गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ओपनएआयने ChatGpt चॅटबॉट लॉन्च केला आहे. हा एक कृत्रिम चॅटबॉट आहे. सध्याच्या काळामध्ये या AI प्रणालीचा वापर सर्वच क्षेत्रांमध्ये करण्यात येत आहे. तसेच या चॅटबॉटशी स्पर्धा करण्यासाठी अनेक कंपन्या आपल्या AI वर काम करत आहेत. तर काही कंपन्यांनी आपला AI लॉन्च देखील केला आहे. या AI बाबत Apple सीईओ टीम कुक यांनी देखील भाष्य केले आहे. टीम कुक सध्या भारतात असून काल त्यांनी देशातील पहिल्या रिटेल स्टोअरचे उदघाट्न केले आहे.
Apple CEO टिम कुक यांनी बिझनेस टुडेशी खास बातचीत केली. या संभाषणात टीम कुक यांना AI बद्दलच्या त्यांच्या मतांबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यावर त्यांनी काय भाष्य केले ते जाणून घेऊयात.
बिझनेस टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सीईओ टीम कूक यांनी AI बाबत भाष्य केले आहे. AI बद्दल आपले मत मांडताना टिम कुक म्हणाले, मला वाटते की AI हे खूप वेगाने वाढत आहे. टीम कुक यांनी संभाषणात सांगितले की, ”एआय आज अनेक उत्पादनांमध्ये वापरला जात आहे, त्याची मुळे अनेक उत्पादनांपर्यंत पोहोचली आहेत. ”
उदाहरणार्थ, Apple Watch बद्दल बोलायचे झाल्यास , जर तुम्ही ECG फीचर चालवत असाल तर हे फीचर केवळ आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करत नाही तर, तर त्यात मशीन लर्निंगचाही वापर करण्यात आला आहे. जर तुम्ही घड्याळ घातले आहे आणि तुम्ही जर का कोणत्या ठिकाणी पडलात तर घड्याळ तुमच्याकॉन्टॅक्टमधील एका व्यक्तीला कॉल करते. तर यामध्ये AI देखील वापरण्यात आले आहे. आम्ही आमच्या सर्व उत्पादनांमध्ये AI वापरत आहोत. टीम कुक म्हणाले, मला वाटते की ही खूप चांगली टेक्नलॉजी आहे.
Apple चे मुंबईतील स्टोअर रिलायन्स इंडस्ट्रीच्या जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये उभारण्यात आले आहे. हे स्टोअर या मॉलमध्ये २२ हजार स्केअरफूटमध्ये उभे राहिले आहे. मुंबईचे स्टोअरही न्यूयॉर्क, बीजिंग आणि सिंगापूरसारख्या अॅपलच्या स्टोअरसारखेच असणार आहे. अॅपल स्टोअरची रचना ही आकर्षक आणि ऊर्जा-कार्यक्षम आशा प्रकारे करण्यात आली आहे. आहे. Apple Store ची रचना नूतनीकरणक्षम उर्जेवर केली गेली आहे.
Apple चे भारतातील दुसरे फ्लॅगशिप स्टोअर राजधानी दिल्ली येथे उभारण्यात येणार आहे हे स्टोअर सिटीवॉक मॉल इथे उभरले जणार आहे. ही स्टोअर १०,००० ते १२,००० स्क्वेअरफूटमध्ये उभारले जाणार आहे. या स्टोअरचे लॉन्चिंग २० एप्रिल रोजी होणार आहे. २० एप्रिल पासून ग्राहक सकाळी १० वाजल्यानंतर या स्टोअरमध्ये जाऊन खरेदी करू शकणार आहेत. म्हणजेच Apple चे प्रॉडक्ट घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन किंवा थर्ड पार्टी स्टोअरमध्ये जाण्याची गरज पडणार नाही.