युजरद्वारे अॅपलच्या ग्लोबल क्लाऊड स्टोअरेजवर ठेवण्यात येणाऱ्या सर्व डेटाला पूर्ण एण्ड टू एण्ड इन्क्रिप्शन देणार असल्याची घोषणा अॅपलने बुधवारी केली. कंपनीच्या गोपनीयतेच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. यामुळे युजरबाबत संवेदनशील माहिती मिळवणे हॅकर्स, गुप्तहेर आणि कायदा आणि अंमलबजावणी संस्थांना आव्हानास्पद होणार आहे.
कंपनीने ग्रहाकांच्या सुरक्षा आणि गोपनीयतेला प्राधान्य दिले आहे. कंपनीचे आयमेसेज आणि फेसटाइम कम्युनिकेशन सर्व्हिसेस हे पूर्णत: एण्ड टू एण्ड इन्क्रिप्टेड असून ते अनलॉक न करण्याचे नाकारल्याने कंपनी आणि एफबीआयसह कायदा आणि अंमलबजावणी संस्थांमध्ये संघर्ष देखील झाला आहे.
अॅपल आयक्लाऊड सेवा ज्यामध्ये छायाचित्र, व्हिडिओ आणि चॅटचा समावेश आहे यांना एण्ड टू एण्ड इन्क्रिप्शन नाही. हे तंत्रज्ञान अॅपलला देखील डिक्रिप्शन करण्यापासून प्रतिबंधित करते. इन्क्रिप्शन नसल्याने बदमाश, हेर आणि न्यायालयाच्या आदेशाने गुन्हेगारीचा तपास करणाऱ्यांना हा डेटा मिळवणे सोपे झाले आहे. मात्र, अॅपलने उचललेल्या पावलानंतर ते कमी होणार आहे.
(गिगबेंचवरील तो फोन असू शकतो GOOGLE PIXEL FOLD, लाँच आणि किंमतीबद्दल मिळाली ‘ही’ माहिती)
एन्क्रिप्शन कमकुवत करण्याचे प्रयत्न चुकीचे
कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांनी बॅकडोअरसह एन्क्रिप्शन कमकुवत करण्याचे प्रयत्न चुकीचे आहेत, कारण ते इंटरनेटला कमी विश्वासार्ह आणि अधिक धोकादायक बनवतील, असा युक्तीवाद बऱ्याच काळापासून सायबरसुरज्ञा तज्ज्ञांनी केला आहे. अॅपलने गेल्यावर्षी बाल लैंगिक शोषणाच्या फोटोंसाठी आयफोन स्कॅन करण्याची योजना केली होती, मात्र त्यास प्रचंड विरोध झाल्यानंतर ती मागे घेण्यात आली.
अॅपलने इन्क्रिप्शनची जी घोषणा केली आहे त्यास कंपनी अडव्हान्स डेटा प्रोटेक्शन असे म्हणते. ते आधीच क्लाऊडमध्ये एण्ड टू एण्ड इन्क्रिप्शन मिळालेले आय क्लाऊड बॅकअप, नोट्स आणि फोटोजना डेटा कॅटेगरीमध्ये टाकते ज्यामध्ये हेल्थ डेटा आणि पासवर्डचा देखील समावेश आहे. इमेल, कन्टॅक्ट, कॅलेंडर आयटम्सचा यात समावेश नाही.