Apple Event September 2022 Live Updates in Marathi, 07 September 2022 : अॅपलच्या सर्वात मोठ्या वार्षिक कार्यक्रमाची प्रतीक्षा अखेर संपली. क्युपर्टिनो-कॅम्पसमध्ये अॅपलचा ‘फार आऊट इव्हेंट’ पार पडला. या कार्यक्रमात अॅपल आपले नवीन आयफोन, अॅपल वॉच आणि एअरपॉड्स प्रो २ यांच्यासह आणखी अनेक प्रमुख घोषणा केल्या आहेत आहे.
Apple iPhone Launch 2022 Live Updates in Marathi: अॅपल लाइव्ह इव्हेंटच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
हार्डवेअर + सॉफ्टवेअर + वैयक्तिक जादुई अनुभव म्हणजे ॲपल वॉच – टीम कूक
ॲपल कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी परिषदेत बोलताना सर्वप्रथम आय वॉचने सुरुवात केली.
नवीन आयफोनची घोषणा झाल्यानंतर त्याचे भारतात उत्पादन होण्यापर्यंत सहा ते आठ महिन्यांचा कालावधी जातो. भारतात वाढत असलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ॲपल दोन महिन्यातच भारतात उत्पादन सुरू करू शकते.
आयफोनच्या वेगवान चार्जिंगमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या लायटनिंग पोर्टची ही अखेरची आवृत्ती असणार आहे. कारण युरोपीय महासंघाने सर्व स्मार्टफोन्सना यूएसबी टाईप सी पोर्ट असणे बंधनकारक केले आहे. हा नियम २०२४ पासून लागू होणार असला तरी आयफोन १४ नंतर येणाऱ्या आयफोनमध्ये सी टाईप चार्जिंग असेल.
जगभरात सध्या महागाई दर चढा असून आर्थिक मंदीचा झाकोळही अनेक देशांवर आहे. अशा परिस्थितीत ॲपल किंमतीच्या संदर्भातील तारेवरची कसरत कशी करणार याकडे जगभरातील अनेकांचे लक्ष आहे
ॲपलच्या गुंतवणूकदारांचेही या सोहळ्याकडे बारिक लक्ष आहे. दरवर्षी नव्या उत्पादनाच्या अनावरणापूर्वी ॲपलच्या शेअरचा भाव सुमारे १० टक्क्यांनी खाली येतो. यंदाही तो १३ टक्क्यांनी खाली आला आहे. मात्र यात काळजीचे कारण नाही, असे बाजारपेठेतील तज्ज्ञांना वाटते. प्रतिवर्षी हेच होते आणि सोहळ्यानंतर आलेख वरच्या दिशेने जातो, असे गुंतवणूकदारांच्या एका गटाला वाटते असे 'ब्लूमबर्ग'ने म्हटले आहे
आयफोनमध्ये सॅटेलाइट नेटवर्कची सुविधा असेल, ही चर्चा आता अधिकाधिक पक्की होऊ लागली आहे. या परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेवरील आकाशातील ताऱ्यांच्या समूहाने बनलेला ॲपलचा लोगो त्याचीच साक्ष देत आहे, असा दावा केला जात आहे.
आयफोन १४ मालिकेतील मोबाईलमध्ये कॅमेरा स्क्रीन यासारख्या वैशिष्ट्यांबरोबरच प्रोसेसर क्षमतेतही तफावत दिसून येईल .आयफोन १४ प्रो आणि प्रो मॅक्समध्ये नवीन बायोनिक ए१६ प्रोसेसर असेल तर इतर आयफोनमध्ये सध्याच्या बायोनिक ए१५ प्रोसेसरची अद्ययावत आवृत्ती असेल, असेही बोलले जात आहे.
आयफोन १३ आणि त्याआधीच्या आयफोनमध्ये स्टोअरेज क्षमता १२८ जीबीपासून सुरू होते. मात्र नव्या आयफोनमध्ये स्टोअरेज दुप्पट करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
यंदाच्या कार्यक्रमात आयफोन १४ ची घोषणा होणार आहे. त्याचबरोबर ॲपलच्या अन्य उत्पादनांची नवीन आवृत्ती पाहायला मिळणार आहे. त्यातील आणखी एक प्रमुख आकर्षण असणार आहे ते म्हणजे आय वॉच सिरीज ८.
कॅलिफोर्नियातील ॲपल पार्कमधील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये काही क्षणात ॲपलच्या वार्षिक परिषदेला सुरुवात होणार आहे. काही वेळातच कंपनीचे सीईओ टीम कुक परिषदेला सुरुवात करतील. यंदा दोन वर्षांनंतर ॲपलच्या या परिषदेत प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष हजर असणार आहेत.
अॅपलच्या दरवर्षीच्या कार्यक्रमाप्रमाणे यंदाही आयफोनसह अॅपलच्या इतर काही उत्पादनांच्या नवीन किंवा सुधारित आवृत्त्यांची घोषणा होणार आहे. यामध्ये आयफोन १४ हे प्रमुख आकर्षण असेल. आयफोन १४ मालिकेतील चार किंवा पाच फोनचे सादरीकरण आजच्या कार्यक्रमात होईल. याशिवाय अॅपल वॉच सिरीज आठ, आयपॅड प्रो, एअरपॉड्स प्रो ही उत्पादनेही आजच्या कार्यक्रमातून जगासमोर मांडली जाणार आहेत.
आयफोन १३च्या तुलनेत आयफोन १४ मालिकेत अधिक शक्तिशाली प्रोसेसर, कॅमेरा, अधिक बॅटरी क्षमता आणि झटपट चार्जिंगची सुविधा ही वैशिष्ट्ये असू शकतील. आयफोनच्या मागील दोन मालिकांमध्ये कंपनीने त्या-त्या श्रेणीत ‘मिनी’ आयफोन आणले होते. मात्र, यावेळी त्याला फाटा देऊन अॅपल अधिक मोठा डिस्प्ले असलेले आयफोन प्लस आणि प्रो मॅक्स आणणार, अशी चर्चा आहे. या दोन्ही आयफोनचा डिस्प्ले ६.७ इंच इतका असू शकतो.
आयफोन १४ सीरिजच्या किमतीबाबत काही अंदाज बांधण्यात येत आहेत. काही मीडिया अहवालानुसार, आयफोन १४ ची संभाव्य किंमत ७४९ डॉलर्स म्हणजेच ५९,७८२ रुपये, आयफोन १४ मॅक्सची संभाव्य किंमत ८४९ डॉलर्स म्हणजेच ६७,७६२ रुपये, आयफोन १४ प्रोची संभाव्य किंमत १,०४९ डॉलर्स म्हणजेच ८३, ७२० रुपये आणि आयफोन १४ प्रो मॅक्सची संभाव्य किंमत १,१९४ डॉलर्स म्हणजेच ९५,२९२ रुपये इतकी असू शकते.