Apple Event September 2022 Live Updates in Marathi, 07 September 2022 : अॅपलच्या सर्वात मोठ्या वार्षिक कार्यक्रमाची प्रतीक्षा अखेर संपली. क्युपर्टिनो-कॅम्पसमध्ये अॅपलचा ‘फार आऊट इव्हेंट’ पार पडला. या कार्यक्रमात अॅपल आपले नवीन आयफोन, अॅपल वॉच आणि एअरपॉड्स प्रो २ यांच्यासह आणखी अनेक प्रमुख घोषणा केल्या आहेत आहे.
Apple iPhone Launch 2022 Live Updates in Marathi: अॅपल लाइव्ह इव्हेंटच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
आयफोन १४ आणि आयफोन १४ प्रो बरोबरच अॅपल वॉचची घोषणा करण्यात आली असून आता या प्रोडक्ट्ससाठी नेहमीप्रमाणे यंदाही पहिल्याच दिवशी आयस्टोअर्समध्ये गर्दी पहायला मिळण्याची शक्यता आहे. या फोनच्या माध्यमातून नोटीफिकेशन बार, नॉच यासारख्या भन्नाट संकल्पना पहिल्यांदाच वापरकर्त्यांना अनुभवता येणार असल्याने फोन कधी एकदा हातात येतोय असं अॅपलप्रेमींना झाल्याचं सोशल मीडियावरील फोन लॉंचिंग नंतरच्या प्रतिक्रियांवरुन दिसून येत आहे.
भारतीय वेळेनुसार मध्यरात्री १२ वाजता अॅपलच्या लॉंचिंगच्या कार्यक्रमाची सांगता झाली असली तर सोशल मीडियावर या फोन्सच्या फिचर्सबरोबरच किंमत आणि मिम्सचीही चर्चा पाहायला मिळत आहे.
थोडक्यात असा असणार आयफोन १४ प्रो….
फोर के सपोर्टसह सिनेमॅटिक मोडही या फोनमध्ये उपलब्ध आहे.
आय वॉच अल्ट्रा भारतात ८९ हजार ९०० रुपयांना मिळणार.
टेलिफोटो ही विशेष सुविधा देण्यात आली आहे. हा कॅमेरा क्वाड पिक्सल सेन्सर्ससहीत असेल हे ही या कॅमेराचं वैशिष्ट्य असेल.
आतापर्यंतचा सर्वात मोठ्या क्षमतेचा कॅमेरा अॅपलने आयफोन १४ मध्ये दिला आहे. आयफोन १४ प्रोचा कॅमेरा ४८ मेगा पिक्सेलचा असणार आहे. यामुळे आधीच्या आयफोनच्या तुलनेत आता अंधुक प्रकाशामध्येही स्पष्ट छायाचित्रे काढता येणार आहेत.
या पाच रंगांमध्ये आयफोन १४ सीरिज उपलब्ध असणार आहे. यामध्ये पहिल्यांदाच पर्पल कलरचा समावेश करण्यात आला आहे.
आयफोन प्रोमध्ये नोटिफिकेशन डिस्प्लेमध्ये अमूलाग्र बदल करण्यात आला आहे. नोटिफिकेशन अलर्ट केवळ वरच्या छोट्या पट्टीत दिसणार.
आयफोन १४ प्लस ७ ऑक्टोबरला बाजारात दाखल होणार.
आयफोन १४ हा १६ सप्टेंबरपासून ग्राहकांसाठी बाजारपेठेत उपलब्ध होणार.
फोनच्या कॅमेऱ्यामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. यामध्ये १२ एमपीचा मुख्य कॅमेरा असेल, तर पुढील कॅमेरामध्ये प्रथमच ऑटोफोकसची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे अतिशय अंधुक प्रकाशातही छायाचित्र व्यवस्थित टिपता येणार.
अतिदुर्गम भागात मोबाईल संपर्क तुटल्यास सॅटेलाईटद्वारे संपर्क साधण्याची सुविधा मिळणार आहे. या सुविधेचा फायदा डोंगरदऱ्यांमध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांच्या बचावकार्यात होऊ शकतो.
आयफोन १४ आयफोनमध्ये सामान्य सीमकार्ड नसणार. ॲपलकडून ई-सीमची घोषणा करण्यात आली आहे. फोनमध्ये सीम ट्रेच उपलब्ध नसणार.
आयफोन १४ मध्येही अपघात ओळखून आपत्कालीन यंत्रणांशी संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
:
आयफोनमध्ये सामान्य सीमकार्ड नसणार. ई-सीमची ॲपलकडून घोषणा. फोनमध्ये सीम ट्रेच उपलब्ध नसणार. सध्या तरी ही सुविधा फक्त अमेरिकेपुरती मर्यादित ठेवण्यात आली आहे.
ए१५ बायोनिक प्रोसेसर आयफोन १४ मध्ये असणार आहे. हा सर्वांत वेगवान प्रोसेसर असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
आयफोन १४ आणि १४ प्लसची घोषणा करण्यात आली आहे. या फोनमध्ये वापरकर्त्यांना अधिक मोठा डिस्प्ले मिळणार आहे.
आयफोन १४ आणि १४ प्लसची घोषणा करण्यात आली आहे. या फोनमध्ये वापरकर्त्यांना अधिक मोठा डिस्प्ले मिळणार आहे. प्रथमच ॲपलने वाप्रकर्त्यांच्या अधिक मोठ्या आयफोनच्या मागणीकडे लक्ष दिलं आहे
ॲपल वॉचची आठव्या सिरीजचं डिझाइन आधीच्या वॉचप्रमाणेच असले तरी स्क्रीन मोठी आणि अधिक ब्राइट असेल असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. ही घड्याळं कोणत्याही परिस्थितीमध्ये काम करण्यासाठी अधिक सक्षम असतील असा कंपनीचा दावा आहे.
ॲपल वॉचची आठवी सिरीज ही आधीच्या सिरीजपेक्षा अधिक ड्युरेबल म्हणजेच सक्षम, स्वीम-फ्रूफ, डस्ट फ्रूफ आणि क्रॅक रेझिसटन्स म्हणजेच काचेला तडा पडणार नाही या वैशिष्ट्यांसहीत उपलब्ध होणार आहे.
ॲपल वॉच अल्ट्राची किंमत ७९९ डॉलर असेल आणि ते २३ सप्टेंबर पासून सर्वत्र उपलब्ध होईल.
वैशिष्ट्ये :
कमी बॅटरीमध्येही जास्तीत जास्त आवश्यक वैशिष्ट्ये काम करणार.
सेकड जनरेशन मधील आय वाचमध्ये महत्वपूर्ण बदल. २४९ ते २९९ डॉलर किंमत
मासिक पाळीचक्राची नियमितता आणि त्यातील बदल अचूकपणे टिपण्याची क्षमता. ही सर्व माहिती केवळ वापरकर्त्याकडेच राहणार.
सिरीज 8 ची घोषणा! काठोकाठ पसरलेला डिस्प्ले, फिटनेसच्या वैशिष्ट्यांमध्ये वाढ, स्लिप ट्रॅकिंगसह शरीराचे तापमानही मोजणार