Apple सीईओ टीम कूक सध्या भारत दौऱ्यावर आहेत. यामागे खास कारण म्हणजे भारतात apple चे रिटेल स्टोअर सुरु झाले आहेत. यापैकी देशातील पहिल्या रिटेल स्टोअरचे उदघाट्न टीम कूक यांनी केले आहे. तर आज दुसऱ्या स्टोअरचे उदघाटन ते करणार आहेत. यातच टीम कूक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या भेटीचा ए फोटो देखील कूक यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
टीम कूक यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यावर ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत फोटो देखील शेअर केला आहे. इतकेच नाही तर टीम कूक यांनी आपल्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या स्वागताबद्दल आभार मानले आहेत. तसेच ते म्हणाले, Apple भारतभर विस्तार करण्यासह गुंतवणूक करण्यासाठी देखील कटिबद्ध आहे.
पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर कूक यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली. त्यात ते म्हणाले, ”स्वागत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. शिक्षण ते विकासकांपासून उत्पादन आणि पर्यावरणापर्यंत, आम्ही देशभर विस्तार आणि गुंतवणूक करण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
टीम कुक यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, ‘तुम्हाला भेटून आनंद झाला. विविध विषयांवर विचारांची देवाणघेवाण करणे आणि भारतात होत असलेल्या तंत्रज्ञानाशी संबंधित बदलांची माहिती शेअर करणे खूप आनंदाची बाब आहे.
iPhone निर्माता Apple ने मंगळवारी भारतात पहिले Apple Store लॉन्च केले आहे. Apple चे सीईओ टीम कुक यांनी आज (मंगळवारी) भारतातील पहिले वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे भारतातील पहिले Apple रिटेल स्टोअरचे उद्घाटन केले. आज टीम कूक apple च्या दुसऱ्या स्टोअरचे दिल्लीमध्ये उदघाटन करणार आहेत.