फोल्ड करण्यायोग्य उपकरणे गॅझेटच्या जगात अधिक लोकप्रिय ठरू लागली आहेत. सध्या, ते फक्त फ्लॅगशिप श्रेणीमध्ये उपस्थित आहेत, परंतु प्रत्येक गॅझेट प्रेमींना ते आकर्षित करत आहेत. सॅमसंग आणि मोटोरोला जगभरात फोल्डेबल स्मार्टफोन वितरित करण्यात आघाडीवर आहेत. अलीकडेच अशी बातमी आली होती की अॅपल २०२५ पर्यंत फोल्डेबल आयफोन लाँच करू शकते. कंपनी एका नवीन ‘२० इंच फोल्डेबल’ डिस्प्लेवर देखील काम करत आहे, जे मॅकबुक (MacBook) आणि आयपॅडचे (iPad) हायब्रीड असू शकते. एका रिपोर्टनुसार, हा डिवाइस टचस्क्रीन कीबोर्डसोबत येईल.
ब्लूमबर्गच्या मार्क गुरमनने काही दिवसांपूर्वी त्यांच्या पॉवर ऑन वृत्तपत्रात सांगितले होते की अॅपल कथितपणे २० इंच फोल्ड करण्यायोग्य डिव्हाइसवर काम करत आहे. आता त्यांनी सांगितले आहे की कंपनी त्याच्या फोल्डेबल मॅकबुक/आयपॅड हायब्रिडसाठी ड्युअल डिस्प्ले फॉरमॅट शोधत आहे. हे शक्य झाल्यास, कंपनी आपल्या प्रॉडक्ट पोर्टफोलिओमध्ये एक नवीन श्रेणी लॉंच करेल. ही श्रेणी फोल्ड करण्यायोग्य मॅक/आयपॅड हायब्रिडची असेल. सोप्या शब्दात, हे उपकरण मॅकबुक आणि आयपॅडचे संकरीत असू शकते. तथापि, त्याच्या लॉंचिंगसाठी अद्याप वेळ आहे.
आपली महत्त्वाची कागदपत्रे DigiLocker मध्ये ठेवा सुरक्षित; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
मार्क गुरमन म्हणतात की कंपनी यामध्ये २० इंचाची फोल्डेबल स्क्रीन देऊ शकते, जी भौतिक कीबोर्डला सपोर्ट करेल किंवा डिस्प्लेच्या एका भागात व्हर्च्युअल कीबोर्ड देऊ शकेल. गुरमनला व्हर्च्युअल कीबोर्ड अधिक योग्य वाटते. असे मानले जात आहे की नवीन उत्पादन २०२६ मध्ये लॉंच केले जाऊ शकते. तसेच, फोल्डेबल स्मार्टफोन बाजारात आणण्याचे लक्ष्यही ठेवण्यात आले आहे. याचदरम्यान, अॅपल आपले एआर ग्लास, मिक्स्ड रिअॅलिटी हेडसेट आणि अॅपल कार लवकरच बाजारात आणेल अशी आशा आहे.
Ukraine-Russia युद्धाच्या पार्श्वभूमीवर गुगलची मोठी कारवाई; रशियाच्या ‘या’ अॅपवर घातली बंदी
तसे, कंपनीने अॅपल कारबद्दल अधिकृतपणे काहीही सांगितले नाही. प्रोजेक्ट टायटन नावाने कंपनीचे एक उत्पादन तयार केले जात असून ही अॅपलची कार असेल असे मानले जात आहे. गेल्या महिन्यात एका बातमीत अॅपलचे पेटंट मंजूर झाल्याचे सांगण्यात आले होते. हे पेटंट अॅपल कारशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. यूएस पेटंट आणि ट्रेडमार्क कार्यालयाने अॅपलला नवीन पेटंट मंजूर केले आहे. कंपनीच्या आगामी इलेक्ट्रिक कारसाठी हे सनरूफ तंत्रज्ञान असेल, असे मानले जात आहे. या पेटेंटमधून एका अशा काचेचा खुलासा करण्यात आला आहे, ज्याद्वारे वापरकर्ता कारच्या छताची पारदर्शकता आपल्या सोयीनुसार अड्जस्ट करू शकतो. २०२५पर्यंत ही अॅपल कार प्रत्यक्षात येऊ शकते असे म्हटले जाते.