आयफोनबाबत तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. सध्याच्या घडीला आयफोन असणं प्रतिष्ठेचं मानलं जातं. फोन वाजल्याबरोबर खिशातून कानाला लावताना आसपासच्या लोकांच्या नजरा आयफोनवर लागतात. मात्र आयफोन प्रत्येकाला परवडेल असं नाही. कारण आयफोनची किंमत अँड्रॉइड स्मार्टफोनच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे अनेक जण आयफोन घेण्याचं स्वप्न उराशी बाळगून असतात. आता आयफोन घेण्याऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. कमी किमतीत आयफोनच्या काही सिरीज विकत घेता येणार आहे. अॅप्पल कंपनीने गुरुवारी आयफोन १२ मिनी, आयफोन १२ आणि आयफोन ११ च्या किमतीत घट केली आहे. मात्र असं असलं तरी रंग आणि मॉडेल्सनुसार किंमती बदलू शकतात. त्याचबरोबर ऑनलाइन साइटवर मॉडेल्सच्या उपलब्धतेवरही किंमत अवलंबून आहे.
आयफोन १२- फ्लिपकार्टवर ६४ जीबी मॉडेल असलेला ब्लॅक आयफोन १२ ची किंमत ५९,९९९ रुपये आहे. तसेच ६४ जीबी ब्लू मॉडेल ६०,४९९ रुपयांना मिळेल. दुसरीकडे अॅमेझॉनवर हाच मॉडेल ६३,९०० रुपयांना मिळत आहे. १२८ जीबी मॉडेल अॅमेझॉनवर ७०,९०० रुपयांना तर फ्लिपकार्टवर ६४,९९९ रुपयांना मिळेल.
आयफोन १२ मिनी- काळ्या, पांढऱ्या आणि निळ्या रंगात आयफोन १२ मिनी ६४ जीबी मॉडेल अॅमेझॉनवर ४९,९९९ रुपयांना सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. पर्पल मॉडेल ५३,९०० रुपयांना आणि हिरव्या रंगाचं मॉडेल ५९,९०० रुपयांना मिळेल. तर १२८ जीबी मॉडेल लाल रंगात ५४,९९९ रुपयांना आणि हिरव्या रंगात ६४,९०० रुपयांना मिळेल. या फोनची मूळ किंमत ६९,९०० रुपये आहे.
गुगल पे, फोन पे, पेटीएमसारखे यूपीआय पेमेंट् विना इंटरनेट करू शकता; जाणून घ्या प्रोसेस
आयफोन ११- आयफोन ६४ जीबी मॉडेल अॅमेझॉनवर ४९,९०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर १२८ जीबी मॉडेल फ्लिपकार्टवर ५४,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.