅकबुक प्रो एम ३ प्रो | १,८४,९०० रुपये |
१६ इंच मॅकबुक प्रो | २,२९,००० रुपये |
आयमॅक एम ३ | १,२९,९०० रुपये |
मॅक मिनी एम २ | ४९,९०० रुपये |
मॅक मिनी विथ एम २ प्रो | १,१९,००० रुपये |
मॅकसाठी पर्यायांमध्ये मेमरी, स्टोरेज, ग्राफिक्स, रंग आदींचा समावेश आहे. विद्यार्थी त्यांचे आयपॅड्स (iPads), एअरपॉड्स (AirPods) आणि ॲपल पेन्सिलदेखील कस्टमाइज करू शकतात. याव्यतिरिक्त ॲपल ग्राहकांना प्रो क्रिएट, फायनल कट प्रो, लॉजिक प्रो व मायक्रोसॉफ्ट ऑफिस यांसारखे आवश्यक ॲप्स ऑफर करते, शैक्षणिक हेतूंसाठी त्यांच्या डिव्हाइसची कार्यक्षमता वाढवते, विद्यार्थ्यांना त्यांच्या जुन्या उपकरणांच्या बदल्यात नवीन खरेदीसाठी पर्यायदेखील सुचवते आहे. तर विद्यार्थी, पालक, नोंदणीकृत शाळांमधील शिक्षकांना Appleच्या ऑनलाइन स्टोअरवरूनही (Online Store) या ऑफरचा लाभ घेता येईल.